मतदार यादी ऑनलाइन डाउनलोड करण्याची सोपी प्रक्रिया

  • स्टेप 1: सगळ्यात आधी तर तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉपच्या ब्राउजरमध्ये पुढे दिलेली अधिकृत वेबसाईट उघडा: https://voters.eci.gov.in. वेबसाईटवर गेल्यावर खाली स्क्रोल करा आणि “Services” विभागात “Download Electoral Roll” या पर्यायावर क्लिक करा.
  • स्टेप 2: आता तुमच्या समोर एक फॉर्म दिसेल. त्यामध्ये पुढे दिलेली माहिती योग्यरित्या भरा, जसे की State (राज्य) Maharashtra निवडा, District (जिल्हा) निवडा
  • Assembly Constituency (विधानसभा क्षेत्र) निवडा, Language (भाषा) मराठी निवडा आणि Roll Type मध्ये Final Roll (अंतिम यादी) निवडा. यापुढे दिलेला Captcha कोड तिथे भरा.
  • स्टेप 3: आता अजून खाली स्क्रोल करा. इथे तुम्हाला तुमच्या निवडलेल्या विधानसभा क्षेत्रातील गावांची / वॉर्डची यादी येथे दिसेल.
  • स्टेप 4: एकावेळी साधारण 10 गावांची नावे दिसतात. जर तुमचं गाव पहिल्या पानावर नसेल तर (>) या बटणावर क्लिक करून पुढील यादी पहा.
  • स्टेप 5: तुमच्या गावाच्या नावासमोर टिक करा आणि वर दिसणाऱ्या “Download Selected PDFs” बटणावर क्लिक करा.
  • स्टेप 6: काही सेकंदातच तुमच्या गावाची संपूर्ण मतदार यादी PDF मध्ये उघडेल किंवा डाउनलोड होईल. यात तुम्हाला दिसेल,
  • मतदारांचे पूर्ण नाव
  • घर क्रमांक किंवा पत्ता
  • मतदान केंद्र कुठे आहे
  • वॉर्ड क्रमांक किंवा गावाची माहिती

1 thought on “मतदार यादी ऑनलाइन डाउनलोड करण्याची सोपी प्रक्रिया”

Comments are closed.