आपण अनेकदा मालमत्तेच्या वादविवादांमध्ये हक्कसोड पत्र हा शब्द ऐकलेला असतो. परंतु हे हक्कसोड पत्र म्हणजे काय आणि त्याची आवश्यकता काय आहे हे जाणून घेण्यासाठी आज आपण सविस्तर माहिती देणारा लेख घाऊन आलो आहोत. तुमच्या नावावर एखादी मालमत्ता असेल किंवा तुम्ही एखाद्या मालमत्तेमध्ये हस्सेदार असाल आणि तुमच्याकडे तुमचे नातेवाईक हक्कसोड पत्र What is hakksod patra? मागत असतील तर तूम्ही हा लेख जरुर वाचा आणि या विषयासंदर्भात योग्य ती माहिती मिळवा आणि त्यानंतरच पुढील निर्णय घ्या. हक्कसोड पत्राचे कायद्यातील महत्त्व देखील आपण या लेखाच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. Hakksod patra Marathi mahiti
हक्कसोडपत्र म्हणजे काय?
एखाद्या मालमत्तेमध्ये नाव असल्यास आणि त्या मालमत्ते मधून मग ती मालमत्ता शेती असेल किंवा घर, जमीन काहीही असू शकेल त्यामधून आपला मालकी हक्क कमी करण्यासाठी हक्कसोड पत्रावर सही केली जाते. हे हक्कसोडपत्र कायदेशीररित्या बनवून घेतले जाते. तरच त्याला मान्यता असते.
हक्कसोडपत्र कोणाला करता येते?
ज्या व्यक्तीचा ठराविक मालमत्तेमध्ये हक्क आहे त्याच व्यक्तीला हक्कसोड पत्र करता येते. वारस हक्काने आई वडिलांच्या मालमत्तेमध्ये मुलींना देखील वाटा शासनाने कायद्याप्रमाणे असल्याचे नमूद केले आहे त्यामुळे मुली त्यांचा हक्क घेतात किंवा हक्कसोड प्रमाणपत्र देऊन शासकीय कागदपत्रांवर सही करुन देतात. हक्कसोडपत्र हे आपल्या हिश्श्याच्या काही भागाचे किंवा संपूर्ण भागाचे करता येते. Hakksod patra Marathi mahiti
हक्कसोड पत्राचा मोबदला काय असतो?
हक्कसोड पत्र हे कुटुंबातील व्यक्तींच्या नावे असल्याने त्यावर शासनाकडून कोणताही मोबदला आकारला जात नाही. तसेच जी व्यक्ती मालमत्तेवरील मालकी हक्क सोडत आहे त्याव्यक्तीस हक्क सोडल्याचा मोबदला इतर मालमत्तेमध्ये हक्क सांगणारे इतर व्यक्ती देऊ शकतात. हक्कसोडपत्र नोंदणीकृत असणे आवश्यक असते त्यामुळे त्यामुळे त्याचे शासनाकडून नोंदणी शुल्क आकारले जाते. Hakksod patra Marathi mahiti
हक्कसोडपत्र नोंदणीकृत असावे का?
हक्कसोडपत्र हे लेखी स्वरुपात आणि नोंदणीकृत असणे अत्यंत आवश्यक असते. हक्कसोड पत्राची नोंदणी न केल्यास त्याची सरकार दप्तरी नोंद घेतली जात नाही. मालमत्ता हस्तांतरण अधिनियम 1882 कलम 123 नुसार कोणत्याही मालमत्तेचे हस्तांतरण हे नोंदणी झालेल्या लेखाच्या माध्यमातून करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. What is hakksod patra?
हक्कसोड पत्राच्या दस्तात कोणत्या गोष्टी नमूद करण्यात येतात?
हक्कसोड पत्र नोंदणीकृत पद्धतीने आणि कायद्यानुसार करताना त्यामध्ये काही कायदेशीर बाबींचा समावेश करण्यात येतो. त्यामध्ये पुढील बाबींचा समावेश करण्यात येतो.
- हक्कसोडपत्र देणाऱ्या व्यक्तीचे नाव, वय, पत्ता, धंदा याचा संपूर्ण तपशील
- हक्कसोडपत्र घेणाऱ्या व्यक्तीचे नाव, वय, पत्ता, धंदा याचा संपूर्ण तपशील
- एकत्र कुटुंबाच्या वंशावळीचा कागद.
- एकत्र कुटुंबाच्या मिळकतीचे हिस्सानिहाय विवरण.
- दोन साक्षीदार व त्यांची नावे, वय, पत्ता याचा संपूर्ण तपशील. Hakksod patra Marathi mahiti
हक्कसोडपत्र कुठे तयार करुन मिळते?
हक्कसोडपत्र तलाठी तयार करुन देत असल्याने असे हक्कसोडपत्र तयार करायचे असल्यात तलाठी कार्यालयात जावे लागते. तेथेच या पत्राची नोंदणी होते आणि कादपत्रांची देखील तपासणी केली जाते. संबंधित व्यक्तीने सादर केलेले सर्व कागदपत्रे आणि तपशील तलाठी कार्यालयात तपसाले जातात. हक्रसोडपत्र नोंदणीकृत असले तरच गाव नमुना 6 मध्ये त्याची तलाठीद्वारे नोंद केली जाते. आणि सर्व हिसतंबंधितांना नोटिस बजावली जाते. अनोंदणीकृत हक्कसोडपत्राची नोंद करणे अवैध आहे.
मालमत्तेच्या वाटाघाटीमंध्ये हक्कसोडपत्राचे महत्व
शहरी आणि ग्रामिण भागत दोन्ही ठिकाणी मालमत्तेच्या खटल्यांमध्ये हक्कसोड प्रमाणपत्र तायार केले जाते. एखाद्या मालमत्तेमध्ये हिस्सेदास असतील तर ते त्यांचा हिस्सा सोडत असल्यास त्यांच्या नावे हक्कसोड प्रमाणपत्र देतात. त्यानंतर वंशपरंपरागत मालमत्तेतील त्यांचा काहीही हक्क नाही असा त्याचा अर्थ होतो. एकदा नोंदणीकृत पद्धतीने हक्कसोड पत्र दिल्यानंतर मालमत्तेतून हक्क सोडलेल्या व्यक्तीचा वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये कोणताही हक्क उरत नाही. What is hakksod patra?