Farmer ID Scheme: शेतकऱ्यांना मिळणार ‘फार्मर आयडी कार्ड’! एकाच कार्डमध्ये मिळणार या सुविधा!!

Farmer ID Scheme सध्या डिजिटलायझेशनच्या युगात शेतकऱ्यांपर्यंत अधिक वेगाने केंद्रिय आणि राज्य पातळीवरील कृषी योजना पोहोचवण्यासाठी किंवा शेतीविषयक आर्थिक लाभ पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारने शेतकऱ्यांना एक ओळखपत्र देऊ केले आहे. त्याला शेतकरी ओळखपत्र तसेच ‘फार्मर आयडी कार्ड’ असे म्हटले जात आहे. या काच कार्डच्या मदतीने शेतकरी शेतीविषय विविध योजनांचा लाभ घेऊ शकणार आहेत.या डिजिटल कृषी अभियानाला केंद्रिय मंत्रीमंडळणाने 2817 कोटी रुपयांचा निधी सुरुवातीच्या कालावधीसाठी मंजूर केला आहे.  चला तर मग या Farmer ID Scheme बद्दल अधिक माहिती मिळवूया, आणि  हे कार्ड बनवून घेण्यासाठीची नोंदणी प्रक्रिया काय आहे ते देखील जाणून घेऊया. Farmer ID Scheme

शेतकरी ओळख पत्र

शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून फार्मर आयडी कार्ड म्हणजेच शेतकरी ओळखपत्र देण्यात येणार आहे. या शेतकरी ओळखपत्राच्या मदतीने देशातील तब्बल 11 कोटी शेतकऱ्यांना विविध सुविधांचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे टप्प्या टप्प्यावर शेतकऱ्यांना या ओळखपत्राचा लाभ घेता येणार आहे. देशातील सर्वच्या सर्व शेतकरी एकाच वेळी या योजनेत सहभागी होऊ शकणार नाहीत. परंतू 2025 ते 2027 पर्यंत टप्प्या टप्प्याने तब्बल 11 कोटी शेतकऱ्यांना या योजनेत समाविष्ट करण्यात येणार आहे.  Farmer ID Scheme

11 कोटी शेतकऱ्यांना या टप्प्यात मिळणार लाभ

कृषी शेतकरी कल्याण मंत्रालयाने 28  नोव्हेंबर 2024 रोजी सर्व राज्यांना पत्र पाठवून व शेतकरी ओळखपत्र तयार करण्यासाठी विशेष शिबिरे आयोजित निर्देश दिले आहेत. 2024-25  या वर्षात मध्ये 6 कोटी शेतकऱ्यांना, 2025-26 या वर्षात 3 कोटी शेतकऱ्यांना तसेच  2026-27 या वर्षात 2 कोटी शेतकऱ्यांना या केंद्रिय योजनेत समाविष्ट करण्यात येईल. Farmer ID Scheme

अशी करा नोंदणी शेतकरी ओळखपत्रासाठी

https://developer.agristack.gov.in/crop-registry/#/ या लिंकवर क्लिक करुन तुम्ही तुमच्या नावाने रजीस्टर करणे आवश्यक आहे. ही केंद्राची वेबसाईट असून या योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना घेता यावा यासाठी महाराष्ट्र शासनाने देखील वेबसाईट सुरु केली आहे. Farmer ID Scheme

https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/RegistrationLogin/RegistrationLogin या लिंकवर क्लिक करुन देखील तुम्ही तुमच्या नावाचे रजीस्ट्रेशन करु शकता.

  • नावाचे रजीस्ट्रेशन केल्यानंतर विचारण्यात आलेल्या आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करा.
  • आधारकार्ड, रेशनकार्ड, जमिनीचा नकाशा, जमिनीचा सात बारा उतारा आणि इतर कागदपत्रे अपलोड करा.
  • त्यानंतर शेतीविषयक आणि पिकाविषयक विचारण्यात आलेली माहिती भरा.
  • पुन्हा एकदा भरण्यात आलेली माहिती तपासा आणि सबमीट बटणारवर क्लिक करा. Farmer ID Scheme

शेतकरी ओळखपत्र आधारकार्डसोबत लिंक असणे आवश्यक

शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ घ्यायचा असल्यास त्यांचे नव्याने बनलेले ओळखपत्र आधारकार्डसोबत लिंक असणे आवश्यक ठरणार आहे. या ओळखपत्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना किसान सन्मान निधी, किसान क्रेडीट कार्ड तसेच विविध शेतीविषयक योजनांचा लाभ घेता येणार आहे. एक शेतकरी त्यांच्या पिकासंबंधीत विविध योजनांचा लाभ घेत असतील तर त्यांच्या या ओळखपत्राच्या माध्यमातून सर्व योजना एकाच ठिकाणी समाविष्ट करुन शेतकऱ्यांना कुठेही विविध कृषी विभागात फेऱ्या मारण्याची गरज भासणार नाही. Farmer ID Scheme

शेतकरी ओळखपत्राचा होणारा फायदा

Farmer ID Scheme च्या माध्यमातुन 11 कोटी शेतकऱ्यांना शेतीसंबंधीत ओळखपत्र केंद्र सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. या योजनेचे फायदे आपण समजून घेऊ.

  • एकाच कार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ घेता येणार आहे.
  • केंद्र आणि राज्य पातळीवरील कृषी योजनांचा या कार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अगदी सोप्या पद्धतीने लाभ घेता येईल.
  • शेतकऱ्यांना कोणत्याही मध्यस्थीशिवाय कृषी योजानांचा लाभ घेता येईल.
  • शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी किसान क्रेडिट कार्ड मिळू शकते.
  •  शेतीच्या विकासासाठी  शेतकऱ्यांना  या ओळखपत्राच्या माध्यमातून सहज कर्ज उपलब्ध होणार असून पीक विम्याचा लाभ देखील कोणत्याही अडचणीशिवाय मिळणार आहे. Farmer ID Scheme