high court decision on cibil score: खराब CIBIL स्कोअर असलेल्यांसाठी खुशखबर, हायकोर्टाने बँकांना जारी केले निर्देश

high court decision on cibil score आर्थिक अडचणीच्या वेळी कर्ज मिळविण्यासाठी आपण बँकेत जातो किंवा एखाद्या वित्तीय संस्थेकडून कर्ज मिळवतो. परंतु सध्या कर्ज मिळविण्यासाठी अर्जदाराचा cibil score तपासला जातो. क्रेडिट स्कोअर हे CIBIL स्कोरचे नाव आहे. cibil score  हे बँक किंवा फायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेतले आणि त्याची परतफेड कशी केली यावरुन ठरत असतो.  CIBIL स्कोर हा घेतलेल्या कर्जाचा हप्ता वेळेवर भरला आहे की नाही यावर अवलंबून असतो. Credit Information Bureau (India) Limited ही संस्था तुमच्या CIBIL स्कोअरची गणना करते आणि देखरेख करते. CIBIL मूल्यमापन तीन अंकांमध्ये केले जाते. CIBIL स्कोअर 300 ते 900 या अंकापर्यंत गणला जातो.  700 ते 900 मधील सिबिल स्कोअर हा चांगला स्कोअर समजला जातो. हा स्कोअर असलेल्या व्यक्तीला तत्काळ कर्ज मिळणे सोपे असते. high court decision on cibil score

कमी सिबिल स्कोअर असल्यास

तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे, तुम्हाला कर्ज मिळेल की नाही हे CIBIL स्कोअर ठरवेल. तुमचा CIBIL स्कोअर 300 ते 500 च्या दरम्यान असल्यास बँक किंवा वित्तिय संस्था तुम्हाला कर्ज देणार नाही. तुम्हाला तुमचा सिबिल स्कोअर तपासायचा असल्यास तो नेमका कोणत्या पद्धतीने तपासायचा हे जाणून घेण्यासाठी https://kopargaonlive.com/how-to-check-cibil-score-on-whatsapp/ या लिंकवर क्लिक करा. परंतु तुमची आर्थिक स्थिती अनेकदा अशी असते की तुम्हाला पैशांची अडचण असते अशावेळी तुमची आर्थिक गरज भागण्याची अत्यंत आवश्यकता असते उदा. वैद्यकिय गरज आणि शैक्षणिक गरज. या दोन्ही वेळी आर्थिक गरज अत्यंत मोठी असते, परंतु बँक किंवा वित्तीय संस्थांनी कर्ज मंजूर केले नाही तर खूप जास्त नुकसान होऊ शकते म्हणून याप्रकरणी उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. high court decision on cibil score

न्यायालयाने बँकांना कडक निर्देश

खराब सिबिल स्कोअर असल्यास कर्ज नाकारणाऱ्या बँकांना हायकोर्टाचे न्यायमूर्ती पीव्ही कुन्हीकृष्णन यांनी फटकारले आहे.  एखाद्या विद्यार्थ्याचा CIBIL स्कोअर खराब असेल आणि त्याला शैक्षणिक कर्ज नाकारणाऱ्या बँकांवर कारवाई होईल असे देखील त्यांनी सांगितले. त्याचे कारण असे की, विद्यार्थी शैक्षणिक कर्ज घेतात तेव्हा त्यांची मिळकत नसते. कर्ज देणाऱ्या बँकांनी किंवा वित्तिय संस्थांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज देणे गरजेचे असते. विद्यार्थ्यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर कर्जाचा भरणा होऊ शकतो. या बाबत बँकांना उच्च न्यायालयाने कडक निर्देश दिले आहेत. high court decision on cibil score

सुरुवात येथून झाली

केरळ उच्च न्यायालयात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कर्जाच्या बाबतीत CIBIL स्कोअर पाहू नये याबाबतीत एका जनहित याचिकेवर सुनावणी सुरू होती. न्यायालयाने म्हटले की, विद्यार्थी देश घडवतो. न्यायालयाने म्हटले आहे की केवळ CIBIL स्कोअरच्या कमतरतेच्या आधारावर विद्यार्थ्यांचा शैक्षणिक कर्ज अर्ज नाकारणे बेकायदेशीर आहे. बँकांनीही मानवी पैलूकडे लक्ष दिले पाहिजे. ज्या विद्यार्थ्याने हाय कोर्टात याचिका दाखल केली त्याने  गरजेपोटी दोन कर्जे घेतली होती, त्यापैकी एकासाठी 16,667 रुपये जास्तीच्या खर्चाचा समावेश होता. विद्यार्थ्यांच्या कर्ज खात्यावर  बँकेने जास्तीची फी आकारली. आणि विद्यार्थ्याचा सिबिल स्कोअर खराब झाला.  परंतू त्यामुळे विद्यार्थ्याला शैक्षणिक कर्ज मिळत नव्हते कारण त्याचा CIBIL स्कोर कमी होता. high court decision on cibil score

तत्काळ बँकांनी शैक्षणिक कर्ज उपलब्ध करुन द्यावे

केरळ मधील त्या  विद्यार्थ्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल करून तात्काळ बँकेकडून कर्ज मिळावे, अन्यथा तो मोठ्या संकटात सापडू शकतो असे सांगितले. त्यामुळेच केरळ उच्च न्यायालयाने या प्रकरणात निर्णय दिला की, बँकांनी CIBIL स्कोअरऐवजी विद्यार्थ्याच्या भविष्यात  कर्ज फेडण्याच्या क्षमतेच्या आधारे शैक्षणिक कर्ज द्यावे. high court decision on cibil score

CIBIL स्कोअर चांगला कसा ठेवावा

आपल्याला कधी ना कधी कर्जाची आवश्यकता ही लागते. परंतु अशावेळी cibil score चांगला असण्याची देखील गरज असते, मग  हा cibil score चांगला कसा ठेवायचा हे  सांगणारा आमच्या वेबसाईटवरील हा लेख जरुर वाचा. https://kopargaonlive.com/good-cibil-score/   high court decision on cibil score