
खुशखबर! ग्रामीण डाक सेवक (GDS) भरतीची 1ली निवड यादी प्रसिद्ध | लगेच येथे तुमचे नाव चेक करा.
तुम्ही ग्रामीण डाक सेवक पदांसाठी अर्ज केला असेल आणि निकालाची आतुरतेने वाट पाहत असाल, तर तुमची प्रतीक्षा आता संपली आहे. इंडिया पोस्ट द्वारे जानेवारी – फेब्रुवारी मध्ये तब्बल GDS पदांची 28,740 पदांसाठी भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली होती. याकरिता 10वी उत्तीर्ण तसेच पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीनें अर्ज मागविण्यात आले होते.
आता या भरतीची सर्व जिल्ह्यांची 1ली निवड यादी (1st Merit List) अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आली आहे. इंडिया पोस्ट विभागाच्या महाराष्ट्र पोस्टल सर्कल मधील ग्रामीण डाक सेवक (GDS) भरतीची ही यादी असून, तुम्ही खाली दिलेल्या लिंकवरून ती डाऊनलोड करून तुमचे नाव चेक करू शकता.
कागदपत्र पडताळणी (Document Verification) बाबत अत्यंत महत्त्वाची सूचना: ज्या उमेदवारांची या पहिल्या यादीमध्ये निवड करण्यात आली आहे, त्यांनी पुढील प्रक्रियेसाठी खालील बाबींची नोंद घ्यावी:
- शेवटची तारीख: या निवड यादीत नाव असलेल्या उमेदवारांनी 23 मार्च 2026 रोजी किंवा त्यापूर्वी कागदपत्रे पडताळणीसाठी हजर राहावे.
- कुठे जावे? उमेदवारांनी त्यांच्या नावांसमोर नमूद केलेल्या विभागीय प्रमुखांकडून (Divisional Head) त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करून घ्यावी.
- आवश्यक कागदपत्रे: निवडलेल्या सर्व उमेदवारांनी पडताळणीसाठी आपली मूळ कागदपत्रे (Original Documents) आणि त्यासोबत सर्व संबंधित कागदपत्रांच्या दोन संच स्व-प्रमाणित छायाप्रतींसह (2 Sets of Self-Attested Photocopies) हजर राहणे अनिवार्य आहे.
महत्त्वाच्या लिंक्स (Important Links):
| पहिली सिलेक्शन लिस्ट (सर्व जिल्ह्यांची पहिली निवड यादी) | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |