Ferfar Online Maharashtra | १८८० नंतरचे सातबारा उतारे बघा मोबाईलवर अगदी सोप्या पद्धतीने

Ferfar Online Maharashtra

Ferfar Online Maharashtra जमिनीचे सातबारा उतारे आता तुम्ही मिळवू शकता अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने. शेतकऱ्यांच्या आणि जमिनीचे व्यवहार करणाऱ्या सामान्य नागरिकांच्या शासकीय कार्यलयातील फेऱ्या वाचवण्यासाठी शासनाने घेतलेला हा निर्णय अनेक शेतकऱ्यांच्या तसेच जमिनीचा व्यवहार करणाऱ्या व्यक्तिंच्या देखील अत्यंत उपयोगी पडत आहे.

सुरुवातीला ऑनलाईन पद्धतीने जमिनीचे सातबारा फेरफार पाहण्याची सुविधा केवळ 7 जिल्ह्यांपुरतीच मर्यादीत होती परंतु आता महाराष्ट्रातील 19 जिल्ह्यांमध्ये  ई गव्हर्नर्सच्या माध्यमातून ही सुविधा पुरविली जात आहे. ई-अभिलेख या कार्यक्रमाद्वारे महाराष्ट्र सरकार जवळपास 30 कोटी जुने अभिलेख उतारे उपलब्ध करून देणार आ त्यामध्ये अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, जळगाव, लातूर, मुंबई उपनगर, नंदूरबार, नाशिक, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे.

1880 पासूनचे जमिनाचे सातबारा फेरफार पाहण्यासाठी ऑनलाईन पद्धत पाहू

  • https://mahabhumi.gov.in/mahabhumilink या वेबसाईटवर जा.
  • या पेजवर उजवीकडील भाषा या पर्यायावर क्लिक करून तुम्ही मराठी भाषा निवडा
  •  तुम्ही नवीन वापरकर्ता असाल तर लॉगीन करण्यासाठी तुमचं नाव, मधलं नाव आणि आडनाव. त्यानंतर जेंडर (मेल आहे की फिमेल), नॅशनलिटी म्हणजेच राष्ट्रीयत्व, त्यानंतर मोबाईल नंबर यांच्या सहाय्याने रजीस्ट्रेशन करणे आवश्यक असते.
  • रजीस्ट्रेशन झाल्यानंतर युझरनेम आणि पासवर्डच्या मदतीने तुम्ही लॉगीन करु शकता.
  • लॉगीन केल्यानंतर तुमच्यासमोर एक पेज उघडेल, तेथे तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची निवड करायची आहे. तालुका, गावाचं नाव आणि  अभिलेख प्रकार टाकायचा आहे.
  • जर तुम्हाला सातबारा हवा असेल तर सातबारा, आठ-अ हवा असेल तर आठ-अ पर्याय निवडायचा आहे. असे जवळपास 58 अभिलेखांचे प्रकार यात उपलब्ध आहेत.
  • त्यानंतर गट क्रमांक टाकून शोध या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
  • फेरफाराचं वर्षं आणि क्रमांक तिथं दिलेला असतो. तुम्ही त्यावर क्लिक करून संबंधित वर्षाचा फेरफार पाहू शकता.

वरील  ऑनलाईन प्रक्रियेचा वापर करुन तुम्ही तुमच्या जमिनीचे सातबारा फेरफार घरच्याघरी मोबाईल अथवा लॅपटॉपवर पाहू शकता. तसेच तुम्हाला माहित असलेल्या गट क्रमांकाच्या जमिनीचा संपूर्ण इतिहास समजून घेऊ शकता.

आपल्या जमिनीचे सातबारा फेरफार ऑनलाईन पाहण्याच्या शासनाच्या या सुविधेचा कोणाकोणाला फायदा होतोय ते पाहू

जात प्रमाणपत्र काढण्यासाठी

जात प्रमाणपत्र काढण्यासाठी लागते वंशावळ आणि वंशावळ काढण्यासाठी जुन्या सातबाऱ्यावरून काही जुने सर्वेनंबर असतात त्यावरुन माहिती मिळवावी लागते. अशा पद्धतीने एखादा जुना सर्वे नंबर किंवा जमिनीच्या सातबाऱ्यातील जुने फेरफार पाहण्यासाठी आपल्याला भूमी अभिलेख कार्यालयात जावे लागत असे. तेथे गेल्यानंतर तेथील अधिकाऱ्यांकडे आपल्या जमिनीचा गट क्र. सांगून त्याचे जुने अभिलेख मिळवावे लागत परंतु या सगळ्या प्रक्रियेत खूप वेळ जात असे. तेथील अधिकारी सुट्टीवर गेले किंवा शासकीय कार्यालयीन सुट्ट्या आल्या की मग आपले काम अधिकच लांबणीवर पडत असे. या सगळ्या कामांसाठी लागणारा वेळ पाहता सामान्य नागरिक कंटाळून जात असे. परंतु आता 2019 पासून सुरु करण्यात आलेली ही सेवा म्हणजेच land record 1880 म्हणजेच १८८० पासूनचे सर्व जमिनीचे सातबारा फेरफार आता आपल्याला ऑनलाईन पद्धतीने पाहता येणार आहेत.

जमिनी खरेदी विक्री करणाऱ्यांसाठी

ग्रामिण असो वा शहरी भागात कुठेही जमिनीचे व्यवहार करताना सर्वात प्रथम सातबारा व त्यातील फेरफार पाहिले जातात. त्यानंतर जमिनीचे व्यवहार शक्य असतात. जमीन खरेदी विक्री करणाऱ्या प्रत्येकाला आता 1880 पासूनचे सर्व land record कोणत्याही अत्याधिक खर्चाशिवाय पाहता येणार आहेत. तसेच भूमी अभिलेख कार्यालयाच्या फेऱ्या न मारता घरबसल्या जमिनीचे सातबारा पाहता येणार आहेत.

शेतकऱ्यांना शेतीचे वाटप करण्यासाठी

शेतकरी बांधवांमध्ये शेतीच्या वाटपावरुन मेहमीच वाद होत असतात. यावेळी शासनाच्या या सुविधेमुळे शेतकऱ्यांना कोणती जमीन कोणाच्या नावावर आहे किंवा त्या त्या जमिनीचा सातबारा कोणाच्या नावावर आहे हे ऑनलाईन पद्धतीने अगदी घरच्या घरी तपासता येते.

Ferfar Online Maharashtra: आता 1880 सालापासूनचे सातबारा व फेरफार उतारे, असे पहा ऑनलाईन

Ferfar Online Maharashtra : जर आपण एखादी जमिन खरेदी करणार असतो, तेव्हा आपल्याला त्या जमिनीचा इतिहास म्हणजेच ती कुणाच्या नावावर आहे हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं नाहीतर अतिशय महत्त्वाचे असते. (Ferfar Utara in Marathi Online) यामुळे हजारो-लाखो रुपये देऊन खरेदी केलेल्या जमिनी साठी कोर्ट-कचेऱ्यांचे चक्कर मारावे लागतात.

Ferfar Online Maharashtra
Ferfar Online Maharashtra


तुम्हाला हे माहीतच असायला हवं की, जमीन खरेदी पूर्वी त्या जमिनीचा मूळ मालक कोण? नंतर त्या जमिनीत काय बदल झाले. तर ही सर्व माहिती 1880 पासूनचे जुने सातबारा, फेरफार व खाते उताऱ्यावर मिळेल. आता तुम्हाला सन 1880 साला पासूनचे जुने फेरफार उतारे ऑनलाईन पाहता येईल.
फेरफार उतारे ऑनलाईन पाहण्याची सुविधा महाराष्ट्रातील 19 जिल्ह्यांत पुरविली जात आहे. लवकरच ही सुविधा महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत सुरू केली जाणार आहे. तर ही सुविधा कोणत्या जिल्ह्यांत सुरू आहे ते आपण जाणून घेऊ या. (Satbara Online Maharashtra)

‘या’ 19 जिल्ह्यांत सुविधा सुरू.. Ferfar Online Maharashtra
अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, पालघर, रायगड, ठाणे, सिंधुदुर्ग, नंदूरबार, लातूर, मुंबई उपनगर, नाशिक, वाशिम, यवतमाळ, जळगाव या जिल्ह्यांत ही सुविधा सुरू आहे. (Land Record Maharashtra Online)

1880 सालापासूनचे जुने फेरफार, सातबारा व खाते उतारे ऑनलाईन पाहण्यासाठी खाली दिलेल्या स्टेप बघा.
असे पहा 1880 सालापासूनचे उतारे Ferfar Online Maharashtra

Click
  • या वेबसाईटवर आल्यानंतर, लॉगिन आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा.
  • जर तुम्ही या वेबसाईटवर पहिल्यांदा आला असाल, तर ‘New User Registration’ पर्यायावर क्लिक करा.
  • यानंतर, तुमच्यासमोर एक फॉर्म ओपन होईल. ज्यामध्ये वैयक्तिक माहिती आणि पत्ता संबंधित माहिती विचारली जाईल. ही माहिती व्यवस्थित भरून सबमिट करा.
  • आता तुमचा लॉगिन आयडी तयार होईल. हा लॉगिन आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्या.
  • जुना फेरफार उतारा पाहण्यासाठी तुमचा जिल्हा, तालुका, गावाचे नाव व अभिलेखाचा प्रकार निवडून घ्या.
  • जो फेरफार उतारा तुम्हाला पाहायचा असेल तो निवडून घ्या. जसे, सातबारा व 8अ, फेरफार यामधील जो तुम्हाला हवा तो पर्याय निवडा.
  • यानंतर तुमचा गट क्रमांक टाकून ‘Search’ बटणावर क्लिक करा. (Ferfar Online Maharashtra)
  • तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल, ज्यात तुमच्या गट क्रमांकाशी संबंधित माहिती येईल.
  • येथे तुम्हाला कोणत्या वर्षाचा फेरफार उतारा पाहायचा ते वर्ष निवडा. तुमच्यासमोर फेरफार उतारा ओपन होईल.

हे देखील वाचा

Click

मोबाईल नंबर टाकून कोणाचेही लाईव्ह लोकेशन बघा

सिबिल स्कोअर असा चेक करा आपल्या मोबा

Leave a Comment