Personal Loan घेणे म्हणजे अनेक जणांना संकट ओढवण्यासारखे वाटते. कारण त्यावर भरमसाठ व्याज ( Interest Rate) द्यावे लागते. पण अडी-अडचणीला पर्सनल लोनच्या मदतीने अनेक कामे सोपी होतात. पर्सनल लोन अवघ्या काही तासात मिळते. काही वित्तीय संस्थांचे अॅपवर अवघ्या काही मिनिटात वैयक्तिक कर्ज दिले जाते. या कर्जासाठी जादा कागदपत्रे देण्याची गरज भासत नाही. वैयक्तिक कर्जाची प्रक्रिया तात्काळ पूर्ण होते. लग्नकार्य, घराची डागडुजी, क्रेडिट कार्डचे बिल चुकते करणे तसेच वैयक्तिक कामासाठी अनेक जण पर्सनल लोन घेतात.
तुम्हाला Personal lone देऊ शकणाऱ्या भारतात कार्यरत असलेल्या 25 बँकांची यादी पुढील प्रमाणे
क्र. | बँकेचे नाव | इंड्रेस्ट रेट | प्रोसेसिंग फी |
१ | HDFC Bank | 10.5% p.a. – 21.00% p.a. | 2.50% |
२ | ICICI Bank | 10.50% p.a. – 16.00% p.a. | 2.50% |
३ | Yes Bank | 10.99% p.a. – 20% p.a. | 2% |
४ | Axis Bank | 10.49% p.a.- 22% p.a. | 2% |
५ | Kotak Mahindra Bank | 10.99% | 3% |
६ | IndusInd Bank | 10.25% p.a. – 26% p.a. | 3% |
७ | Tata Capital | 10.99% | 3.5% |
८ | Bank of India | 10.25% | 2% |
९ | State Bank of India | 11.05% p.a. – 14.05% p.a. | 1.50% |
१० | Karnataka Bank | 12% and 17% | बँकेच्या नियमाप्रमाणे |
११ | Aditya Birla Capital | 14% p.a. -26% p.a. | 2% |
१२ | Bank of Baroda | 10.90% p.a. – 18.25% p.a. | 2% |
१३ | IDBI Bank | 10.50% p.a. – 13.25% p.a. | बँकेच्या नियमाप्रमाणे |
१४ | South Indian Bank | 13.1% p.a. – 20.6% p.a. | 2% |
१५ | City Union Bank | बँकेच्या नियमाप्रमाणे | 1.00% |
१६ | Ujjiyan Small Finance Bank | बँकेच्या नियमाप्रमाणे | बँकेच्या नियमाप्रमाणे |
१७ | Bank of India | 10.25% | 2% |
१८ | Karur Vysya Bank | 10.75% p.a. – 13.75% p.a. | 0.50% |
१९ | J&K Bank | 12.40% p.a. – 13.40% p.a. | 1% |
२० | Punjab National Bank | 11.40% p.a. | 1.00% |
२१ | Bank of Maharashtra | 10.00% p.a. | 1% |
२२ | Central Bank of India | 12.00% p.a. – 12.75% p.a. | 1% |
२३ | RBL Bank | 14% p.a. – 23% p.a. | 3.5% |
२४ | IndusInd Bank | 10.25% p.a. – 26% p.a. | 3% |
२५ | Federal Bank | 11.49% p.a. – 14.49% p.a. | बँकेच्या नियमाप्रमाणे |
Personal lone देणाऱ्या बँकांचे व्याजदर का जास्त का असतात?
Personal lone देणाऱ्या बँका अगदी कमी कागदपत्रांवर तुम्हाला कर्ज पुरवतात. म्हणजे केवायसीच्या फार बागुलबुवा न करता, कुठलीही हमी नसताना, हमीदार नसताना बँक कर्ज पुरवठा करते. म्हणजे बँक वैयक्तिक कर्जामध्ये अधिक रिस्क घेत असते. हा बँकेसाठी एक जुगार असतो. कारण सर्वचजण वेळेवर कर्ज फेडत नाहीत. त्यामुळे बँका देत असलेल्या वैयरक्ति कर्जावर जादा व्याजदर आकारतात. ते त्यांच्या आमदनीचे देखील एक साधन असतो.
Personal lone मिळविण्यासाठी पुढील कागदपत्रे तयार ठेवा
Personal lone मिळविण्यासाठी अर्जदाराला काही कागदपत्रांची तरतूद करावी लागते. ती पुढीलप्रमाणे.
- तुम्ही नोकरदार असाल तर वेतनाचा तपशील
- राहत्या ठिकाणाचा पुरावा
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- बँक स्टेटमेंट
- फोटो
Personal lone मिळविण्यासाठी क्रेडीट स्कोअर चांगला असणे महत्त्वाचे
क्रेडिट स्कोर म्हणजेच तुमच्या आर्थिक व्यवहारांचा इतिहास. क्रेडिट स्कोअर Credit score चांगला असेल तर वैयक्तिक कर्जावरील व्याज कमी होतो. जादा क्रेडिट स्कोर असणाऱ्या ग्राहकांना बँका व्याजदर कमी आकारतात. तसेच त्यांना जादा कर्ज मिळू शकते. क्रेडिट स्कोर चांगला ठेवण्यासाठी क्रेडिट कार्ड बिल, कर्जावरील ईएमआय आणि इतर कर्ज वेळेवर चुकते करणे अर्जदाराला भविष्यात वैयक्तिक कर्ज मिळवताना फायद्याचे ठरते.
सॅलरी अकाऊंटचा वापर तुम्ही नोकरदार असाल तर कर्ज घेताना सॅलरी अकाऊंटचा वापर करणे आवश्यक आहे. तुमची सॅलरी हिस्ट्री पाहून बंका कर्ज देतात. त्यामुळे बँकांना तुमच्यावर विश्वास वाढतो. बँका तुम्हाला कमी व्याजदरात कर्ज देतात.