PNB e Mudra Loan 2023: घरबसल्या मिळवा 50000 ते 1000000 पर्यंतचे कर्ज

PNB e Mudra Loan 2023

PNB e Mudra Loan 2023 पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank) ही बँक ग्राहकांना अनेक विशेष सेवा पुरवते. जर तुम्हालाही पैशांची गरज असेल किंवा तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू (Business Opportunity) करण्याचा विचार करत असाल तर बँक तुम्हाला 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळवून देण्यास मदत करते.

PNB e Mudra Loan 2023 या योजनेंतर्गत बँक ग्राहकांना 50,000 ते 10 लाखांपर्यंत कर्ज देते. पंजाब नॅशनल बँकेची ही प्रधानमंत्री मुद्रा योजना (‘Pradhan Mantri Mudra Yojana’) आहे. एखादा छोटा व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा त्याचे जुने काम वाढवण्यासाठी सरकारने 10 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. त्यांतीलच ही एक योजना. पंजाब नॅशनल बँकेमधून तुम्हाला हे 10 लाख रुपये कर्ज म्हणून मिळतील. सरकारच्या या योजनेचे नाव पीएम मुद्रा कर्ज योजना (PMMY Scheme) असे आहे.

PNB e Mudra Loan योजनेचे तीन प्रकार आहेत.

 1. शिशु कर्ज योजना

 यामध्ये 50,000 रुपयांपर्यंत कर्ज मिळते.

   2  किशोर कर्ज योजना

        यामध्ये 50,000 रुपये ते 5 लाखापर्यंत कर्ज मिळते.

 • तरुण कर्ज योजना

यामध्ये 5 लाख ते 10 लाखापर्यंत कर्ज मिळू शकते.

PNB e Mudra Loan योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

 • २ नवीन पासपोर्ट आकाराचे फोटो.
 • अर्जदाराचा ओळखीचा पुरावा.
 • अर्जदाराचे रहिवासी प्रमाणपत्र.
 • पॅनकार्ड
 • आधारकार्ड
 • मागील तीन वर्षांचे आरटीआय रिटर्न कागदपत्र
 • जर अर्जदार एससी, एसटी, ओबीसी, अल्पसंख्याक इत्यादीं असेल तर जातीचे प्रमाणपत्र.
 • व्यवसायाचे लायसन्स (आवश्यक असल्यास).
 • व्यावसायासाठी खरेदी करायच्या वस्तूंचा तपशील (जर आवश्यक असेल तर).
 • बिझनेस प्लान.
 • प्रोजेक्ट रिपोर्ट
 • फॉर्म पूर्णपणे भरून आवश्यक कागदपत्रांसह जमा करा.

असा करा अर्ज PNB  ई-मुद्रा कर्जासाठी

 • तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. (http://www.mudra.org.in/) येथून तुम्हाला कर्जासाठीचा अर्ज भरावा लागेल.
 • शिशु कर्जासाठी फॉर्म वेगळा आहे.
 • किशोर आणि तरुणांसाठी एकच फॉर्म आहे.
 • कर्ज अर्जामध्ये मोबाईल नंबर आधार क्रमांक, नाव, पत्ता इत्यादी तपशील भरा.
 • 2 पासपोर्ट फोटो जोडा.
 • फॉर्म भरल्यानंतर कोणत्याही सार्वजनिक किंवा खासगी बँकेत जा आणि सर्व प्रक्रिया पूर्ण करा.
 • बँकेचे शाखा व्यवस्थापक तुमच्याकडून कामाची माहिती घेतात. त्या आधारावर PMMY मार्फत तुम्हाला कर्ज मंजूर करते.

PNB ई-मुद्रा योजनेअंतर्गत कोण करू शकतो अर्ज?

पीएनबी सेवा योजनेसाठी पात्रतेमध्ये वैयक्तिक/ भागीदारी/ मर्यादित दायित्व भागीदारी (LLP)/ प्रायव्हेट लिमिटेड कंपनी/ पब्लिक लिमिटेड कंपनी/ ट्रस्ट/ सोसायटी आणि सहकारी संस्था (लागू कायद्यानुसार नोंदणीकृत आणि अंतर्भूत) यांचा समावेश होतो. तसेच जीएसटी नोंदणीकृत क्रमांक आणि उद्योग आधार क्रमांक असलेले एमएसएमई उपक्रम या योजनेसाठी अर्ज करू शकतात.

पंजाब नॅशनल बँकेचत मुद्रा कर्ज योजनेचा  व्याजदर

मुद्रा लोनसाठी एकसमान व्याजदर नाही. प्रत्येक बँक आपापल्या परीने व्याज आकारते. साधारणपणे, कर्जाची रक्कम आणि व्यवसायाच्या स्वरूपावर व्याज ठरते. व्यवसायात अधिक जोखीम असल्यास बँका जास्त दराने कर्ज देतात. सामान्यतः मुद्रा लोन १०-१२% वार्षिक व्याज दराने मिळते.

 PNB ई-मुद्रा योजनेचे (PMMY Scheme) फायदे.

 • PNB e-mudra loan मुद्रा योजनेअंतर्गत हमी शिवाय कर्ज उपलब्ध आहे.
 • याशिवाय कर्जासाठी कोणतेही प्रक्रिया शुल्क आकारले जात नाही. मुद्रा योजनेतील कर्जाची परतफेडीचा कालावधी 5 वर्षांपर्यंत वाढवता येते.
 • बँकेत न जाता देखील घरबसल्या तुम्ही PNB ई-मुद्रा योजनेसाठी अप्लाय करु शकता.
 • अतिरिक्त कागदपत्रांची गरज नसते.
 • या योजनेअंतर्गच अर्जदाराला खेळते भांडवल मिळवता येते.
 • सामान्य व्यवसायाच्या उद्देशासाठी स्थिर मालमत्ता/ उपकरणे मिळविण्यासाठी मुदत कर्ज मिळवताय ते.
 • मुदत कर्जाच्या परतफेडीचा कालावधी कमाल सात वर्षांचा असेल, पण ऑफरच्या गुणवत्तेच्या आधारावर पुढील उच्च अधिकाऱ्याद्वारे परतफेड वाढवण्याची परवानगी दिली जाऊ शकते.
 • खेळत्या भांडवलाच्या मर्यादेच्या बाबतीत मंजुरीची वैधता एक वर्ष असेल.
 • अर्जदाराचा सिबिल स्कोअर किंवा क्रेडिट स्कोअर तपासला जात नाही. एखाद्या व्यवसायाची उत्तम संकल्पना अर्जदाराकडे असेल तर त्याला PNB ई-मुद्रा योजनेअतंर्गत कर्ज मिळू शकते.