SBI recruitment 2023: पदवीधरांसाठी SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी

SBI recruitment 2023

SBI recruitment 2023 म्हणजेच SBI ही भारतातील सर्वात 200 वर्षे जुनी बँक असून, सध्यस्थिती पाहता बँकिंग क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. या बँकेचे मुख्य कार्यालय मुंबई येथे आहे. तसेच नवी  दिल्ली, पटना, कानपूर, हैदराबाद, भोपाल,  बेंगलुरु, भुवनेश्वर, गुवाहाटी, चंदिगड  येथे या बँकेची स्थानिक कार्यालये आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या भारतात तब्बल 22,219  शाखा आहेत. ही बँक जगभरात काम करीत असून भारतामध्ये या बँकेची 57  प्रादेशिक कार्यालये आणि 16  प्रादेशिक केंद्रे आहेत. भारतात आणि परदेशात एसबीआय च्या शाखांचे जाळे नागरिकांना विविध प्रकारच्या बँकिंग सुविधा देत आहे.

एसबीआय बँकेने आतापर्यंतची सर्वात मोठी भरती जाहीर केली आहे. केवळ पदवीधर तरुण तरुणींच या पदांसाठी अर्ज करु शकतात. या भरतीसंदर्भात सविस्तर माहिती देण्यासाठी हा लेख घेऊन आम्ही आलो आहोत. तुम्ही SBI च्या या पदभरतीसाठी इच्छूक असाल तर हा लेख पूर्ण वाचा. आणि दिलेल्या माहितीनुसार अर्ज करा. 

SBI भरती कोणत्या पदासाठी होत आहे?

       SBI ने घेषित केलेली भरती ही लिपिक म्हणजेच कनिष्ठ सहकारी या पदासाठी होत आहे.

SBI भरतीसाठीच्या एकूण पदसंख्या किती?

SBI ने घेषित केलेली भरतीमध्ये 8773 इतकी पदे भरली जाणार आहेत.

SBI भरतीसाठी अर्जदाराची शैक्षणिक पात्रता काय असावी?

  • अर्जदार कला, वाणिज्य किंवा विज्ञान यापैकी कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा

SBI भरतीसाठी अर्जदाराची वयोमर्यादा किती असावी?

  • खुला गटातील अर्जदाराचे वय 28 वर्षापेक्षा जास्त नसावे
  • एससी आणि एसटी अर्जदाराचे वय 33 वर्षांपेक्षा जास्त नसावे
  • ओबीसी अर्जदाराचे वय 31 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
  • अपंग व्यक्ती (सामान्य) अर्जदाराचे वय 38 वर्षांपेक्षा जास्त नसावे
  • अपंक व्यक्ती (एससी, एसटी) अर्जदाराचे वय 43 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

SBI भरतीसाठी अर्जदाराकडे कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे?

  • कला, वाणिज्य किंवा विज्ञान यापैकी कोणत्याही शाखेतून पदवीधर असल्याचे प्रमाणपत्र (10वी/12वी मार्कशीट देखील अडलोड करण्यासाठी सोबत ठेवावे)
  • आधारकार्ड
  • पॅनकार्ड
  • जात प्रमाणपत्र
  • डोमिसाईल प्रमाणपत्र
  • अनुभव प्रमाणपत्र (अनुभव असल्यास)
  • ठराविक आकाराचे डिजिटल फोटो (size 20kb to 50kb; dimension 200*230)
  • मोबाईल क्र. आणि ईमेल आयडी (ऑनलाईन रजीस्ट्रेशनसाठी)

SBI भरतीसाठी अर्ज भरण्याची फी किती आहे?

  • सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस अर्जदारांसाठी 750 रु फी शासनाकडून ठेवण्यात आली आहे.
  • एसटी, एससी, पीडब्ल्यूडी अर्जदारांसाठी कोणत्याही प्रकारची फी भरण्याची गरज नाही.

अर्ज दाखल करण्याची पद्धत काय आहे?

SBI मार्फत तब्बल 8773 इतकी पदे भरती खुली झाली आहे. या परिक्षेसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे. https://ibpsonline.ibps.in/sbijaoct23/ या लिंकवर क्लिक करून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरु शकता.

परिक्षा पास झाल्यानंतर किती पगार असेल?

SBI ची परिक्षा पास होऊन पद प्राप्त झाल्यानंतर व्यक्तीला 26 ते 29 हजार रुपयांपर्यंत पगार असणार आहे.

SBI भरतीसंदर्भातील अर्ज कधीपासून कधीपर्यंत भरु शकतो?

  • दि.  17 नोव्हेंबर 2023 पासून भरतीसाठीचे अर्ज अर्जदारांनी ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत
  • SBI भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे  दिनांक 7 डिसेंबर 2023

SBI भरतीसंदर्भातील अधिक माहितीसाठी

स्टेट बँक ऑफ इंडियामधील भरतीबाबतची अधिक माहिती मिळविण्यासाठी

https://drive.google.com/file/d/1TU5XzLefeGureMdfP8JL6HD5tMobID9I/view?pli=1 या लिंकवर क्लिक करा.

State Bank Of India मधील नोकरीचे फायदे

  • स्टेट बँक ऑफ इंडिया ही बँक भारतातील सर्वात जुनी आणि सर्वात मोठी बँक आहे.
  • या बँकेतील कर्मचाऱ्यान केवळ 2 टक्के व्याजावर कोणतेही कर्ज घेता येते.
  • बँकेत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना केंद्राच्या आर्थिक धोरणानुसार पगारवाढ मिळत असते.
  • एसबीआय कर्मचाऱ्यांना बुक ग्रांट, न्यूजपेपर अलाउंस, फोन बिल, कन्वेयंस अलाउंस, ब्रीफकेस अलाउंस, मेडिकल सुविधा, एलटीसी/ एलएफसी, महागाई भत्ता असे विविध भत्ते पगारासोबत मिळत असतात.
  • राहण्यास घर मिळते.
  • भारतात विविध ठिकाणी एसबीआयच्या शाखा असल्याने भारतातील कोणत्याही राज्यात नोकरी मिळू शकते.