Mobile Hack check online: आपण ज्या टेक्नॉलॉजीच्या विश्वात राहतो तेथे मोबाईल हा आपल्या जीवनशैलीचा जणू एक भागच बनला आहे. आपण आपल्या मोबाईलवर शॉपिंग करतो, बिलं भरतो, बस, ट्रेनची तिकीटे बुक करतो, बँकेचे सर्व आर्थिक व्यवहार मोबाईलनेच केले जातात. हल्ली सगळ्यांचीच ऑफिसची कामे किंवा इतर कोणतीही कामे फक्त एका फोनवर होतात.आजच्या जगात मोबाईल टेक्नॉलॉजीचा खूप वापर होत आहे.त्यामुळे सध्या फोन हा आपल्यासाठी आपला एक अवयवच बनला आहे.
मोबाईल हॅकिंगचे वाढते प्रमाण
नव तंत्रज्ञानाचे जसे अनेक फायदे आहेत, तसेच तोटेही असल्याचे आपल्या निदर्शनास येते. जसे की आपण पाहू शकतो हल्ली हॅकर्स अगदी सहजपणे कोणाचाही मोबाईल फोन हॅक करु शकतात आणि युजर्सची अतीमहत्त्वाची माहिती आणि आर्थिक व्यवहार हँडल करु शकतात. म्हणूनच तुमचा फोन हॅक तर झाला नाही ना, तुमचे अतीमहत्त्वाचे पर्सनल फोन कॉल्स कुणी ऐकत तर नाही ना? हे जाणून घेणं खूप महत्वाचे आहे. मग तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की, हे आपण कसे ओळखायचे. त्यासाठीच आम्ही आजचा हा लेख तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. आज आपण या लेखाच्या माध्यमातून अगदी सविस्तरपणे समजून घेणार आहोत की, आपला फोन हॅकिंगपासून कसा वाचवायचा आणि आपला फोन हॅक झाला असेल तर ते कसं ओळखायचं. Mobile Hack
Mobile Hack check online दुसरी व्यक्ती आपल्या नकळत सिक्रेट कॉल्स ऐकतेय हे कसं ओळखायचं?
आज आपण या लेखाच्या मदतीने एका महत्त्वाच्या ट्रिक्सबद्दल पाहणार आहोत, ज्यात आपण चेक करू शकतो की आपले सिक्रेट कॉल्स कोण ऐकत आहे. Mobile Hack
तुम्हाला तुमचे कॉल्स कोणी तिसरी व्यक्ती ऐकतंय या बाबत जाणून घ्यायचे असेल तर तुमच्या फोनवर *#61# हा कोड डायल करा. यानंतर तुमच्या फोनच्या स्क्रीनवर एक पॉप-अप उघडेल त्यामध्ये काही डिटेल्स समोर येतील. आणि लगेचच तुम्हाला कळेल की तुमचे कॉल कोणत्या नंबरवर फॉरवर्ड केलेले आहेत. समोर दिसणाऱ्या नंबर पैकी तुमच्या ओळखीचे नंबर नसतील तर तुम्ही लगेचच ते नंबर डिलीट करु टाका. Mobile Hack
- तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या पॉप-अप स्क्रीनवर दिसेल की, जेव्हा कोणी कॉलला रिप्लाय करणार नाही किंवा फोन नेटवर्क मध्ये नसेल तेव्हा कॉल ऑटोमॅटिक फॉरवर्ड केला जाईल.
- जर का एखाद्या नंबरवर तुमचा कॉल किंवा मेसेज फॉरवर्ड केलेला असेल तर तो नंबर तुम्हाला तुमच्या मोबाईल स्क्रीनवर दिसेल. यानंतर लगेचच तुम्ही तो नंबर ब्लॉकही करू शकता.
आपला फोन हॅक झालंय कसं ओळखायचं? Mobile Hacked Sing:
हल्ली हॅकिंगचे अनेक केसेस आपल्या कानावर येतात, स्मार्टफोन तर अगदी सहज हॅक केले जात आहे. तुम्हाला देखील असं वाटत असेल की तुमचा फोन हॅक झाला आहे, तर हे नेमकं कसं ओळखायचं की तुमचा फोन हॅक झाला आहे.
- तुमच्या मोबाईलची बॅटरी आधीपेक्षा कमी काळ चालत असेल तर तुम्ही समजू शकता की, तुमचा फोन हॅक झाला आहे.
- तुमच्या फोनमधील मोबाईल डाटा म्हणजेच इंटरनेट लवकर दिलेल्या वेळे आधीच संपत असेल आणि मोबाईल डाटाचा तुम्ही जास्त वापर करीत नसाल तरीही तुमचा मोबाईल डाटा वेळे आधीच संपत असेल तरी नक्कीच तुम्ही समजू शकता की तुमचा मोबाईल हॅक (Mobile Hack check online) झालेला आहे.
बदलत्या तंत्रज्ञानाचे फायदे
सध्याच्या बदलत्या तंत्रज्ञानाचे जसे दुष्परीणाम आहेत तसेच फायदे देखील आहेत. हल्ली तर मोबाईच्या माध्यमातून फ्रॉड करणाऱ्यांवर लगाम लावण्यासाठी शासनाने विविध सायबर नियम देखील बनवले आहेत. ज्याच्या मदतीने आपण सायबर गुन्हे करणाऱ्यांना तुरुंगात पोहोचवू शकतो.
- कॉल सुरु असताना दुसऱ्या व्यक्तीच्या अनुमती शिवाय कॉल रेकॉर्डिंग करणे हा गुन्हा समजला जातो त्यामुळे आताच्या स्मार्टफोनमध्ये कॉल रेकॉर्डिंगचे फचर्स नसते.
- दुसऱ्याचे कॉल्स चोरुन ऐकणे हा देखील कायद्यानुसार गुन्हा मानण्यात आलेला आहे.