Gold Mortgage Loan: वाढती महागाई वैद्यकीय खर्च आणि शिक्षणाचे खर्च पाहता अनेकांना विविध कारणांसाठी पैशांची गरज असते. बरेचदा बँकांमध्ये कर्जासाठी अर्ज करुन देखील सिबिल स्कोअर चांगला नसेल तर लोन मिळविणे कठिण होते. अशावेळी काय करावे हा प्रश्न भेडसावत असेल तर आम्ही तुमच्यासाठी सोने तारण कर्जाविषयीची माहिती घेऊन आलो आहोच.
सोने तारण कर्ज संदर्भातील आवश्यक माहिती
आर्थिक संकट कधी आणि कसे याईल काहीच सांगता येत नाही. मग ते शैक्षणिक खर्चासाठी असो किंवा वैद्यकिय खर्चासाठी असो अशावेळी आर्थिक संकटांमधून मार्ग काढण्यासाठई सोने तारण कर्ज हा अतिशय सोपा व सुरक्षित मार्ग ठरतो. आपल्याकडे जर का सोने असेल तर कोणत्याही कागदपत्राशिवाय झटपट आपल्याला एकरकमी कर्जाची रक्कम मिळविता येते. परंतु अनेकदा सोने तारण कर्ज मिळवताना फसवाफसवी देखील होऊ शकते त्यामुळे अत्यंत सावधगिरीने हा व्यवहार करणे गरजेचे असते. म्हणूनच आम्ही सोने तारण कर्ज ठेवताना नक्की कोणोकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची असते. या पासून ते सोने तारण कर्ज काढताना सोन्यावर किती रुपयांचे कर्ज मिळू शकते, आवश्यक कागदपत्रे कोणती? महत्त्वाचे फायदे, प्रक्रिया शुल्क, परतफेड कालावधी या सर्व बाबींची सविस्तर माहिती आजच्या लेखामधून घेऊन आलो आहोत. त्यासाठी लेख संपूर्ण वाचा. Gold Mortgage Loan
सोने तारण ठेवताना सोन्यावर किती कर्ज मिळते?
सोने तारण ठेवताना सोन्यावर किती कर्ज मिळते? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर तुम्हाला त्याचे उत्तर इथेच मिळेल. सोन्यावर 10 हजारापासून ते 1 कोटीपर्यंत कर्जाची रक्कम दिली जाऊ शकते. बँक असो किंवा वित्तीय संस्था त्यामधुन दिल्या जाणाऱ्या वैयक्तिक कर्जाच्या तुलनेत सोने तारण कर्जावर अत्यंत कमी व्याजदर आकारला जातो. तुमच्याकडे असलेले सोने जर 18 कॅरेट, 22 कॅरेट किंवा 24 कॅरेटचे असेल तरच तुम्हाला गोल्ड लोनसाठी अर्ज करता येतो. परंतु तुमच्याकडे असलेल्या सोन्यावर किती कर्ज देता येईल याबाबत त्या त्या बँकेचे किंवा वित्तीय संस्थांचे विविध दर असतात. परंतु नियमानुसार आरबीआयकडून सोन्याच्या कर्जाची मर्यादा 75% इतकी निश्चित करण्यात आली आहे. उदाहरणच सांगायचे झाले तर तुम्ही 1 लाख रुपयांचे सोने तारण ठेवले असल्यास अंदाजे 75 हजार रुपये इतके कर्ज तुम्हाला मिळू शकेल. Gold Mortgage Loan
सोने तारण ठेवताना कोणती काळजी घ्यावी
तुम्हाला कधीही सोने तारण ठेवायचे असल्यास ते सोने तुम्ही जिथे कुठे तारण ठेवणार असाल त्या बँक किंवा वित्तीय संस्थेची संपूर्ण माहिती घ्यावी, ती बँक सोन्यावर किती कर्ज तारण म्हणून देते, व्याजाचा दर काय ही आवश्यक माहिती घ्यावी. शक्य असल्याल आजूबाजूच्या किमान 4 ते 5 बँकांमध्ये जाऊन ही सर्व माहिती मिळवावी. आणि व्याजदर आमि कर्जाच्या रकमेत तुलना करावी. इतकेच नाही तर बँक तुम्हाला सोन्यावर कर्ज देताना प्रोसेसिंग फी देखील घेत असते तर त्याबद्दल म्हणजेच प्री-पेमेंट, प्रोसेसिंग-फी, री-पेमेंट चार्जेस ही सर्व माहिती मिळवावी. Gold Mortgage Loan
सोने तारण कर्ज मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- पासपोर्ट आकाराचे दोन फोटो
- अर्जदाराचे आधारकार्ड, पॅनकार्ड
- मतदार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स
- ज्या खात्यात पैसे हवे आहेत त्या बँक खात्याचा तपशील
गोल्ड लोन मधून मिळणाऱ्या कर्जाचा फायदा
इतर कोणत्याही प्रकारच्या कर्जापेक्षा सोने तारण कर्ज म्हणजेच गोल्ड लोन हे अत्यंत सोपे आणि पटकन मिळणारे कर्ज आहे. या कर्जाचे फायदे देखील तसेच आहेत. ते आपण जाणून घऊया.
- कोणत्याही बँकेतील वैयक्तिक कर्जा कर्जाच्या तुलनेत गोल्ड लोनचा व्याजदर खूपच कमी असतो. त्यामुळे तो व्याजदर चुकवणे अत्यंत सोपे आणि सहज होते.
- सोने तारण कर्जासाठी बँका घत असलेला प्रक्रिया शुल्क, फोरक्लोजर शुल्क इत्यादी शुल्क खूपच कमी किंमतीचे असतात.
- सोने तारण कर्ज मिळविताना अतिरिक्त कागदपत्रांची आवश्यकता नसते.
- सोन्यावरील कर्ज कर्ज मिळविताना अर्जदाराचा सिबिल स्कोर तपासण्याची आवश्यकता नसते. नाहीतर दुसऱ्या कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळविताना बँका सर्वप्रथम अर्जदाराचा सिबिल स्कोअर तपासतात. हा सिबिल स्कोअर 750 पेक्षा कमी असेल तर कर्ज मिळविताना खूप अडचणी येतात. सिबिल स्कोअर संदर्भात अधिक माहिती मिळविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. https://kopargaonlive.com/how-to-check-cibil-score-3/
अशी आहे सोन तारण परतफेड प्रक्रिया
सोने तारण कर्ज घेतल्यानंतर आणि तुमची पैशांची गरज भागल्यानंतर तुम्हाला तुमचे सोने सोडवण्यासाठी घेतलेले कर्जाची परतफेड करायची असते. ही परतफेड करताना देखील बँकांचे आणि वित्तिय संस्थांचे काही नियम असतात ते आपण जाऊन घेऊया. तुम्हाला सोने तारण कर्जाचा काही भाग आणि मुद्दल दरमहा EMI स्वरूपात भरणे अनिवार्य असते. गोल्ड लोनची परतफेड अनेक प्रकारां करता येते. उदा. बुलेट परतफेड, ईएमआय आणि मुद्दलनंतर व्याज भरणे, नियमित ईएमआय स्वरुपात देखील सोने तारण कर्जाची रक्कम भरता येते. Gold Mortgage Loan