शेतकऱ्यांना मिळणार वर्षाकाठी 36 हजार रुपये;केंद्र सरकारची ही योजना तुम्हाला माहिती आहे का?

भारत हा कृषीप्रधान देश आहे. भारतातील शेती ही पारंपरिक पद्धतीने केली जाते. भारतातील विविध राज्यांमधील शेतकरी हे पावसाच्या पाण्यावर शेती करतात. बरेचदा साठवलेल्या पाण्यावर सुद्ध शेती केली जाते परंतु पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर शेती होते. असे असताना पावसाचे प्रमाण कमी जास्त असेल तर त्याचा परिणाम येथील पीकांवर पडतो. आणि कधी शेतकऱ्यांना नफा होतो तर कधी नुकसान. परंतु बरेचदा सलग दोन तीन वर्षे पावसाने एखाद्या जिल्ह्यात दांडी मारली तर तेथील शेतकरी शेतीतून काहीच पिकवू शकत नाहीत. अशावेळी त्यांना शासनाकडून आर्थिक मदतीची अपेक्षा असते. म्हणूनच केंद्र आणि राज्य सरकारने मिळून शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळावे यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेबद्दल सविस्तर माहिती आपण आपल्या आजच्या लेखात पाहणार आहोत. Pm Kisan Mandhan Yojana :

तुम्हाला माहित आहे का ही योजना?

प्रधानमंत्री किसन सन्मान योजना ही शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी राबवण्यात येणारी योजना आहे. अनेक शेतकऱ्यांना शेतीत पीक झाले नाही तर आत्महत्येचा पर्याय स्वीकारावा लागतो या कारणाने महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांनी आतापर्यंत आत्महत्या केली आहे. परंतु शासनाने त्याबाबात ठोस पाऊस उचलत शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करण्याचा निर्णय घेतला आहे त्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राबविण्यात आला. या योजनेसंबंधीत अधिक माहिती पुढे घेऊया. Pm Kisan Mandhan Yojana :

या योजनेची सुरुवात केव्हा करण्यात आली?

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना 1 डिसेंबर 2018 रोजी अंमलात आली. सरकारच्या सुरुवातीच्या घोषणेनुसार, या योजनेसाठी दरवर्षी 75000 कोटी रुपयांचे वाटप केले जाईल. Pm Kisan Mandhan Yojana :

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे फायदे

शेतकऱ्यांना 6,000 रुपये मिळतील जे त्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केले जातील.

ऑनलाइन नोंदणी केल्यावरच त्यांना पैसे मिळतील.

या योजनेचे लाभ पश्चिम बंगाल वगळता भारतातील सर्व राज्यांमध्ये उपलब्ध आहेत.

या प्रणालीसाठी नुकतेच नवीन कायदा मंजूर करण्यात आला आणि पंतप्रधान म्हणतात की यामुळे शेतकरी किंवा त्यांच्या कुटुंबाचे नुकसान होणार नाही.

शेतकरी त्यांच्या पिकांसाठी बियाणे आणि अन्न खरेदी करण्यासाठी या प्रणालीचा वापर करू शकतात. Pm Kisan Mandhan Yojana :

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे

 • अर्जदाराचे आधारकार्ड, रेशनकार्ड
 • जमिनीची मूळ कागदपत्रे
 • अर्जदाराचे बँक पासबुक
 • मतदार ओळखपत्र
 • पासपोर्ट आकाराचा फोटो
 • ड्रायव्हिंग लायसन्स प्रमाणपत्र
 • जमिनीचा संपूर्ण तपशील
 • निवास प्रमाणपत्र
 • अर्जदार किमान 2 हेक्टर जमिनीचा मालक असावा

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अर्ज फॉर्म प्रक्रिया

 • मोदी सरकारने पीएम किसान सन्मान योजनेसाठी स्वतंत्र पोर्टल सुरु करण्यात आले आहे.
 • https://pmkisan.gov.in/ या लिंकवर क्लिक करुन तुम्ही योजनेची माहिती मिळवू शकता आणि वरील पात्रतेनुसार योजनेसाठी अर्ज देखील करु शकता.

या योजनेचा 17 वा हप्ता शेतकऱ्यांना लवकरच मिळणार आहे.

2018 मध्ये सुरु झालेल्या या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा आर्थिक लाभ शेतकऱ्यांनी मिळत आहे. आतापर्यंत 2000 प्रमाणे 16 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. तसेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दुहेरी मदत सुरु करण्यात आली आहे म्हणजेच केंद्र सरकार कडून जसे  दर वर्षाला 6000 शेतकऱ्यांना मिळतात तसेच राज्य सरकार कडून देखील शेतकऱ्यांना 6000 देण्याचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. त्यासंदंर्भात शासन निर्णय देखील काढण्यात आला आहे आणि राज्यातील जिल्ह्यांनुसार शेतकऱ्यांना या निधीचे वाटप देखील करण्यात आले आहे. तुम्ही अजूनही या योजनेसाठी अर्ज केला नसेल तर आजच वरील दिलेल्या लिंकवर क्लिक करुन योजनेसाठी अर्ज करा. Pm Kisan Mandhan Yojana