Agricultural Land: शेजारचा शेतकरी ‘बांध’ कोरत असल्यास  कायदेशीर मार्गाने तुमच्या शेतजमिनीवरील अतिक्रमण हटवा

Agricultural Land शेत जमीनीबाबात राज्य आणि केंद्र सरकारने विविध कायदे अंमलात आणले आहेत. जुन्या कायद्यांमध्ये बदल करुन सध्य परिस्थिती नुसार काही कायद्यांना नव्या पद्धतीने लागू केले गेले आहे. त्यापैकीच एक कायदा म्हणजे अतीक्रमणविरोधीतील कायदे. एखादी व्यक्ती तुमच्या जमिनीत अतिक्रमण करीत असेल तर तुम्ही त्या व्यक्तीस कायदेशीर पद्धतीने धडा शिकवू शकता. आज आपण या लेखाच्या मदतीने हेच समजून घेणार आहोत की, तुमच्या शेत जमिनीमध्ये बाजूचा शेतकरी बांध कोरुन जर का अतिक्रमण करीत असेल, तर त्याच्या विरोधार कायदेशीर कार्यवाही कशी करावी. लेखातील माहिती अत्यंत उपयोगी आहे. त्यामुळे लेख शेवटपर्यंत वाचा.

शेत जमिनीवर अतिक्रमण होते म्हणजे काय?

आज आपण पाहू शकतो की, शहरी भागात असो किंवा ग्रामीण भागात असो जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्यांची संख्या मोठ्याप्रमाणात वाढत आहे. ग्रामिण भागात  शेतजमिनीबाबत हाच प्रकार घडताना दिसून येतो. ज्या शेतकऱ्यांना अतिक्रमणाचा त्रास होत आहे त्या शेतकऱ्यांनी जर त्यांच्या शेत जमिनीतील बांधावर एखाद्या खुणा करून ठेवलेल्या नसतील तर शेजारचा शेतकरी तो बांध कोरून अतिक्रमण करीत राहतो. यामध्ये शेतऱ्यांचे नुकसान होते, यावरुन अनेक भांडणे देखील होतात आणि कोर्ट केसेस देखील. याच संदर्भातील एक परिस्थिती पुढील उदाहरणाच्या मदतीने पाहूया. Agricultural Land

एखाद्या शेतकऱ्याची शेतजमीन आहे आणि त्याच्या बाजूला असलेला शेतकरी त्याचा बांध हळू हळू वाढवत नेतो आणि थोडे थोडे करीत दुसऱ्या शेतकऱ्याची जमीन काबीज करतो. ही प्रक्रिया एका दिवसाची नसते तर हे सतत दोन ते तीन वर्षे सुरु राहिल्यास जमिनीचा मोठा हिस्सा बांध कोरणाऱ्या शेतकऱ्याच्या जमिनीत सामील होतो. वेळीच याबाबत कायदेशीर कार्यवाही केली नसल्यास कालांतराने त्याचे भारी नुकसान सहन करावे लागू शकते. Agricultural Land

कायदेशीर मार्गाने  तुमच्या जमिनीवरील अतिक्रमणाची तपासणी करा

तुमच्या शेतजमिनीवर बाजूच्या शेतकऱ्यांमार्फत अतिक्रमण झाले असे तुमच्या लक्षात आल्यास लगेचच तुम्ही पुढील कायदेशीर लढाई सुरु करा. अतिक्रमण करणाऱ्या शेतकऱ्यासोबत भांडण करण्यात वेळ वाया घालवू नका. कायदेशी बाबी करताना सर्वप्रथम तुम्हाला शासकीय पद्धतीने जमिनीची मोजणी करुन घेणे आवश्यक आहे. शासकीय पद्धतीने जमिनीची मोजणी केल्यानंतर तुमच्या जमिनीची हद्द कायम करण्यासाठी नकाशा ‘क’ प्रत ही शासकीय यंत्रणा तर्फे देण्यात येते.  शासकीय अधिकाऱ्यांमार्फत देण्यात येणाऱ्या नकशावर तुमच्या जमिनीच्या सर्व बाजू दाखवल्या जातात. तसेच तुमच्या कोणत्या जागेवर अतिक्रमण झाले आहे. याची देखील माहीती त्या पत्रकात देण्यात येते.

असा करा अर्ज जमीन मोजणीसाठी?

अर्जदार शेतकरी  जिल्ह्याच्या  तहसील कार्यालयात जाऊन महाराष्ट्र जमीन अधिनियम 1966 कलम 138 नुसार अर्ज करू शकतो. तक्रारदार शेतकऱ्याने केलेला अर्ज  तहसील कार्यालयात अर्ज झाल्यानंतर त्याची तपासणी होते आणि  त्यानंतर कायदेशीर कारवाई केली जाते.

अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे

दुसऱ्या शेतकऱ्याने तुमच्या जमिनीवर केलेले अतिक्रमण रोखण्यासाठी कायद्यांतर्गत कामे करताना अर्ज करावा लागतो, तो अर्ज करताना जमिनीसंबंधीत काही महत्त्वाची कागदपत्रे सोबत जोडणे देखील तितकेच महत्त्वाचे असते. Agricultural Land

  • अतिक्रमण झालेल्या जमिनीच्या भागाचा कच्चा नकाशा अर्जासोबत जोडणे आवश्यक असते.
  •  अर्जदार शेतकऱ्याच्या जमिनीची शासकीय मोजणी झाली असल्यास त्याचा नकाशा जोडणे देखील गरजेचा असते.
  • अतिक्रमण झालेल्या शेत जमिनीचा चालू वर्षातील 7/12 उतारा अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराच्या शेत जमिनीसंदर्भात कोर्टात केस सुरू असल्यास त्या खटल्यासंबंधीत कागदपत्रे जोडणे आवश्यक आहेत.

दुसऱ्या शेतकऱ्याच्या शेतजमिनीत अतिक्रमण करणे ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. यापुढे असे झाल्यास अतिक्रमण करणाऱ्या शेतकऱ्यावर शासकीय कारवाई होऊ शकते. तसेच त्याबदल्यात त्याला दंड देखील भरावा लागू शकतो. त्यामुळे तुम्ही तसे करु नका आणि तुमच्या शेत जमिनीत कोणी बाजूचा शेतकरी अतिक्रमण करीत असेल तर त्याच्या विरोधात शासकीय तक्रार करा आणि वरील सांगितल्या प्रमाणे कार्यवाही देखील करा. Agricultural Land