Anandacha Shidha: रेशनकार्ड धारकांना गुढीपाडवा आणि आंबेडकर जयंती निमित्ताने दोनदा मिळणार आनंदाचा शिधा

Anandacha Shidha

Anandacha Shidha महाराष्ट्र राज्यातील गरजू व गरीब शिधापत्र धारकांना वर्षातून महत्त्वाच्या सणांना कमी खर्चात अन्नधान्याच्या वस्तू दिल्या जातात. या योजनेला आनंदाचा शिधा असे नाव देण्यात आले आहे. वर्षभरातील दिवाळी, दसरा गुढीपाडवा अशा महत्त्वाच्या सणांना हा लाभ रेशनकार्ड धारकांना रेशनींग दुकानातून मिळतो.

अन्न व नागरी पुरवठा या विभागाकडून हा प्रस्ताव शासनाकडे मांडण्यात आला होता. तो शासनामार्फत मान्य करण्यात आला आणि 2023 पासून आनंदाचा शिधा ही योजना सुरु करण्यात आली. यावेळी एकाच महिन्यात गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती असल्याने तब्बल दोनदा या योजनेचा लाभ लाभार्थ्यांना घेता येणार आहे. याबाबती सविस्तर माहिती आम्ही या लेखाच्या माध्यमातून घेऊन आलो आहोत. Anandacha Shidha

रेशनकार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी – एप्रिलमध्ये एकाच महिन्यात दोनदा मिळणार आनंदाचा शिधा

यावेळी 9 एप्रिल 2024 ला गुढीपाडवा आणि 14 एप्रिल 2024 रोजी आंबेडकर जयंती या निमित्ताने महाराष्ट्र शासनाकडून दारिद्र्यरेषेखालील शिधपत्रधारकांना आनंदाचा शिधा वाटप होणार आहे, आणि तेही दोनदा. याबाबद महाराष्ट्र मंत्रीमंडळात बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.  महाराष्ट्र अन्न व नागरी पुरवठा या विभागामार्फत ही योजना राबवली जाते. या विभागामार्फतच एप्रिल महिन्यात गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीस आनंदाचा शिधा लाभार्थ्यांना देण्याता असा प्रस्ताव मांडण्यात आला. त्यावर दि. 11 मार्च 2024 रोजी मंत्रीमंडळाने निर्णय घेतला आणि प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

100 रुपयांत मिळणार चार वस्तू

एक किलो रवा, एक किलो चणा डाळ, एक किलो साखर आणि एक लिटर खाद्य तेल रेशन म्हणून शासनामार्फत देण्यात येणार आहे. फक्त 100 रुपयांमध्ये या चारही गोष्टी रेशनकार्ड लाभार्थी मिळवू शकतील. Anandacha Shidha

“आनंदाचा शिधा” या शासकीय योजनेचा कोणाला मिळणार लाभ?

महाराष्ट्र शासन 2023 पासून दारिद्र्य रेषेखालील शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिधा देत आहे. म्हणजे रेशन दुकानावर या कमी खर्चाच्या रेशनकार्ड धारकांना फक्त 100 रुपयांत विविध धान्य आणि खाद्य तेल वितरीत केले जाते. यामध्ये रवा, चणाडाळ, पोहे, साखर अशा वस्तूंचा समावेश असतो. यावेळी या योजनेचे लाभार्थी हे अंत्योदय अन्न योजना लाभार्थी, प्राधान्य कुटुंब व छत्रपती संभाजीनतर व अमरावती विभागातील सर्व  तसेच नागपूर विभागातील वर्धा अशा 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील केशरी शिधापत्रधारक देखील यावेळी या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत.

महाराष्ट्र राज्यातील सुमारे 25 लाख अंत्योदर अन्न योजना लाभार्थी, 1.37 कोटी प्राधान्य कुटुंब लाभार्थी, 7.5 लाख शेतकरी योजनेतील शिधापत्रधारक असे एकूण 1.69 कोटी कुटुंबांना यावेळी आनंदाचा शिधा शासनामार्फत देण्यात येणार आहे. Anandacha Shidha

एकूण किती खर्चास मंजूरी

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी या योजनेसाठी खास 550 कोटी 57 लाख रुपये इतक्या खर्चास मंजूर दिली आहे. तब्बल 1 कोटी 69 लाख शिधापत्रधारक लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत. Ration card

शिंदे सरकारवर नागरिक खूष!

माहारष्ट्रात सध्या एकनाथजी शिंदे यांचे सरकार कार्यरत आहे. या सरकारमार्फत शेतकऱ्यांसाठी, गरीब नागरिकांसाठी विविध योजना आखण्याचा धडाकाच सुरु झाला आहे. तसेच बेरोजगार तरुणांना नोकऱ्या मिळाव्यात यासाठी महाराष्ट्रातील विविध विभागांतील रिक्त पदे भरण्यासाठी भरती देखील जाहीर करण्यात आली आहे. या सर्व गोष्टींमुळे महाराष्ट्रातील जनता शिंदे सरकारवर खूश असल्याचे दिसून येत आहे. बेरोजगारी आणि दारिद्र्य यां प्रश्नांवर शिंदेसरकारने ताबा मिळवत नागरिकांना आनंदी आणि उत्साही वातावरण दिल्याचे दिसून येत आहे. आता येणाऱ्या निवडणूकीत नागरिक याचा मोबदला शिंदे सरकारला देणार की आणखी कोणाला हे पाहण्यासारखे आहे. Anandacha Shidha

आनंदाची शिधा या योजनेचे तुम्ही लाभार्थी असाल तर आम्हाला जरुर कमेंट करुन कळवा की तुम्हाला यावेळी कोणकोणते धान्य देण्यात आले. आणि त्याचा तुम्ही कसा वापर केला. Anandacha Shidha