Ancestral property या ७ कारणांमुळे तुमचा वारसा हक्क नाकारला जाऊ शकतो. वेळीच काळजी घ्या.

Ancestral property

Ancestral property वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये स्वतःचा हक्क सांगताना कौटुंबिक कलह आणि हिंसाचाराची अनेक उदाहरणे आपण जुन्या काळापासून पाहत आलेलो आहे. कौटुंबिक कलह नेहमीच मालमत्तेच्या हक्कावरुन होताना दिसून येतात. 1956 च्या हिंदू उत्तराधिकार कायद्यानुसार काही नियम तयार करण्यात आलेले आहेत. त्या नियमांनुसार एखादी व्यक्ती वडिलोपार्जित मालमत्तेत जसा हक्क सांगू शकते तसात काही कारणांमुळे हा हक्क गमावू देखील शकते.

वडिलोपार्जित मालमत्तेतून आपला हक्क गमावण्याची कारणे या लेखामध्ये आपण सविस्तर तपासणार आहोत. संपूर्ण लेख वाचा आणि तुम्ही वडिलोपार्जित कायद्यानुसार विविध बांबीबद्दल अधिक माहिती मिळवा.

वडिलोपार्जित मालमत्ता म्हणजे काय?

1956 च्या हिंदू उत्तराधिकार कायद्यानुसार वडिलोपार्जित मालमत्ते संदर्भात व्याख्या सांगण्यात आलेली आहे.  सर्वोच्च न्यायालयाच्या मान्यतेनुसार  पुरुष किंवा स्त्रीला हिंदू उत्तराधिकारी कायद्यानुसार वडील, आजोबा किंवा पणजोबांच्या वारसाहक्कानुसार मिळालेली मालमत्ता ही वडिलोपार्जित मालमत्ता समजली जाते.

मालमत्तेचे दोन प्रकार असतात

  • एखाद्या व्यक्तीने स्वकमाईने किंवा स्वकष्टाने तयार केलेली मालमत्ता स्व-अधिग्रहित मालमत्ता समजली जाते.
  • एखाद्या कुटुंबातील वडिलधाऱ्या  सदस्यांकडून मिळालेली मालमत्ता ही वडिलोपार्जित मालमत्ता समजली जाते आणि या वडिलोपार्जित मालमत्तेत कुटुंबातील सर्व सदस्यांचा हक्क असतो, परंतु काही कारणांमुळे हा हक्क गमवावा लागू शकतो, तो नेमक्या कोणत्या कारणांसाठी ते आपण पुढील माहितीत अभ्यासणार आहोत.

Ancestral property वडिलोपार्जित मालमत्तेत हक्क नाकारला जाण्याची कारणे पुढील प्रमाणे आपण पाहू शकतो.

तुम्ही त्या कुटुंबातील वारस असलात तरी वडिलोपार्जित मालमत्तेतील तुमचा  हक्क नाकारला जाऊ शकतो, आणि हे कायद्यानुसारच आहे हे सिद्ध देखील करता येईल. मग ही कोणती कारणे आहेत जी तुम्हाला कौटुंबिक मालमत्तेतील वारस हक्का पासून दूर ठेवू शकतात.

खुनात सहभाग किंवा प्रत्यक्ष आरोपी असल्यास

एखाद्या व्यक्तीचा त्याच्या आईवडिलांच्या किंवा कुटुंबातील इतर व्यक्तीच्या खुनात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रित्या सहभाग असल्यास ती व्यक्ती कौटुंबिक मालमत्तेतून हक्क बाद केली जाते. कौटुंबिक मालमत्ता, जमिन यापैकी त्या व्यक्तिस कोणत्याच गोष्टीवर हक्क सांगता येत नाही.

धर्मांतर केलेल्या व्यक्तीची अपत्ये असल्यास

कुटुंबातील एखाद्या व्यक्तीने जर धर्मांतर केले असेल तर त्या व्यक्तीसह त्याच्या मुलांना देखील वडिलोपार्जित मालमत्तेत हक्क मिळत नाही.

स्वखुशीने हक्कसोड पत्र दिल्यास

कुटुंबातील एखाद्या सदस्याने त्याला मिळणाऱ्या वाडिलोपार्जित मालमत्तेसाठी हक्कसोड पत्र दिले असेल तर त्या सदस्याच्या मुलांना मालमत्तेत हक्क मिळत नाही. कारण त्याच्या वडिलांना तो हक्क नामंजुर केलेला असतो.

Ancestral property आई वडिलांचा किंवा घरातील ज्येष्ठ मंडळीचा सांभाळ न करणारी व्यक्ती

आई वडिलांचा सांभाळ न करणारी मुलगा, मुलगी, सुना किंवा नातवंडे देखील मलमत्तेतील हक्कास पात्र ठरत नाहीत, तसेच घरात अविवाहित आत्या किंवा काका असतील त्यांचा समावेश ज्येष्ठांमध्ये होत असताना घरातील पुतणे, भाचे यांनी या ज्येष्ठ मंडळींचा वृद्धापकाळात सांभाळ केला नाही तर अशा व्यक्तींना मालमत्तेच्या हक्कातून बाद केले जाते.

तुमच्या मालकीची जमीन आहे का? मग ही बातमी बघाच; सातबारा उतारे झाले बंद, आता ‘प्रॉपर्टी कार्ड’ मिळणार!

वारसा हक्क न मिळण्याची इतर कारणे

कुटुंबातील एखाद्या सदस्याने वडिलोपार्जित मालमत्ता पुढील कारणांसाठी वापरली असेल तर इतर वारसांना देखील त्या मालमत्तेत हिस्सा मागता येत नाही.

  • एकत्र कुटुंबात राहताना  मुळ घराच्या दुरुस्तीसाठी, तसेच नवीन घर बांधण्याच्या खर्चासाठी, किंवा बिगर शेतजमीन विकून चांगली शेतजमीन घेण्यासाठी कुटुंबातील मिळकत मुख्य व्यक्तीने विकली. तर अशावेळी कुटुंबातील कोणताही  इतर सदस्य किंवा वारस विकलेल्या विकलेल्या मिळकतीमध्ये हिस्सा मागू शकत नाही.
  • एखाद्या एकत्र कुटुंबातील मुख्य व्यक्तीने कुटुंबातील एखाद्या व्यक्तिच्या गंभीर आजारावरील खर्चासाठी, कुटुंबातील न्यायालयीन दाव्यांचा खर्च भागवण्यासाठी, कुटुंबावरील कर्ज फेडण्यासाठी कायद्याने न्याय्य गरजांसाठी वडिलोपार्जित मालमत्ता विकली असेल, तर मात्र कुटुंबातील इतर कोणताही सदस्य या मालमत्तेत हिस्सा मागू शकत नाही.
  • एकत्र कुटुंबातील गृहप्रवेश, एखाद्या सदस्याचे लग्न,  बारसे,  श्राद्ध किंवा उपनयन संस्कार अशी कर्तव्ये पार पाडण्यासाठी किंवा एखाद्या धार्मिक कारणाकरता खर्च भागवताना वडिलोपार्जित मालमत्ता विकली असेल,  तर त्या मिळकतीवर कुटुंबातील सदस्य किंवा वारसांना हक्क सांगता येत नाही.