Poultry Farm Business subsidy: पोल्ट्री फार्मसाठी 50% सबसीडी मिळवा, केंद्र सरकारच्या या योजनेसाठी आजच अर्ज करा

Poultry Farm Business subsidy

Poultry Farm Business subsidy कुकुटपालन हा सर्वात जास्त नफा देणारा व्यवसाय आहे. तसेच या व्यवसायात वर्षाचे 12 ही महिने अंडी आणि चिकनची मागणी असते त्यामुळे या व्यवसायाला मरण नाही. यासाठी केंद्र शासनाने ग्रामिण भागात हा व्यवसाय करण्यासाठी नागरिकांना आर्थिक सहाय्य व्हावे आणि रोजगार निर्माण व्हावा या हेतूने पोल्ट्री फार्मसाठी 50% सबसीडी योजना सुरु केली आहे. या योजनेसंबंधी अधिक माहिची लेखाच सविस्तर देण्यात आली आहे. तुमच्याकडे योजनेच्या अटीत सांगितल्याप्रमाणे किमान 1 एकर जागा असेल तर तुम्ही त्या जागेत पोल्ट्री फार्म उभारून शासनाकडून 50% सबसिडीसाठी अर्ज करु शकता. Poultry Farm Business

काय आहे केंद्र सरकारची पोल्ट्री फार्म 50% सबसीडी योजना?

ग्रामीण भागात शेती व्यतीरिक्त इतरही व्यवसायांना चालना देता यावी म्हणून केंद्र शासनाने ग्रामिण नागरिकांसाठी मुख्यत्वे करुन पोल्ट्री फार्मसाठी 50% सबसीडी योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत पोल्ट्री फार्म विकसित करण्यासाठी सरकारकडून 50 लाखांपर्यंत कर्ज दिले जाणार आहे. तसेच या योजनेसाठी तुम्हाला कोणतीही राष्ट्रियकृत बँक कर्ज देऊ शकते.  थोडक्यात सांगायचेच झाले तर योजना लागू झाल्या नंतर पोल्ट्री फार्म सुरु करण्यासाठी 50 लाखाचे कर्ज घेतले असेल तर तुम्हाला  केवळ 25 लाख  बँकेला परत करावे लागतील. या योजने संबंधीत महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे पैसे त्या संबधित बँकेत दोन हफ्त्यांत जमा करायचे असतात.

 केंद्र शासनाच्या या योजनेसाठी अर्ज कसा व कुठे करावा?

 • पोल्ट्री फार्मसाठी 50% सबसीडी योजना 2023 या योजने अंतर्गत अर्ज करण्यासाठी खालील अधिकृत केंद्र शासनाच्या पोर्टलला म्हणजेच वेबसाईटला भेट द्या!

https://nlm.udyamimitra.in/

 • वेबपेज ओपन झाल्यावर समोरच Apply here असे लिहिले आहे. तिथे क्लिक करा.
 •  या योजनेअंतर्गत केवळ ऑनलाईन अर्ज करावा लागतो.

योजने संबंधीत  केंद्र शासनाचा निर्णय पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://dahd.nic.in/sites/default/filess/2910-Booklet%20on%20AH%20Schemes-E-Web.pdf

पोल्ट्री फार्मसाठी 50% सबसीडी योजनेसंदर्भातील अटी व शर्ती

पोल्ट्री फार्मसाठी 50% सबसीडी योजना 2023 या योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्यांसाठी शासनाने काही नियम व अटी ठरविलेल्या आहेत त्या पुढील प्रमाणे.

 • पोल्ट्री फार्म  किमान 500 मीटर अंतराव असणे आवश्यक आहे.
 • पाण्याची जलस्त्रोत असणे आवश्यक आहे
 • पोल्ट्री फार्ममध्ये किमान पाच हजार पक्षी असणे आवश्यक आहे.
 • पोल्ट्रीसाठी शेड आणि इतर पायाभूत सुविधांचे नियोजन करणे आवश्यक आहे
 • कर्जाची परतफेड करण्यासाठी 5 वर्षांचा कालावधी दिला जातो.
 • राष्ट्रियकृत बँकांकडून कर्जाचे पैसे दोन हफ्त्यात लाभार्थ्याला मिळणे बंधनकारक आहे.

Poultry Farm Business subsidy 50% सबसीडी कोणाला मिळू शकते?

पोल्ट्री फार्मसाठी 50% सबसीडी योजना 2023 या योजनेअंतर्गत पुढील संस्था आणि व्यकींना प्रमाणे अर्ज करुन सबसिडी मिळवता येते.

 • कोणाही व्यक्ती जो भारताचा नागरिक आहे, त्यास केंद्र शासनाच्या या योजनेअंतर्गत सबसीडी मिळू शकते.
 • शेतकऱी आहे आणि त्याची स्वतःची किमान 1 एकर जागा आहे अशा व्यक्तीस केंद्र शासनाच्या पोल्ट्री फार्मसाठी 50% सबसीडी योजना 2023 अंतर्गत सबसिडी मिळू शकते.
 • बचत गट, उद्योजक, शेतकरी उत्पादक, शेतकरी सहकारी संस्था, संस्था, कंपनी कायद्याच्या कलम 8 अंतर्गत स्थापन झालेल्या संस्था देखील या योजनेअंतर्गत पोल्ट्री फार्म व्यवसायासाठी 50 टक्के सबसिडीसाठी शासनाकडे अर्ज करु शकतात.

पोल्ट्री फार्मसाठी 50% सबसीडी योजना 2023 साठी अर्ज करताना कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत ?

 • व्यवसायासंबंधी सविस्तर प्रकल्प अहवाल
 • आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशनकार्ड़, मतदार कार्ड
 • पोल्ट्री फार्मसाठी निवडलेल्या जमिनीचे फोटो
 • जमिन मालकीचे किंवा भाडेतत्वावर घेतल्याची ओरिजनल कागदपत्रे
 •  योजनेअंतर्गत ज्या बँकेतून कर्ज घ्यायचे आहे त्या बँकेत असलेल्या तुमच्या खात्याचे दोन कॅन्सल  केलेल चेक
 • रहिवासी दाखला
 • जात प्रमाणपत्र
 • कौशल्य प्रमाणपत्रं
 • स्कॅन सही

Poultry Farm Business subsidy कुकुटपालनाचे प्रशिक्षण आवश्यक

पोल्ट्री फार्म व्यवसाय भरघोस उत्पन्न मिळवून देणारा असला तरी सुरुवातीला कुकुटपालनाचे प्रशिक्षण घेणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.