Bank Cheque Signature Rules: बॅंकेच्या चेकवर सही करताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा…! अन्यथा तुमचे पैसे बुडतील

Bank Cheque Signature Rules : प्रत्येक जणांचं बॅंकेत खातं आहे. आपण या बॅकेत व्यवहार करत असतो. पैशांची देवाणघेवाण या बॅंकमध्ये होत असते. अनेक प्रोसेस फॉलो करून बॅंकेत व्यवहार करावा लागतो. तुम्ही बॅंकेत जाऊन तुम्हाला अनेक बाबींची माहिती मिळालेली असते. अनेकांचे वेगवेगळ्या बँकेत खाते असते. कोणाचे सरकारी बॅंकेत तर कुणाचे प्रायव्हेट बॅंकेत खातं असते.

बॅंकेशी व्यवहार करत असताना नियम, अटी व शर्ती माहिती असणं आवश्यक आहे. जर तुम्हाला बॅंकेचे नियम माहीत नसेल तर तुमची फसवणूक होऊ शकते. ही फसवणूक होऊ नये याकरिता बॅंकेत कोणतीही प्रोसेस पूर्ण करण्याअगोदर त्या बाबींची अगोदर संपूर्ण माहिती जाणून घेणं आवश्यक आहे. यामध्ये आपल्याला चेकबुकशी संबंधित नियम प्रत्येक बॅंक खातेदाराला माहीत असणं आवश्यक आहे. अनेकजणांना याबाबत पूर्ण माहिती नसते. ही माहिती नसल्याने तुमची फसवणूक देखील होऊ शकते.

बॅंकेचे चेक हाताळताना त्याबाबत माहिती असणं गरजेचं आहे. यामध्ये चेकवर सही कुठे करायची? यात कोणाला चेक द्यायचा असेल तर कोणत्या बाजूने सही करावी लागते? तसेच एखाद्या वेळेस तुम्ही दुसऱ्या व्यक्तीजवळ चेकवर सही करून दिल्यास तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते का? जर तुमच्याकडून चूक झाली तर यासाठी काय उपाय करावा लागेल. याबाबत आपल्याला माहिती असणं आवश्यक असते. आपण या आर्टिकल मध्ये सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

bank rules 2024 चेकच्या मागील बाजूने सही करताना या बाबीं लक्षात ठेवा
चेक म्हणजे ही वित्तिय संस्था किंवा वैयक्तिक रोख पैसे काढण्याची लेखी हमी असते. एका खात्यातून दुसऱ्या खात्यात रक्कम टाकण्यासाठी चेक हा लेखी आदेश असतो. चेकमुळे दोन खातेदारातील व्यवहार होत असतात. ही प्रोसेस एकदम सोयीस्कर आहे. परंतु, ही प्रोसेस करतांना सही बाबत काही गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे.

चेकवर सही करण्यालाही काही नियम असतात. हे नियम तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे, नाहीतर तुमचं आर्थिक नुकसान होईल. सर्वच चेकवर मागील बाजूस सही करावी लागत नसते. फक्त बेअरर चेकवरच मागील बाजूस सही केली जाते. हा बेअरर चेक बॅंकेत जमा केला जातो आणि त्यावर कोणत्याही व्यक्तीचे नाव नसते. त्या चेकच्या मदतीने कोणीही बॅंकेतून पैसे काढू शकतो. बँक खातेधारकाच्या सहमतीने जारी केलेले बेअरर चेक मान्य करते. नियमांनुसार अशा चेकमुळे झालेल्या फसवणुकीला बँक जबाबदार नसते.

Bank Check Signature Rules चेक संबंधित हे नियम लक्षात ठेवा
1) चेक चालू किंवा बचत खात्यासाठी जारी केला जातो.
2) चेकवर नाव असलेला प्राप्तकर्ताच त्याच्या माध्यमातून व्यवहार करता येतो.
3) चेकवर तारीख नसेल तर तो चेक अवैध मानल्या जातो.
4) चेक जारी केल्याच्या तारखेपासून तीन महिन्यांसाठी चेक वैध असतो.
5) चेकच्या तळाशी एक 9 अंकी MICR कोड आहे जो चेक क्लिअरन्स प्रक्रिया सुलभ करत असतो.
6) चेक देणाऱ्या व्यक्तीने चेकवर ओव्हरराईट न करता सही करणे गरजेचे आहे.
7) चेकवर पैसे देणाऱ्याचे नाव अचूक लिहिलेले असणं आवश्यक आहे.
8) चेकची रक्कम शब्द आणि अंकात दोन्ही मध्ये लिहिलेली असणं आवश्यक असते.
9) चेक बाबत तुम्हाला हे नियम माहीत असणं आवश्यक आहे. (bank signature rules 2024)

चेक संबंधित सही बाबतचे हे काही नियम आहेत. या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. अन्यथा यामध्ये तुमच्या कडून एक जरी चूक झाली तर तुम्हाला आर्थिक भुर्दंड बसू शकतो‌. यामुळे नियम लक्षात घेऊन नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. हे नियम आपल्या मित्रांना व नातेवाईकांना माहिती व्हावे यासाठी आमचं आर्टिकल त्यांना नक्की पाठवा.