Land Record: वडिलांच्या मृत्यू नंतर सातबारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी हा कायदा माहिती आहे का? वारस नोंदणी कशी करायची बघा

Land Record: सातबारा उतारा शेतकऱ्यांच्या दृष्टीकोनातून खूप महत्त्वाचा दस्तावेज आहे. शेती संबंधित कुठल्याही प्रकारची सरकारी कामे असेल तर त्यासाठी सातबारा उतारा मागितल्या जातो. शेतकऱ्यांना प्रामुख्याने शेतीच्या संबंधित काही कागदपत्र हवे असतील तर त्यामध्ये सातबारा आणि आठ अ चा उतारा ही दोन कागदपत्रे महत्वाची असतात. ही कागदपत्रे जमिनीचा इतिहास म्हणायला काही हरकत नाही.

सातबारा उताऱ्यावर शेतमालकाचे नाव असते. जमिनीबाबत संपूर्ण माहिती या सातबारा उताऱ्यावर दिलेली असते. तसेच पिकांची ही नोंद केलेली असते. अनेकदा असं होते की वडिलांच्या मृत्यूनंतर, त्यांच्या नावावर असलेल्या मालमत्तेचे वारस बनण्यासाठी मुलांना अनेक अडचणी येतात. तलाठी कार्यालयाकडून मिळणारे सहकार्य हे एक प्रमुख कारण होते. या परिस्थितीत नागरिकांना कोणते कायदेशीर अधिकार आहेत हे आपण जाणून घेणार आहोत. Land Record

वारस हक्क म्हणजे काय ? Land Record


जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या मालकीची शेत जमीन किंवा इतर मालमत्ता असते व दुर्दैवाने अशा व्यक्तीचा अचानक मृत्यू झाला तर ती जमीन मृत पावलेल्या व्यक्तीच्या वारसांना त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर तीन महिन्याच्या आतमध्ये वारस नोंदणीसाठी अर्ज करणे गरजेचे असते. land record maharashtra

यामध्ये एखाद्या मालमत्ता धारकाचा जर मृत्यू झाला तर मृत झालेल्या व्यक्तीची विधववा, मृताचा विधुर पती, मृत व्यक्तीचा मुलगा किंवा मुलगी आणि मृताची आई हे व्यक्ती त्या व्यक्तीच्या मालमत्तेचा वारस म्हणून उत्तराधिकार प्रमाणपत्र किंवा अधिकृत प्रमाणपत्राकरिता अर्ज करू शकतात. 7/12 online maharashtra

तलाठी कार्यालयात वारस हक्क नोंदणी
तलाठी कार्यालय जमिनीच्या मालकीच्या नोंदी ठेवण्यासाठी जबाबदार आहे, ज्याला शीर्षक VII म्हणून ओळखले जाते, आणि त्यात आवश्यक ते बदल करणे. वारसा हक्काचा दावा करणारे नागरिक वारस नोंदणीसाठी अर्ज करू शकतात आणि तलाठ्याने अर्ज नोंदवून त्याची पुष्टी करणे आवश्यक आहे.

वारस नोंदणी करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात ? Land Record
1) वारस नोंदी करिता वैध माहितीसह फॉर्म भरणे गरजेचे असून घर नोंदणी प्रमाणपत्र आणि पत्त्याचा पुरावा
2) पत्त्याचा पुरावा
3) रेशन कार्ड
4) वारसांचे प्रतिज्ञापत्र
5) न्यायालयीन शिक्का
6) पासपोर्ट साइज फोटो
7) मृत झालेल्या व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र
8) आधार कार्ड
9) मृत व्यक्ती जर सरकारी सेवेमध्ये कार्यरत असेल तर सेवा नियमावली आणि सेवा आयोगाच्या सक्षम अधिकाऱ्याचे पत्र आवश्यक online varas nond

land record department वारस नोंदणी बाबत नागरिकांचे हक्क आणि मुद्दे
1) वारस हक्कांच्या कायद्यानुसार, वारसांना त्यांच्या हक्कांसाठी लढण्याचा अधिकार आहे. तलाठ्याने वारस नोंदणी करिता नकार दिला तर वारस नोंदणीसाठी तहसील कार्यालय किंवा न्यायालयात अर्ज करता येतो. वारस नोंदणी करणं हा तुमचा हक्क आहे.
2) माहिती अधिकार कायद्याअंतर्गत नागरिकांना सरकारी कार्यालयातून माहिती मिळवण्याचा अधिकार आहे. वारस नोंदणी प्रक्रियेची माहिती मिळविण्यासाठी नागरिक RTI अर्ज सादर करू शकतात. हा मुद्दा लक्षात ठेवा अतिशय महत्वाचा आहे.
3) नागरिकांना तलाठी कार्यालयातील गैरवर्तणुकी विरुद्ध तक्रारी दाखल करण्याचा अधिकार आहे. ही तक्रार करण्यासाठी संकलन कार्यालय किंवा कर विभागाकडे तक्रार करायची आहे. तुमचा हक्क मिळवण्यासाठी अडचण येत असेल तर अवश्य तक्रार करा.