वाढत्या विजदरांमुळे सौरऊर्जेवर चालणाऱ्या वस्तू आणि सौर ऊर्जा निर्मिती करणारे पॅनल यांची मागणी वाढू लागली आहे. सौर ऊर्जा निर्मिती करणारे पॅनल, वापरासाठीची उपकरणे बनवणाऱ्या अनेक कंपन्या भारतीय बाजारपेठेत आहेत. यामध्ये अदानी सोलर, सर्वोटेक पॉवर सिस्टम्स लि., वारी एनर्जी लि, गोल्डी सोलर, एक्साइड सोलर, सात्विक ग्रीन एनर्जी प्रा. लि. यासारख्या कंपन्यांचा समावेश आहे. या सर्वच कंपन्या सर्वोत्तम सोलर पॅनल बनवतातच परंतु आज आपण एक्साइड या कंपनीच्या सोलार पॅनलबद्दल अधिक माहिती मिळवणार आहोत. कारण एक्साइड सोलर कंपनीच्या ग्राहकांनी कंपनीला खूपच चांगला प्रतिसाद दिला आहे. म्हणूनच आज आपण या कंपनीच्या सोलर पॅनल बद्दल जाणून घेणार आहोत. Best Solar system
एक्साइड सोलर- पॉलीक्रिस्टलाइन सोलर पॅनेल
भारतातील सर्वात मोठी सौर उत्पादने निर्माण करणारी कंपनी म्हणून एक्साइड सोलर पॅनेल कंपनीचे नाव सर्वात पहिले घेतले जाते. सोलर इनव्हर्टर, सोलर पॅनल आणि सोलर लाइट्स यांसारखी अनेक उत्पादने अत्यंत कमी किमतीत उपलब्ध आहेत. जेव्हापासून भारतात सौर ऊर्जेचा वापर वाढला आहे, तेव्हापासून एक्साइड कंपनीची उपकरणे देशांतर्गत बाजारपेठेतील ग्राहकांना अत्यंत आवडू लागली आहेत. कारण एक्साइड कंपनीने बनवलेली उपकरणे, सोलर पॅनल वापरासाठी किफायतशीर आणि जास्त कालावधीसाठी उत्तमरित्या काम करतात. ऑन-ग्रिड, ऑफ-ग्रिड प्रणालींमध्ये वापरात येणारी आणि भारतातील घरांसाठी एक्साइड पॉलीक्रिस्टलाइन सौर पॅनेल सर्वोत्तम सौर पॅनेल म्हणून सिद्ध झाले आहेत. Best Solar system
एक्साइड सौर बॅटरीची किंमत
- एक्साइड 80ah सोलर बॅटरीची खरेदी करण्यासाठी तुम्हाला रु. 8500 इतका खर्च येईल
- एक्साइड 100ah सोलर बॅटरीची खरेदी करण्यासाठी तुम्हाला 10,000 रु. इतका खर्च येईल.
- एक्साइड 150ah सोलर बॅटरीची खरेदी करण्यासाठी तुम्हाला 14,500 रु. इतका खर्च येईल.
- एक्साइड 200ah सोलर बॅटरीची खरेदी करण्यासाठी तुम्हाला 18,600 रु. इतका खर्च येईल. Best Solar system
सोलर पॅनल खरेदी करण्यासाठी कर्ज आणि EMI ची सुविधा
EXIDE 4KW चे सोलर पॅनल बसविण्यासाठी ग्राहकांना बँकांकडून 1 ते 10 लाखापर्यंतचे कर्ज मिळू शकते. किंवा हे पॅनल EMI वर देखील कंपनीकडून खरेदी करता येतात. त्यामुळे EMI वर खरेदी केल्यास EXIDE 4KW चा सोलार पॅनल ग्राहकांना महिना 1250 रुपयांच्या EMI वर मिळू शकतो. ही अत्यंत सोपे आणि सुविधाजन्य खरेदी आहे.
एक्साइड पॉलीक्रिस्टलाइन कंपनीच्या सोलर पॅनेलची वैशिष्ट्ये:
- एक्साइड पॉलीक्रिस्टलाइन सोलर पॅनेल 20-22% च्या कार्यक्षमतेला सहज स्पर्श करतात.
- एक्साइड पॉलीक्रिस्टलाइन सोलर पॅनेलच्या मॉड्यूल्सचे वजन 10-12 किलो असते.
- Exide Polycrystalline Solar Panels ची भारतातील सौर उर्जा प्रणालींसोबत 25 वर्षांची परफॉर्मन्स वॉरंटी दिली जाते.
- एक्साइड पॉलीक्रिस्टलाइन सोलर पॅनेल ४४ ते ८५ डिग्री सेल्सिअस तापमानात काम करू शकतात.
एक्साइड पॉलीक्रिस्टलाइन सोलर पॅनेल बसविण्याचे फायदे
- एक्साइड पॉलीक्रिस्टलाइन सोलर प्रणाली जास्तीत जास्त काळ वापरासाठी कमी मेंटेनन्स लागणारे सिस्टिम
- एक्साइड पॉलीक्रिस्टलाइन सोलर प्रणाली सुर्याच्या कमी प्रकाशात देखील कार्यरत राहते.
- एक्साइड पॉलीक्रिस्टलाइन सोलर प्रणाली घरातील जास्तीत जास्त उपकरणांना वीज पुरवते.
- ग्रीडच्या वीजेचा खर्च कमी होतो.
- एकदाच पैसे खर्च करुन पुढील 20 ते 25 वर्षे कमी मेंटेनन्समध्ये आपण वीजेचा वापर करता येतो Best Solar system
पर्यावरणाला प्रदुषणापासून राखण्यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात सौर ऊर्जेचा वापर झाला पाहिजे. त्यासाठी उत्तमेत्तम सौरऊर्जा निर्मिती करणाऱ्या कंपन्या आणि सौरऊर्जा पॅनल उपलब्ध आहेत. तुम्ही देखील सौर ऊर्जा उपकरणे वापरण्यास सुरुवात करा आणि सर्वप्रथम त्यासाठी लागणारे सौरऊर्जा पॅनल बसवा. ग्रीडच्या विजेचा वापर कमी करा. Best Solar system