BMC Bharti 2024: बृहन्मुंबई महानगरपालिकेत पदवीधारक उत्तीर्णांना नोकरीची सुवर्ण संधी

BMC Bharti 2024 बृहन्मुंबई महानगरपालिका ही भारतातील  सर्वात मोठी महानगरपालिका आहे.येथे नेहमीच विविध पदांसाठीच्या जाहिराती जाहीर होत असतात. कारण बृहन्मुंबई महानगरपालिके अंतर्गत तब्बल 500 हून जास्त विभाग आहेत. त्या त्या विभागातील भरत्या वर्षभर सुरु असतात.  

बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत डेटा एंट्री ऑपरेटर, हेमोडायलिसिस तंत्रज्ञ पदांच्या एकूण 38 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया  24 फेब्रुवारी 2024 पासून सुरु झाली आहे. BMC Jobs2024

ऑनलाईन अर्ज पद्धती

नोकरीसाठी इच्छूक उमेदवारांनी https://www.mcgm.gov.in/irj/portal/anonymous या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन  ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

आवश्यक वयोमर्यादा

बृहन्मुंबई महानगरपालिकेत अनेक पदांसाठी रिक्त जागा भरण्याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. अर्जदाराचे वय 18 वर्षे पूर्ण  ते 33 वर्षे पूर्ण असावे. अर्जदारांची वयोमर्यादा त्या त्या पदाच्या जाहिरातीप्रमाणे कमी जास्त होऊ शकते त्यासाठी त्या त्या पदासोबत जाहिरातीची लिंक देण्यात आली आहे. त्या लिंकवर क्लिक करुन जाहिरात पहावी. BMC Bharti 2024

वेतन किती असेल?

बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी पदभरती जाहिर करण्यात आली आहे. त्यामुळे त्या त्या पदाला वेगवेगळे वेतन असणार आहे. तरी पदाच्या अधिकार आणि जबारबाऱ्यांप्रमाणे 15000 ते 1 लाखापर्यंतची वेतन श्रेणी जाहिरातीत जाहिर करण्यात आली आहे. BMC Bharti 2024

कोणकोणत्या पदांसाठी भरती

  • मानव संसाधन समन्वयकच्या 38 जागा भरण्यात येणार आहेत. या पदासंबंधीत अधिक माहितीसाठी https://drive.google.com/file/d/1JLdn2d7W6pwPM-xKIwm1-pTunI-2SmtZ/view ही जाहिरात पहा.
  • डेटा एंट्री ऑपरेटरच्या 07 जागा भरण्यात येणार आहेत. या पदासंबंधीत अधिक माहिती मिळवा https://drive.google.com/file/d/19vtn6VVd96qNRj5s33A7XJZvmH-ZyNkG/vie या लिंकवर क्लिक करा
  • हेमोडायलिसिस तंत्रज्ञ च्या  03 जागा भरण्यात येणार आहेत. या पदासंबंधीत अधिक माहिती मिळवा https://drive.google.com/file/d/1ordjYVCLT2Joz8sV9XQuUBf6tdhj9h4v/view या लिंकवर क्लिक करा.
  • मानद बालरोग हृदयरोगतज्ज्ञ, पिरचारीका, संचालक अंतर्गत 3 जागा भरण्यात येणार आहेत. संबंधीत जाहिरात पाहण्यासाठी  https://drive.google.com/file/d/1nfprggiNjDoa6NGQwazcxNYgnatPphhM/view या लिंकवर क्लिक करा.
  • कमी वैद्यकीय कर्मचारी या पदासाठी 7 जागा भरण्यात येणार आहेत. या पदासंबंधीत अधिक माहीती मिळविण्यासाठी https://drive.google.com/file/d/1QUP0dT90okd2kPDVDGGu4AF4dkV5gIht/view या लिंकवर क्लिक करा.
  • पी.जी.एम.ओ, प्रबंधक, आवास अधिकारी या पदासाठीच्या 9 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या पदासंबंधीत अधिक माहीत मिळविण्यासाठी https://drive.google.com/file/d/1ga5YKpsgiyWbHU0DrhrIkDU047s-TbIT/view या लिंकवर क्लिक करा.
  • अति दक्षता बालरोग तज्ञ, विकृती शास्त्रज्ञ, मानद बालरोग शल्यक्रिया तज्ञ, मानद भुल तज्ञ, मानद बीएमटी फिजिशीयन, मानद त्वचारोग तज्ञ, श्रवणतज्ञ, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, माहिती तंत्रज्ञ, डाटा मॅनेजर, भांडार सहाय्यक, नोंदणी सहाय्यक, डाटा एंट्री ऑपरेटर या पदांच्या 9 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या पदासंबंधीत अधिक माहिती मिळविण्यासाठी https://drive.google.com/file/d/1Gbk0ebSN0LPQ90lEU6rqQ3O8ENHgFtvG/view या लिंकवर क्लिक करा.
  • सपोर्ट स्टाफ पदाची 1 जागा रिक्त आहे. अधिक माहिती मिळविण्यासाठी https://drive.google.com/file/d/1gvmq9wwGe09xF4ZIUu74fLFpvLapI4jW/view या जाहिरीतीच्या लिंकवर क्लिक करा.

वरती दिलेल्या जाहिरातींच्या लिंकमध्ये तुम्ही PDF डाऊनलोड करुन घेऊ शकता. आणि त्यासोबत प्रत्येक पदासाठी अर्ज करण्यासाठीचा फॉर्म दिला आहे. तो भरुन बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यालयात सुपूर्त करु शकता. BMC Bharti 2024

अर्ज करण्याची अंतीम तारीख

बृहन्मुंबई महानगरपालिकेत मानव संसाधन समन्वयक जागांवरील भरतीसाठी अर्ज करण्याची  दि. 15 मार्च 2024 ही अंतीम तारीख आहे. त्याआधी इच्छूक उमेदवारांनी अर्ज करावा.

बृहन्मुंबई महानगरपालिका ही भारतातील सर्वात मोठी महानगरपालिका आहे. संपूर्ण मुंबई शहर या महानगरपालिकेच्या व्यवस्थापनाच्या माध्यमातून सुरु असते. येथे नोकरीची संधी मिळणे हे अनेक तरुणांचे स्वप्न असते. तुम्ही देखील सध्या जाहिर झालेल्या पदांसाठी अर्ज करु शकता आणि भारतातील सर्वात मोठ्या महानगरपालिकेमध्ये काम करण्याची संधी मिळवू शकता. शेवटची तारीख 15 मार्च असल्याने लवकरात लवकर फॉर्म भरा आणि नोकरीची संधी मिळवा. BMC Bharti 2024