BMC Recruitment 2024 मुंबई महानगरपालिकेत नोकरी मिळविण्याचे अनेक तरुण तरुणींचे स्वप्न असते. कारण मुंबई महानगरपालिका ही हाय बजेट महानगरपालिक म्हणून घोषित करण्यात आली आहे. या मुंबई महानगरपालिकेमध्ये ‘कार्यकारी सहायक’ (लिपिक) या पदासाठी तब्बल 1 हजार 846 जागा सरळ सेवेने भरण्याची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. चला तर मग या नोकरीसाठी पात्रता, वेतन आणि अर्ज करण्याची प्रक्रिया जाणून घेऊया!
ऑनलाईन अर्ज भरण्यास कधीपासुन सुरुवात?
या जागांसाठी निकषांत बसणाऱ्या उमेदवारांकडून दिनांक 20 ऑगस्ट 2024 पासून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. दिनांक 9 सप्टेंबर 2024 रोजी रात्री 11.59 मिनिटे ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आणि वेळ आहे
आवश्यक शैक्षणिक पात्रता
- उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असावा.
- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य, विज्ञान, कला, विधी किंवा तत्सम शाखांचा पदवीधर असावा आणि प्रथम प्रयत्नात किमान 45% गुणांसह उत्तीर्ण असावा.
- उमेदवाराकडे इंग्रजी व मराठी टंकलेखनाचे प्रत्येकी किमान 30 शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे. BMC Recruitment 2024
आवश्यक वयोमर्यादा
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 43 वर्षे (नियमानुसार वयात सवलत मिळेल)
परीक्षा फी किती असेल?
बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. ऑनलाईन परीक्षा फी खालीलप्रमाणे भरणे अनिवार्य आहे.
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता- रु. 1000/- (वस्तु व सेवाकरासह)
- आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांकरिता रु.900 /- (वस्तु व सेवाकरासह
वेतन किती असेल?
मुंबई महानगरपालिकेतील विविध खात्यांच्या आस्थापनेवरील गट ‘क’ मधील ‘कार्यकारी सहायक’ (लिपिक) या पदावर रुजू झाल्यानंतर वेतनश्रेणीनुसार रु.25500-81100(मॅट्रिक्स-एम 15) अधिक अनुज्ञेय भत्ते असे वेतन देण्यात येण्यात. BMC Recruitment 2024
भरतीमधील आरक्षित जागांची विभागणी
मुंबई महानगर पालिकेमध्ये कार्यकारी सहाय्यक पदासाठी पदभरती करण्यात येत आहे. या प्रक्रियेमध्ये काही जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत.
- अनुसूचित जातीमधील उमेदवारांसाठी 142 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
- अनुसूचित जमातीमधील उमेदवारांसाठी 150 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
- विमुक्त जाती-अ गटातील उमेदवरांसाठी 49 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
- भटक्या जमाती-ब गटातील उमेदवरांसाठी 54 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
- भटक्या जमाती-क गटातील उमेदवारांसाठी 39 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
- भटक्या जमाती-ड गटातील उमेदवरांसाठी 38 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
- विशेष मागास प्रवर्गातील उमेदवरांसाठी 46 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
- इतर मागासवर्गातील उमेदवरांसाठी 452 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
- आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवारांसाठी 185 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
- सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गातील उमेदवारांसाठी 185 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
- खुला प्रवर्गातील उमेदवारांसाठी 506 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. BMC Recruitment 2024
भरती संदर्भातील जाहिरात पहा
जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
येथे अर्ज करा
https://cdn3.digialm.com//EForms/configuredHtml/32839/90687/Index.html
उमेदवारांच्या मार्गदर्शनासाठी संपर्क
मुंबई महानगरपालिके मधील पदभरती ही उच्चशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. या भरतीसंदर्भात पात्रता, शिक्षण किंवा कोणत्याही आरक्षित जागेसंदर्भात काही प्रश्न असेल तर उमेदवार 9513253233 हा मदतसेवा क्रमांकावर संपर्क करुन मार्गदर्शन मिळवू शकणार आहेत. सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत संपर्क साधता येईल. दुपारी 1.30 ते 2.30 वाजेपर्यंत भोजन कालावधी दरम्याने ही सुविधा बंद असेल. BMC Recruitment 2024