Business ideas for rural area ग्रामीण भागात कमी बजेटमध्ये सुरु करता येतील असे 15 व्यवसाय

Business ideas for rural area

Business ideas for rural area: ग्रामीण भागात कमी बजेटमध्ये करता येतील असे 15 व्यवसाय आम्ही या लेखाच्या माध्यमातून घेऊन आलो आहोत.  तुम्ही ग्रामीण भागात राहता का? मग हा लेख तुम्ही जरुर वाचा. नक्कीच यांत दिलेल्या 15 व्यवसायांपैकी एक तरी व्यवसाय तुमच्या कौशल्याशी निगडीत असेल आणि तो करुन तुम्ही आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनू शकता. ग्रामीण तरुण बरेचदा शिक्षण पुर्ण झाल्यानंतर शहराकडची वाट धरतात परंतु तसे न करता आपल्याच गावात एखादा छोटा मोठा व्यवसाय सुरु करुन मेहनत करुन गावच्या विकासात हातभार लावण्यासाठी आता तरुणांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.  

शेतीसाठी आवश्यक साहित्याचे दुकान

ग्रामीण भागातील महत्त्वाचा व्यवसाय म्हणजे शेती. मग शेतीसाठी लागणारे साहित्याची ग्रामीण भागात अत्यंत आवश्यकता असते. बरेचदा शेतकऱ्यांना या शेतीविषयक साहित्यासाठी खूप दूर शहरी बाजारपेठांमध्ये जावे लागते. आपण हेच साहित्य होलसेल बाजारातून विकत आणून आपल्या गावात दुकान सुरु करु शकतो आणि त्यातून भरपूर नफा कमाऊ शकतो. Business ideas for rural area:

सौंदर्यप्रसाधने विक्री दुकान

ग्रामीण भागातही सध्या सौंदर्यप्रसाधनांची मागणी वाढत आहे. अशा वेळी तुम्ही मुंबई किंवा तुम्ही राहत असलेल्या जिल्ह्याच्या बाजारपेठेतून होलसेल दरात सौंदर्यप्रसाधनांचे साहित्य आणून गावच्या ठिकाणी विकू शकता व त्यातून चांगले मार्जिन कमावता येते.

भाजीपाला आणि फळे विक्री करणे

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडून भाजीपाला आणि फळे तेथील शेतकऱ्यांकडून विकत घेऊन ते तालुक्याच्या ठिकाणी जाऊन विक्रीव्यवसाय केल्याने तुम्हाला चांगला नफा कमावता येऊ शकतो.

बेकरी प्रोडक्ट बनवून विकणे

घरच्या घरी केक, खारी, टोस्ट, बिस्किटे, नानकटाई, ब्रेड सारखे बेकरी प्रोडक्ट बनवून ग्रामीण बाजारपेठेत विकू शकता. त्यातुन चांगला व्यवसाय होतो आणि नफा देखील चांगला मिळतो. Business ideas for rural area:

दुग्धव्यवसाय करणे

ग्रामीण भागात दुग्ध व्यवसाय चांगला चालतो. गावच्या ठिकाणी गुरांना लागणारे वैरण मोफत मिळते. त्यातून दुधाला चांगला भाव मिळाला तर नफा देखील जास्त होतो.

दुग्धजन्य पदार्थ बनवून विकणे

दही, ताक, पनीर, मावा, मिठाई, बर्फी, पेढे यांसारखे दुधापासून बनलेले पदार्थ विकून देखील तुम्ही चांगला नफा कमाऊ शकता. दुधामध्ये कॅल्शीअम असते त्यामुळे दुग्धजन्य पदार्थांना जास्त मागणी असते.

लग्नाचे मंडप व इतर साहित्य भाड्याने देण्याचा व्यवसाय करणे

गावी लग्नाचे सोहळे हल्ली मोठ्या प्रमाणावर होतात. या लग्नाकार्यांना मंडपाचे किंवा सुशोभीकरणाचे साहित्या भाड्याने देण्याचा व्यवसाय करुन तुम्ही चांगले मार्जिन कमाऊ शकता.

जेवणाचे डबे पुरविण्याचा व्यवसाय करणे

गावच्या तालुक्याच्या ठिकाणी एखादे हॉस्पिटल, ग्रामपंचाय किंवा शासकीय इमारत असेल तर तेथी कर्मचाऱ्यांना जेवणाचा डबा पुरविण्याचे काम करुन महिना उत्तम पैसे कमावता येतात.

वाहने दुरुस्तीचे काम करणे

ग्रामीण भागात हल्ली टू व्हिलर सह रिक्क्षा आणि सिक्स सिटर देखील चालतात, त्यांच्या दुरुस्तीचे काम शिकून सुरू केल्यास दर महिन्याला चांगली कमाई होऊ शकते.

शालेय विद्यार्थ्यांचे क्लासेस घेणे

प्रत्येक गावात एक ते दोन शाळा असतातच. तुमचे शिक्षण ग्रॅज्युएशन पर्यंत झालेले असले करी तुम्ही सहज पहिली दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे क्लासेस घेऊ शकता.

कृषी पर्यटन व्यवसाय करणे

सध्या कृष्टी पर्यटनाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. त्याचा फायदा घेत तुमच्या गावात पिकणाऱ्या पिकाची माहिती तुम्ही पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना देण्यास सुरुवात केल्यास त्यातूनही तुम्हाला दरमहिना एक चांगली रक्कम मिळू शकेल.

चहा नाष्ट्याचा स्टॉल सुरु करणे

गावात जीथे एसटी थांबा असेल त्याठिकाणी चहा नाष्ट्याचा स्टॉल सुरु केल्यास उत्तम व्यवसाय होऊ शकतो.

पिठाच्या गिरणीचा व्यवसाय सुरु करणे

गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ, नाचणी या सर्व धान्यांची पीठे आपण आहारात घेतो. त्यामुळे पिठाच्या गिरणीचा व्यवसाय देखील ग्रामीण भागात चालू शकतो. आणि वर्षाचे बाराही महिने हा व्यवसाय आमदनी देणारा आहे.

इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिकल वस्तूंची विक्री आणि दुरुस्ती करणे

गावात प्रत्येक घरात आज मोबाईल, टिव्हि. फ्रीज असतो. या वस्तू बिघडल्यास त्यांना तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या बाजारात दुरुस्तीसाठी किंवा एखादा पार्ट मिळविण्यासाठी जावे लागते. परंतु या वस्तु दुरुस्तीचा एखादा डिप्लोमा पुर्ण करुन गावातच इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिकल वस्तूंची विक्री आणि दुरुस्तीचे काम सरु केल्याच चांगले उत्पन्न मिळवता येऊ शकेल.

घरगुती वापराच्या वस्तूचे दुकान सुरु करणे

घरात वापरली जाणाऱ्या दैनंदीन वस्तू मग त्या प्लॅस्टिकच्या असो वा स्टिलच्या झाडूपासून बादलीपर्यंत आणि स्टिलच्या ग्लासापासून ते स्वयंपाक घरात लागणाऱ्या वस्तूंपर्यंत सर्व वस्तूंची विक्री ग्रामीण भागात होत असते. अशा घरगुती वस्तूंची खरेदी होलसेल मार्केटमधून करुन ग्रामीण भागात विकल्यानंतर मिळणारा नफा हा मोठा असतो.