How to check cibil score on google pay गुगल पे वर तुमचा सिबील स्कोअर 2 मिनिटात चेक करा

How to check cibil score on google pay

How to check cibil score on google pay भारतात सध्या डिजिटल क्रांतीमुळे सर्व आर्थिक व्यवहार हे ऑनलाई पद्धतीनेच केले जातात. म्हणूनच ऑनलाईन आर्थिक व्यवहारांसाठी सर्वात जास्त वापरले जाणारे google pay या ऍपने सर्व गोष्टी एकाच ठिकाणी मिळाव्या यासाठी  नेहमीच ग्राहकांनी उत्तमोत्तम सेवा पुरविल्या आहेत.  यामुळेच त्यांच्या अॅपमध्ये पैसे ट्रान्सफर करण्यापासून ते बिलं भरण्यापर्यंत सर्व सुविधा उपलब्ध आहेत. आता यात कंपनीने आणखी एक भर टाकली आहे. कंपनीने TransUnion CIBIL यांच्यासोबत पार्टनरशीप केली. त्यांनतर कंपनीने युजर्सला मोफत CIBIL स्कोअर चेक करता यावा यासाठी हे फीचर अॅपवर उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे युजर्सला आता घरबसल्या CIBIL स्कोअर चेक करता येणार आहे. How to check cibil score on google pay 

याआधी  आर्थिक व्यवहार करणाऱ्यांना किंवा ज्यांना लोनची गरज आहे अशा व्यक्तींनी  CIBIL च्या वेबसाईटवर जाऊन CIBIL स्कोअर चेक करावा लागायचा. विशेष म्हणजे यासाठी प्रीमियम द्यावे लागत होते. मात्र, Google Pay ने ही सेवा मोफत उपलब्ध करून दिल्यामुळे आता युजरला सोयीचे झाले आहे.

सिबिल स्कोअर Cibil Score  का महत्त्वाचा असतो?

बँकांमधून कर्ज मिळविण्यासाठी Cibil Score  अत्यंत महत्त्वाचा असतो. कारण Cibil Score म्हणजेच आपल्या आर्थिक व्यवहारांचा इतिहास असतो. ईएमआय भरल्याची इत्यंभूत माहिती असते. Cibil Score म्हणजेच असा स्कोअर जो तुमच्या चांगल्या आर्थिक व्यवहारांचा पुरावा असतो.   

गुगल पे वर सिबिल स्कोअर कसा तपासायचा? How to check cibil score on google pay 

  • मोबाईल मधील गुगल पे ऍप सुरु करा
  • त्यात manage your money या पर्यायावर क्लिक करा
  • त्यानंतर check your cibil score वर क्लिक करा
  • तुम्ही नवीन युजर असाव तर तुमचं पूर्ण नाव, फोन नंबर, ईमेल आयडी व पॅन डिटेल्स भरा
  • या सगळ्या स्टेप्स पूर्ण केल्यानंतर तुमचा क्रेडिट रिपोर्ट तायर होईल. त्यानंतर तुम्हाला Cibil Score  पाहता येईल.

बँकांमधून किंवा खाजगी संस्थांमधून कर्ज मिळविण्यासाठी CIBIL स्कोअर अत्यंत महत्त्वाचा असतो. How to check cibil score on google pay

आपल्याला एखाद्या आर्थिक अजचणीसाठी कर्जाची गरज असल्यास आपण बँकेत किंवा एखाद्या खाजगी संस्थेत कर्ज मिळविण्यासाठी जातो. त्यावेळी आपल्याला  CIBIL स्कोअर पाहूनच लोन द्यायचे की नाही हे ठरवले जाते. त्यामुळे कोणत्याही बँकेतून लोन घेण्यासाठी तुमचा CIBIL स्कोअर चांगला असायला हवा.

 CIBIL स्कोअरलाच क्रेडिट स्कोअरही म्हटले जाते. तसेच, CIBIL चे पूर्ण स्वरूप क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो (इंडिया) लिमिटेड आहे. CIBIL स्कोअर हा 3 अंकांचा असतो. 300 ते 900 च्या दरम्यान तुमचा CIBIL स्कोअर असला तर तो चांगला मानला जातो. जर तो 300 च्या कमी असेल तर तो खराब CIBIL स्कोअर ठरतो. एवढ्या कमी स्कोअरवर तुम्हाला कोणतीच बँक लोन देणार नाही. परंतु, जर तुमचा स्कोअर 750 पर्यंत असेल तर तो सर्वांत चांगला मानला जातो. त्यामुळे तुम्हाला या फीचरमुळे स्कोअरवर लक्ष ठेवणं सोप होईल. सतत लक्ष असल्यामुळे क्रेडिट स्कोअर कमी होण्याची शक्यता उरणार नाही. यामुळे, बँकेतून लोन मिळवणं ही सहज होईल. तसेच, तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असल्यास, तुम्ही Google Pay वर त्वरित पर्सनल लोनही मिळवू शकता.

गुगल ऍप विविध भाषांमध्ये उपलब्ध आहे

गुगलनं आपल्या डिजिटल पेमेंट अ‍ॅप (Digital Payment App) Gpay मध्ये एका नव्या भाषेचा सपोर्ट अ‍ॅड केला आहे. UPI-बेस्ड Gpay मध्ये आता Hinglish भाषेला स्थान देण्यात आले आहे. याबाबत कंपनीने भारतात याआधीच घोषणा केली होती. अखेरीस हे नवं अपडेट (New Update) जारी करण्यात आले आहे. Hinglish भाषेच्या सपोर्टसोबतच Google Pay मध्ये आता एकूण भाषांची संख्या 10 झाली आहे. यामध्ये इंग्रजी (English), हिंदी (Hindi), बंगाली (Bengali), गुजराती (Gujarati), कन्नड (Kannada), मराठी (Marathi), तामीळ (Tamil) आणि तेलगु (Telugu) या भाषांचा समावेश आहे.