Car loan कार लोन घ्यायचा विचार करताय? मग आर्थिक नुकसान टाळण्यासाठी हे वाचा!

Car loan

Car loan आज अंगणात किंवा सोसायटीच्या पार्किंगमध्ये गाडी असणे हे प्रत्येकाचे गरजयुक्त स्वप्न बनलेले आहे. कारण हल्ली सर्वांनाच कारची आवश्यकता असते. आणि सध्याच्या बाजारातील  वाहनकर्ज पर्यायामुळे ते प्रत्येकाला सोपेही वाटते.  आपल्याला असे वाटते की,  बजेटच्या कमतरतेमुळे अनेकजण कार लोनचा पर्याय निवडतात परंतु तसे नसते, लोनचा पर्याय निवडणे गरज आहे असे बाजारात जाहिरातबाजी करण्यात आली आले. अनेक कंपन्या,  बँका ग्राहकांनी त्यांच्याकडूनच वाहन कर्ज घ्यावे म्हणून विविध ऑफर्स त्यांना देतात.

सध्या मार्केटमध्ये खाजगी कंपन्यांनी आणि बँकांनी देखील कार लोन देण्याची प्रक्रियाही अत्यंत सोपी केली आहे. ग्राहकाचे उत्पन्न आणि परतफेड करण्याची क्षमता तपासून बँका कार लोन सहज प्रोसेस करतात.  परंतु Car loanच्या या जाळ्यात अडकण्यापूर्वी तुम्ही काही गोष्टींची काळजी घेणे आणि सतर्क रहाणे तितकेच गरजेचे असते. म्हणूनच आम्ही आज car loan  घेताना  कोणकोणती काळजी घ्यावी, म्हणजे आर्थिक अडचणी येणार नाहीत या विषयावर सविस्तर लेख घेऊन आलो आहोत.

वाहन कर्जाचा इंटरेस्ट रेट तपासा – check interest rate of car loan  

      मार्केटमध्ये अनेक खाजगी कंपन्या आणि बँका कार लोन देत असतात, कार लोन देताना विविध ऑफर्स देखील त्यांच्याकडून दिली जाते.  त्याला न भुलता मार्केटमध्ये उपलब्ध असलेले सर्व पर्याय तपासून पहा, ज्या ठिकाणी कमी व्याजदर असेल तोच पर्याय निवडा. जेणेकरुन तुमच्यावर आर्थिक ओझे येणार नाही. आणि वाहन कर्जाचा व्याजदर जितका कमी असेल तितके कमी हप्ते तुम्हाला भरावे लगतील.

क्रेडिट स्कोअर credit score

केवळ वाहन कर्जच नाही तर कोणत्याही प्रकारचे कर्ज घेण्यासाठी बँका किंवा खाजगी लोन देणाऱ्या कंपन्या सर्वप्रथम तुमचा क्रेडिट स्कोर credit score तपासतात. आणि तुमचा क्रेडिट स्कोअर 800-900 च्या दरम्याने असेल तर तो चांगला मानला जातो मगच तुम्हाला लोन दिले जाते. कोणत्याही बँकेत किंवा खाजगी कंपनीमध्ये कार लोनसाठी अप्लाय करताना सर्वात आधी ऑनलाईन पद्धतीने तुमचा क्रेडिट स्कोअर तपासा. (इथे आपण याआधी क्रेडिट स्कोअरवर लेख लिहिलाय त्याची लिंक द्या) तुमचे प्रत्येक पेमेंट वेळच्या वेळी होईल, कोणताही ईएमआय चुकणार नाही याची काळजी घ्या. त्याचा परिणाम आपल्या क्रेडिट स्कोअरवर होत असतो.

वाहन कर्जाचा कालावधी period of car loan

आपण कोणतेही कर्ज घेतो तेव्हा  त्या कर्जाची एक डेडलाइन आपल्याला दिली जाते. आणि त्याच मुदतीच कर्जफेड करायची असते. वाहन कर्जाचे देखील तसेच असते. बँक तुम्हाला कर्जाची परतफेड करण्यासाठी  नक्की किती मुदत देते हे तुम्ही सजगपणे एकदा तपासले पाहिजे. जेव्हा कर्जाचा कालावधी जास्त असतो तेव्हा आपल्याल कमी हप्ता भरावा लागतो. परंतु असे करत असताना आपण कंपनीला जास्तीचेच पैसे देत असतो. त्यामुळे तुमचे बजेट आधी ठरवा आणि त्यानुसारच car loan घ्या. जेणेकरुन तुम्हाला कमी कालावधीत लोन चुकवता येईल.

इतर शुल्क कोणकोणते आहेत त्याची माहिती मिळवा

 कार लोन देताना बँका  विविध प्रकारचे शुल्कही आकारते.  यामध्ये अर्ज शुल्क, प्रीपेमेंट पेनेल्टी, ओरिजिनेशन फी असे अनेक शुल्क असतात.  आपण या शुल्कांबद्दल काळजीपूर्वक वाचलं पाहिजे. बरेचदा हे  शुल्क  अतीरिक्त स्वरुपात लावले जातात. आपल्याला याची काहीच कल्पना नसते.आणि आपण घाईघाईने वाहन कर्जासंबंधीत कागदपत्रांवर सह्या करतो. आणि त्यांच्या अटी शर्तींमध्ये बांधले जातो. तसे न करता बँकेकडून आणि कंपन्यांकडून लावण्यात आलेले अतीरिक्त शुल्क कोणकोणते आहेत ते समजून घ्या, ते कशा कशासाठी लावण्यात आले आहेत त्याची विचारणा करा.

वाहन कर्ज घेताना काळजी घ्या – careful when taking car loan

जर तुम्ही Car Loan घेत असाल, तर तुम्ही 20-4-10 या नियमानुसार  हे लोन घेणे समजदारीचे ठरते. असे केल्यास भविष्यात तुम्हाला आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत नाही. या नियमानुसार कोणतीही कार खरेदी करताना तुम्ही कारच्या किंमतीच्या 20 टक्के डाउनपेमेंट  करा,  कर्जाच्या रकमेची परतफेड करण्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त 4 वर्षांचा कालावधी निवडा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे,  EMIची रक्कम तुमच्या मासिक पगाराच्या 10 टक्क्यांपेक्षा कमी ठेवा.