Kadaba Kutti Machine Scheme 2023: कडबा कुट्टी योजना 2023 ऑनलाईन अर्ज सुरू

Kadaba Kutti Machine Scheme 2023

Kadaba Kutti Machine Scheme 2023: महाराष्ट्र शासन दरवर्षीं शेतकऱ्यांसाठी विविध योजना जाहीर करीत असते. त्या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना रोजगार मिळावा किंवा शेती अवजारे, यंत्रे देऊन शेतीमध्ये मदत व्हावी हा शासनाचा हेतू असतो. अशीच एक महत्त्वाची योजना म्हणजे, कडबा कुट्टी योजना 2023 राबवत असते. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कडबा कुट्टी मशीन खरेदी करण्यासाठी 50 ते 75 टक्के अनुदान देण्यात येते. .

कडबा कुट्टी मशीन म्हणजे काय? Kadaba Kutti Machine Scheme 2023

       जनावरांना गवत देताना त्याचे बारीक बारीक तुकडे व्हावे म्हणून ते कटर ने कट केले जातात, या मशिनला कडबा कुट्टी मशीन असे म्हणतात. दुभती जनावरे किंवा गायी म्हशींचे पालन केले आहे आणि दुध व्यवसाय जे शेतकरी करीत आहेत त्यांना या मशिनीचा खूप उपयोग होतो.

बरेचदा शेतीच्या अती कामामुळे शेतकऱ्यांना गवत, कडबा बारीक करुन गायी म्हशी किंवा दुभत्या जनावरांना देणे शक्य होत नाही अशावेळी ही कडबा कुट्टी मशीन गवत बारीक करते, जेणेकरुन  दुग्ध जनावरांना ते गवत पचवताना अडचण येत नाही. शेतकऱ्यांना हाती हे काम करताना बराच वेळ लागतो परंतु कडबा कुट्टी मशीनवर तेच काम काही सेकंदात करता येते.  म्हणूनच महाराष्ट्र सरकर दरवर्षी कडबा कुट्टी मशीन योजना राबवत असते. त्यातून अनेक शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते, योजनेअंतर्गत कडबा कुट्टी मशीन खरेदीवर 50 ते 75 टक्के अनुदान शासनाकडून देण्यात येते. Kadaba Kutti Machine Scheme 2023

       यावर्षी देखील शासनाने कडबा कुट्टी योजना 2023 जाहीर केली आहे. तुम्हाला देखील तुमच्या घरच्या वापरासाठी गवत बारीक करण्यासाठी कडबा कुट्टी मशीन हवी असेल तर तुम्ही देखील शासनाकडे अर्ज करु शकता हा अर्ज कसा करायचा हे या लेखामध्ये सविस्तरपणे मांडण्यात आले आहे. लेख शेवटपर्यंत वाचा आणि आजच अर्ज करा.

कडबा कुट्टी मशीन योजना 2023 साठी पात्रता

 • अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासा असावा.
 • अर्जदाराचे वय 18 वर्षे पूर्ण असावे.
 • अर्जदाराकडे किमान 10 एकर शेती असणे आवश्यक आहे.
 • बँकेत खाते असून ते आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांकाशी लिंक असावे.

कडबा कुट्टी मशीन योजना 2023 साठी  आवश्यक कागदपत्रे

 • आधारकार्ड, रेशनकार्ड, पॅनकार्ड
 • विजबील
 • बँक खात्याचा तपशील
 • जमिनीचा सातबारा
 • 8 अ उतारा

कडबा कुट्टी मशीन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना किती अनुदान मिळते?

कडबा कुट्टी योजना 2023 अंतर्गत शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाकडून 50 ते 75 टक्के अनुदान  देण्यात येते.  उदाहरणच द्यायचे झाले तर  एखाद्या शेतकऱ्याने कडबा कुट्टी मशीन 30 हजार रुपये भरुन खरेदी केली असेल तर त्यावर तर त्यावर महाराष्ट्र शासनाच्या योजेनच्या माध्यमातून 15 ते 17 हजार इतकी रक्कम देण्यात येते. Kadaba Kutti Machine Scheme 2023

कडबा कुट्टी योजना 2023 अनुदान मिळविण्यासाठी अर्ज प्रक्रिया

 • सर्वात प्रथम तुम्ही महाराष्ट्र शासन योजनां प्रकाशित होणऱ्या राबविण्यात https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer

या वेबसाईटला भेट द्या.

 • तुमचा ईमेल आयडी आणि मोबाईल नंबरच्या मदतीने तुम्हाला त्या वेबसाईटवर लॉगीन करावे लागले.
 • मुख्य पानावर गेल्यानंतर तुम्हाला तेथे शेतकरी योजना असा पर्याय दिसेल त्या पर्यायावर क्लिक करा
 • त्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्र  विविध योजना दिसतील.
 •  त्यापैकी ‘कृषी यंत्रणा पुढील बाबी निवडा’, या पर्यायावर क्लिक करा.
 • तुमच्या समोर एक अर्ज उघडेल, त्यामध्ये पहिला पर्यायामध्ये आपल्याला – कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य हा पर्याय निवडा.
 • त्यानंतरच्या पर्यायांमध्ये – मनुष्य चलित अवजारे हा पर्याय निवडा.
 •  त्यानंतर पुढील स्लाईडमध्ये कटर श्रेडरची निवड करा.
 •  हा पर्याय निवडल्यानंतर स्क्रिनवर मशीनचे प्रकार दिसतील. आपल्याला आवश्यक असलेल्या साईजनुसार मशीन निवडा  
 • कडबा कुट्टी मशीन निवडल्यानंतर त्याची किंमत ऑनलाईन भरणे आवश्यक असते.
 • सबमीट बटन वर क्लिक करा आणि तुमचा अर्ज सबमीट करा. Kadaba Kutti Machine Scheme 2023