Centre Free Ration Scheme: प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत 80 कोटी गरीबांना मिळणार 5 वर्षे मोफत धान्य

Centre Free Ration Scheme

Centre Free Ration Scheme:  आपले लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने गरिबांना मोफत रेशन देण्याचा मोठा निर्णय घेतला आणि त्याची अंमलबजावणी देखील सुरु झाली. 80 कोटींहून अधिक  रेशनकार्ड धारकांना दरमहा 10 किलो मोफत रेशन देण्यासाठी  शासनाने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना जाहीर केली.  PMGKAY योजनेचा कालावधी पुढील पाच वर्षांसाठी शासनाकडून वाढवण्यात आला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने या निर्णयाला मंजुरी दिली असून आता 2028 पर्यंत योजनेअंतर्गत लोकांना मोफत रेशन मिळत राहील असे जाहीर केले आहे. या योजनेसंबंधीत सविस्तर माहिती मिळविण्यासाठी हा लेख पूर्ण वाचा.

केंद्र शासनाने योजनेचा कालावधी पुढील 5 वर्षांसाठी वाढवला.

केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला की, दिनांक १ जानेवारी २०२४ पासून पुढील पाच वर्षांसाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत मुदतवाढ करण्यात आली आहे.  करोना काळात लॉकडाऊनमुळे त्रासलेल्या गोर गरीबांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारने ही योजना सुरू केली होती.. Free Ration Scheme

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न  योजनेचा फायदा कोणाला आणि कसा मिळतो

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत सुमारे 80 कोटी रेशन कार्ड धारकांना मोफत धान्य दिले जाते.  प्रति सदस्य दरमहा  गहू आणि तांदूळ 5 –5 किलो  म्हणजेच 10 किलो धान्य दिले जाणार आहे. या योजनेत समाविष्ट असलेल्या लाभार्थ्यांमध्ये शहरी आणि ग्रामीण भागातील सर्व गरीब म्हणजेच दारिद्र्य रेषेखालील नागरिकांचा समावेश आहे. जे स्थलांतरित मजूर आहेत त्यांचा देखील या योजनेच्या लाभआर्थ्यांमध्ये समावेश करण्यात आला आहे. शेतकरी, मनरेगा मजूर, पेन्शन घेणारे विधवा, वृद्ध आणि अपंग लोक या योजनेचे लाभार्थी असतील. तसेच जन धन खाते असलेल्या महिला, बचत गटांच्या महिलांना देखील या योजनेअंतर्गत मोफत धान्य मिळण्याची सोय करण्यात आली आहे. Free Ration Scheme

Centre Free Ration Scheme प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेमुळे केंद्र शासनाला लाखो कोटींचा खर्च करावा लागणार आहे.

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी PMGKAY योजनेंचा कालावधी अजून   5 वर्षांकरीता वाढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यावेळी ते म्हणाले की,  प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना पुढील पाच वर्षांसाठी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला असून याचा फायदा ८१ कोटी लोकांना होणार आहे. यामध्ये भारत सरकार ११ लाख ८० हजार कोटी रुपये खर्च करेल. गेल्या पाच वर्षांत सुमारे १३.५० कोटी लोक दारिद्र्यरेषेतून बाहेर आले आहेत. या योजनेमुळे केंद्र आणि राज्य सरकारांवर आर्थिक ताण येणार आहे तरीही शासन गरीबांना मोफत धान्य पुरविण्याच्या निर्णयावर ठाम आहे.

तुम्हाला मोफत रेशन मिळत नसेल तर पुढील प्रमाणे तक्रार करा

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत तब्बल  80 कोटींहून अधिक रेशनकार्ड धारकांना 5 वर्षांसाठी मोफत धान्य मिळणार आहे. तुम्ही योजनेचे लाभार्थी आहात आणि रेशन दुकानदार तुम्हाला तुमच्या रेशन कार्डवर नमूद केलेले धान्य देण्यास नकार देत असेल तर तुम्ही त्या दुकानदारा विरोधीत तक्रार करु शकता.  Free Ration Scheme

राष्ट्रीय अन्न सुरक्षा पोर्टल म्हणजेच NFSA  च्या 02222831983/  02222025313. या टोल फ्री क्रमांकावर फोन करुन तक्रार करु शकता.   शासनातर्फे प्रत्येक राज्यासाठी हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करुन देण्यात आला आहे. तसेच  ईमेल करुन देखील तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता. त्यासाठी तुम्हाला NFSA च्या वेबसाइटच्या  https://nfsa.gov.in  या ईमेल आयडीवर मेल करावा लागेल.

शासनाकडुन मिळालेले मोफत धान्य दुसऱ्यांना विकणे हा गुन्हा आहे.

गरजूंच्या हक्काचे धान्य काळ्याबाजारात विकणे हा गुन्हाच आहे. अन्नसुरक्षा कायदा १९५५ कलम ३ व ७ नुसार काळाबाजार करणाऱ्यांवर शासनामार्फत कारवाई  केली जाऊ शकते. यात फौजदारी गुन्हा दाखल होऊन विक्रेत्याचा परवाना निलंबित किंवा रद्दही देखील करण्यात येतो.  अनामत रक्कम सरकारकडे जमा होऊन अवैध माल सरकारदरबारी जमा होण्याची तरतूद करण्यात आली आहे.