ready reckoner rate: जमीनीच्या नकाशासोबतच घरबसल्या जाणून घ्या तुमच्या जमिनीचे रेडीरेकनर दर

ready reckoner rate

ready reckoner rate जमीन खरेदी करणे किंवा विक्री करणे या सर्व गोष्टींसाठी सर्वात महत्त्वाचे असतात ते म्हणजे जमीनीचे रेडी रेकनर दर. मग हे रेडीरेकनर दर म्हणजे नक्की काय? आणि हे जमीनीचे शासनाने निश्चित केलेले दर नेमके कसे पहायचे? त्याचा सर्वसामान्यांच्या जीवनाची काय संबंध आहे आणि हे रेडीरेकनरचे दर नेमकं कोण ठरवतं आणि कशाच्या आधारावर हे दर ठरवले जातात याबाबत आज आपण  या लेखाच्या माध्यमातून माहिती मिळवणार आहोत. Real Estate

रेडीरेकनर दर म्हणजे काय? ready reckoner rate

शासनाच्या उपनिबंधक कार्यालया मार्फत अधिसूचित केलेल्या मालमत्तेच्या व्यवहारांचे किमान दर  ठरविले जातात त्याला रेडी रेकनर दर असे म्हटले जाते. महाराष्ट्रात रेडीरेकनर दरापेक्षा कमी किंमतीत जमीन किंवा मालमत्ता विकता येत नाही. जमीनीसंदर्भात व्यवहार करु इच्छिणाऱ्या व्यक्तीला शासनाने ठरवून दिलेल्या रेडीरेकनरच्या दराप्रमाणे बाजार मूल्य कमी किंवा जास्त असले तरी शासकीय दरांच्या आधारेच मालमत्तेची नोंदणी  करावी लागते. याचे कारण असे की, कोणत्याही मालमत्तेचे मुद्रांक शुल्क तसेच जमीन किंवा मालमत्तेच्या नोंदणी शुल्काची रक्कम ही रेडी रेकनर दरांच्या आधारेच ठरवली  जात असते. ready reckoner rate

महाराष्ट्रातील रेडीरेकनर दर ऑनलाइन कसे शोधायचे

 • महाराष्ट्र शासन नोंदणी आणि मुद्रांक विभागच्या पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करुन अधिकृत वेबसाईटवर जा.

https://igrmaharashtra.gov.in/Home/ease_of_doing_business

 • ऑनलाइन सेवा यादीमध्ये ‘EASR’पर्यावर क्लिक करा
 • वेबसाईटवर महाराष्ट्राचा नकाशा ओपन होईल.
 • नकाशामध्ये दिसत असलेल्या नेमक्या कोणत्या शहराचे रेडीरेकनर दर तपासायचे आहेत त्या शहराच्या नावावर क्लिक करा.
 • त्यानंतर ड्रॉप-डाउन पर्यायातील तुमचा तालुका आणि गाव निवडा.
 • या पद्धतीने तुम्हाला हवे त्या जमिनीचे  रेडी रेकनर दर मिळवू शकता.

महाराष्ट्रातील जमीनीचे दर जाणून घ्या रेडीरेकनर मोबाईल अॅपवर

महाराष्ट्रातील जमीनीचे आणि मालमत्तांचे रेडीरेकनरचे दर जाणून घेणे आता अगदी सोपे झाले आहे. रेडीरेकनर या मोबाईल अॅपच्या मदतीने आज कोणीही कधीही घरबसल्या जमीनीच्या सातबाऱ्यासह जमीनीचा नकाशा आणि त्या जमीनीचे रेडी रेकनर दर अगदी सहजरित्या पाहू शकत आहेत. Ready Reckoner Rates in Maharashtra for 2023

 • तुमच्या मोबाईलमधील प्ले स्टोअर अॅपवरून Ready Reckoner Maharashtra App डाउनलोड करा.
 • app डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला  सर्वप्रथम एक भाषा निवडायची आहे. आणि त्यानंतर   तुमच्या नावाने रजीस्ट्रेशन किंवा ल़ॉगीन करायचे आहे.
 • त्यानंतर ज्या ठिकाणाच्या जमिनीचे दर जाणून घ्यायचे आहेत तो जिल्हा, तालुका, गावाचे नाव  त्यात नमूद करायचे आहे.
 • लगेचच तुम्हाला जाणून घ्यायचे असलेल्या जमीनीचे रेडीरेकनर दर तुमच्या समोर खुले होतील.  

कोण ठरवतात जमिनीचे रेडीरेकनर दर?

आपल्या महाराष्ट्र राज्याच्या महसूल विभागाने रेडी रेकनर दर  म्हणजेच शासनाने ठरवून दिलेले जमिनीचे दर ऑनलाइन तपासण्याची सुविधा आता उपलब्ध आहे. परंतु अनेकांना असा प्रश्न पडला असले की हे रेडीरेकनरचे दर नक्की कोण ठरवत असेल. आणि कशाच्या आधारे हे दर ठरवले जात असतील. Ready Reckoner Rates in Maharashtra for 2022

 • महाराष्ट्र महसूल विभागामार्फत राज्यातील जमीनीचे आणि मालमत्तेचा रेडीरेकनर दर ठरवले जातात.
 • हे दर ठरवताना त्या त्या भागाचा सर्वे केलेला असते.
 • प्रत्येक जमिनीचा एक इतिहास असतो, तो इतिहास जाणून घेऊनच त्यावर शुल्क ठरवले जात असते.
 • एखाद्या जमिनीतून शासकीय प्रकल्प जाणार असेल तर त्या जमीनीच्या रेडी रेकनरच्या दरांपेक्षाही जास्त किंमतीने ज्यांच्या जांच्या जमिनी गेल्या आहेत त्यांना पैसे दिले जातात.
 • ज्यांच्या जमीनी शासकीय प्रकल्पांमध्ये गेल्या आहेत त्यांचे कोणत्याही प्रकारे नुकसान होऊ नये म्हणून शासनातर्फे हा नियम करण्यात आलेला आहे.
 • प्रकल्पग्रस्तांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये म्हणून त्यांना रेडीरेकनच्या दुप्पट तिप्पट दर दिला जातो. कारण शासकीय प्रकल्प किंवा हायवे त्या जमिनीतून गेल्यानंतर त्या जमिनीचे दर वाढणार असतात.

याचा अर्थ असा होतो की, एखाद्या जमीनीचे दर हे तेथील उपयोगितेवरून ठरत असतात.