काही वर्षांपूर्वी कर्ज मिळविणे ही काही बँकांची मक्तेदारी होती परंतू आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. मार्केटमध्ये अनेक बँका आणि वित्तिय संस्था आहेत ज्या वैयक्तिक, शैक्षणिक, घरासाठीचे, वाहनासाठीचे कर्ज देण्यास तयार असतात. परंतू या सर्वांची एकच अट असते ती म्हणजे कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचा सिबिल स्कोर चागंला असला पाहिजे. पण मग हा सिबिल स्कोर म्हणजे काय असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर आजच्या लेखातील माहिती तुमच्यासाठी आहे. CIBIL score check online
सिबिल स्कोर म्हणजे काय?
आज अर्थिक व्यवहारांचे गणित दिवसागणिक बदलत चालले आहे. काही वर्षांपूर्वी चेक आणि डिमांड ड्राफ्टने होणारे आर्थिक व्यवहार आज ई बँकिंग आणि युपीआयच्या क्यू आर कोडने केले जात आहेत. झटपट होणारे आर्थिक व्यवहार आणि बदलती आर्थिक गणिते यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या आर्थिक व्यवहारांची एक हिस्ट्री बनत आहे. हाच प्रत्येक व्यक्तीने केलेला आर्थिक व्यवहार आणि वेळच्या वेळी भरलेली बिले यावरून त्या व्यक्तीचा सिबिल स्कोर बनत असतो. Credit Information Bureau India Limited असा CIBIL या शब्दाचा फूल फॉर्म आहे. ही एक आर्थिक व्यवहारांसंदर्भात डाटा गोळा करणारी कंपनी आहे. या कंपनीमार्फत प्रत्येक व्यक्तीच्या बँकेतील व्यवहार तपासून एक अंक दिला जातो. त्या अंकावरुन प्रत्येक व्यक्तीचे आर्थिक व्यवहार चांगले आहेत की नाहीत या गोष्टी समोर येतात. CIBIL score check online
सिबिल स्कोर कशासाठी महत्त्वाचा असतो?
आपण जेव्हा बँकेत किंवा कोणत्याही वित्तिय संस्थेमध्ये कर्ज मागणासाठी जातो तेव्हा आपला सिबिल स्कोर तपासला जातो. सिबिल स्कोर म्हणजे प्रत्येक व्यक्तीची आर्थिक व्यवहारांची हिस्ट्री असते. तुम्ही तुमच्या मिळकतीपेक्षा जास्त कर्ज घेऊन ठेवले असेल आणि त्याचे ईएमआय भरण्यास सक्षम नसाल तर नक्कीच त्याचा परिणाम तुमच्या सिबिस स्कोर वर होणार आहे. CIBIL score check online
Cibil score चेक करण्याची पद्धत जाणून घ्या!
तुमचा सिबिल स्कोर तुम्हाला माहिती असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
- https://www.cibil.com/freecibilscore या लिंकवर क्लिक करुन तुम्ही तुमचा सिबिल स्कोर तपासू शकता.
- वेबसाईटवर गेल्यानंतर Get Your CIBIL SCORE या पर्यायावर क्लिक करा.
- तुमच्यासमोर एक फॉर्म ओपन होईल त्यात तुमची संपूर्ण माहिती अचूक पद्धतीने भरा.
- तुमचे अकाउंट तयार होईल त्यात तुमचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड तुम्हाला मिळेल. तुमचे सिबिल च्या वेबसाईटवरील अकाउंट ऍक्टिव्ह करण्यासाठी तुम्हाला एक ईमेल येईल. इमेलमध्ये दिलेल्या लिंक वरती क्लिक करून तुमचे अकाउंट तुम्हाला एक्टिवेट करायचे आहे.
- पुन्हा तुम्हाला लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळेल त्याच्या वापराने सिबिलच्या वेबसाईट वरती लॉगिन करून घ्या.
- आता तुम्हाला काही सस्क्रिप्शन ची माहिती देण्यात येईल तुम्हाला वर्षातून एकचा तुमचा सिबिल स्कोर रिपोर्ट हवा असल्यास तो तुम्हा मोफत मिळवू शकता परंतू एका पेक्षा जास्त वेळा तुम्हाला तुमचा सिबिल स्कोर रिपोर्ट बनवायचा असल्यास तुम्हाला पैसे भरावे लागतील.
- पुढे तुमच्या पॅन कार्ड नंबर व तुमची इचतर माहिती भरा.
- त्यानंतर तुम्हाला तुमचे लोन व क्रेडिट संबंधित काही प्रश्न विचारले जातील ज्याच्या आधारावर तुमच्या सिबिल स्कोर ची पूर्तता केली जाईल.
- शेवटी तुमचा सिबिल अहवाल तयार होईल आणि तुमचा सिबिल स्कोर देखील तुमच्या समोर येईल. CIBIL score check online
वाईट सिबिल स्कोर असेल तर काय करावे?
तुमचा सिबिल स्कोर 300 ते 550 च्या दरम्याने असेल दर नक्कीच तुमचे आर्थिक व्यवहार चांगले नाही असे हे आकडे दर्शवतात. आणि त्यामुळे कोणत्याही बँकेत तुम्हाला लोनसाठी अर्ज करता येणार नाही. मग सिबिल स्कोअर सुधारण्यासाठी नेमक्या कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत ते आपण येथे पाहू.
- एकावेळी दोन पेक्षा जास्त कर्जे घेऊ नका.
- ज्या तारखेला कर्जाचा EMI आहे त्याच तारखेला भरा. तारीख गेल्यानंतर पैस भरले तरी त्याचा सिबिल स्कोरवर वाईट परिणाम होतो.
- तुमची इतर देयके म्हणजे क्रेडिट कार्डचे बिल वेळीच भरा
- क्रेडीट कार्डच्या लिमिटपेक्षा जास्त पैसे खर्च करु नका.
- दर महिन्याच्या मिळकतीतून एक हिस्सा SIP किंवा FD मध्ये बचत करा.
- वेळोवेळी सिबिल स्कोर तपासत रहा.