Clean Gmail storage: Gmail स्टोरेज फुल झालंय का? मग या ट्रिक्स वापरुन करा क्लीन, जास्तीचे पैसे भरण्याची गरज नाही.

आज जगात अशी कोणतीही व्यक्ती नसेल जी जीमेलचा वापर करीत नसेल. छोट्या मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांचे Gmail अकाऊंट असते. कारण आजच्या ऑलाईनच्या जमान्यात विविध मार्गांनी आपण इमेल्सच्या माध्यमातून कामे करीत असतो. त्यात जीमेल हे अत्यंत सुविधाजनक माध्यम आहे. जगभरात वापरले जाणाऱ्या या जीमेलचा स्टोरेज फुल होतो तेव्हा नक्की काय केले पाहिजे याबाबत अधिक माहिती घेऊन आज आम्ही आलो आहोत, लेख पूर्ण वाचा आणि कोणतेही पैसे न भरता 15GB जीमेलचा योग्य वापर करा. Clean Gmail storage

Gmail ची सर्वोत्तम सुविधा

जीमेल आपल्याला 15 GB फाईल्स किंवा इन्फॉर्मेशन सेव करण्याची मुभा देतो. परंतु जेव्हा आपला डाटा 15 GB च्या वरती जाऊ लागतो तेव्हा मात्र आपल्याला ही मोफत सेवा नकोशी वाटू लागते. कारण सतत गुगल कंपनीकडून आपल्याला नोटीफिकेशन्स येऊ लागतात की जीमेल स्टोरेज फुल झाले आहे तर तुम्ही सबस्क्रिप्शन प्लॅन घ्या ज्यामुळे जीमेलमध्ये तुमचा डाटा सेव करण्यासाठी तुम्हाला जास्त जागा उपलब्ध करुन दिली जाईल. ज्यांना हे पॅकेज आर्थिकदृष्ट्या परवडते ते घेतात. अनेक कंपन्या देखील हे पॅकेज सहज घेतात. परंतु सामान्य माणसे दर महिना हे पैसे देऊ शकत नाहीत अशावेळी नेमके काय करावे की फुल झालेला जीमेल स्टोरेज क्लिन करता येईल. हिच महत्त्वाची माहिती आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. Clean Gmail storage

न वाचलेले मॅसेज डिलीट करा

तुम्ही न वाचलेले आणि अनावश्यक मॅसेज डिलीट करा. जेणेकरुन थोडी जागा रिकामी होईल. अनेक असे मॅसेजेस असतात जे कंपनी प्रमोशन किंवा बँकांचे प्रमोशन्स असतात, असे मॅसेज आपण उघडून देखील पाहत नाही. मग हे असे सर्व मॅसेज डिलीट करा.

मोठ्या अटॅचमेंट असलेले अनावश्यक मेल काढून टाका

तुमच्या जीमेल मध्ये मोठ्या अटॅचमेंट असलेले मेल असतील तर ते आजच काढा. कारण त्यामुळेच स्टोरेज फुल होत आहे. मोठ्या अटॅचमेंट तुमच्या लॅपटॉप किंवा मोबाईलमध्ये डाऊनलोड करुन घ्या आणि जीमेलमधून संबंधिक मेल डिलीट करा. जेणेकरुन जागा क्लीन होईल. Clean Gmail storage

गुगल फोटो डिलीट करा

जीमेल हे गुगल चेच प्रोडक्ट असल्याने गुगल फोटो, गुगल ड्राईव्ह असे सर्व मिळून आपल्याला 15 GB डाटा मिळत असतो अशा वेळी गुगलवर असलेले अनावश्यक फोटो डिलीट करा जेणे करुन काही जागा क्लिन होईल आणि जीमेल योग्य पद्धतीने वापरता येईल.

गुगल ड्राईव्ह क्लीन करा

जीमेल हे गुगल ड्राईव्हला कनेक्ट असते. तुम्हाला जीमेलमध्ये जास्त जागा हवी असेल तर सर्वात आधी गुगल ड्राईव्ह मध्ये सेव केलेल्या अनावश्यक गोष्टी काढून टाका. त्यामध्ये अनावश्यक व्हिडिओ, डॉक्युमेट्स असतील तर ते डिलीट करा.

क्लाऊड स्टोरेजचा वापर करा

तुम्ही तुमच्या वैयक्तिक किंवा ऑफिसच्या कामासाठी मोठ्या फाईल्स पाठवत असाल किंवा तुम्हाला मोठ्या फाईल्सचे मेल्स येत असतील तर तुम्ही असे मेल्स क्लाऊड स्टोरेजमध्ये सेव करु शकता. त्यामुळे तुमच्या जीमेल मधील जागा वाचेल.

Gmail ही जगभरात सर्वोत्तम सुविधा देणारी गुगल चीच उपशाखा आहे. कोणत्याही ऑनलाईन करावयाच्या कामांमध्ये जीमेल अकाऊंट आधी विचारले जाते. मुलांच्या परीक्षा असो किंवा शासकीय योजनांचा लाभ घ्यायचा असो प्रत्येक गोष्टीत ईमेल आयडी सर्वप्रथम विचारला जातो. आणि त्यानुसारच पुढे काम होते. काही काही तर वेबसाईट अशा आहे जेथे लॉगिन करण्यासाठी ईमेल विचारला जातो. ईमेल अकाऊंट नसेल तर त्या वेबसाईटवरील माहिती आपण मिळवू शकत नाही किंवा एखादी सेवा, सुविधा देखील आपण मिळवू शकत नाही. त्यामुळे तुमच्या जीमेल अकाऊंटचे योग्य पद्धतीने नियोजन करा.  Clean Gmail storage