CIBIL Score For Home Loan: गृहकर्ज मिळवण्यासाठीसिबिल स्कोअरकिती असावा? बँकेत जाण्याआधी हे नक्की वाचा

CIBIL Score For Home Loan प्रत्येकाचे स्वप्न असते की आपलं एक छोटसं का असेना पण स्वतःचं असं घर असावं. पण  हे खर खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे पैसे नसतील तर हे स्वप्न अपूर्णच ठेवायचं का? अजिबातच नाही. सध्या गृहकर्जाचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत. हल्ली घरखरेदीसाठी विविध बँका खाजगी कंपन्या हाउसिंग फायनान्स देऊ करतात. परंतु सध्या कोणतीही बँक किंवा खाजगी संस्था कोणत्याही प्रकारचे कर्ज देताना प्रत्येक व्यक्तीचा CIBIL Score तपासतात. मग हा सिबिल स्कोअर म्हणजे काय आणि तो कसा तपासायचा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गृहकर्ज घेण्यासाठी किती सिबिल स्कोअर सला पाहिजे. या सर्व गोष्टींची सविस्तर माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही देखील घर घेण्याचे स्वप्न पाहत असाल आणि त्यासाठी तुम्हाला गृहकर्ज हवे असेल तर नक्कीच हा लेख शेवटपर्यंत वाचा आणि माहिती मिळवा मगच गृहकर्जासाठी अप्लाय करा.  CIBIL Score For Home Loan

सिबिल स्कोअर म्हणजे काय

सर्व प्रथम आपण पाहूया सिबिल स्कोअर म्हणजे काय? तर सिबिल स्कोरला क्रेडिट स्कोर असे देखील म्हटले जाते. सिबिल (CIBIL) म्हणजेच क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्यूरो इंडिया लिमिटेड.  सन २००० साली स्थापन झालेल्या या संस्थेकडे प्रत्येक भारतीय व्यक्तीच्या व कंपन्यांच्या सर्व आर्थिक व्यवहारांची नोंदणी होत असते. त्यासाठी अनुक्रमे कन्जुमर ब्यूरो व कमर्शियल ब्यूरो हे दोन विभाग कार्यरत असतात.  एखाद्या व्यक्तीला अथवा संस्थेला कर्ज देताना बँका  आणि इतर कर्ज देणाऱ्या वित्तीय संस्था  सिबिल स्कोर चेक करतात. कारण सिबिल स्कोअर म्हणजे त्या त्या व्यक्तीची आर्थिक हिस्ट्री असते. त्या व्यक्तीने आजतागायत घेतलेले कर्ज त्याचे भरलेले इएमआय या सगळ्या गोष्टींचा परिणाम सिबिल स्कोअरवर पडत असतो. सिबिल स्कोअर हा एक अंक दर्शवतो तुमचे आर्थिक व्यवहारांसाठी. आणि  याच अंकांना पाहून एखाद्याला कर्ज दिले जाते. CIBIL Score For Home Loan

सिबिल स्कोअर कशाच्या आधारावर ठरत असतो

सिबिल स्कोर म्हणजेच क्रेडिट स्कोर हा व्यक्तीच्या कर्जाचा इतिहास  म्हणजेच व्यक्तीच्या आर्थिक व्यवहारांच्या आधारावर ठरत असतो.एखाद्या व्यक्तीने कर्ज घेतले असेल परंतु त्याचे इएमआय वेळच्या वेळी भरले नसतील तर त्या व्यक्तीचे आर्थिक व्यवहार नक्कीच चांगले नाहीत अशावेळी सिबिल स्कोअरचा आकडा कमी होतो. आणि एखाद्या व्यक्तीने लोन घेतले असेल आणि ते वेळच्या वेळी भरले असेल तर नक्कीच त्या व्यक्तीचा सिबिल स्कोअर चांगला असतो.  सिबिल स्कोर हा 300 ते 900 या संख्यांच्या यादरम्याने गणला जातो. 750 च्या पुढे अंक असतील तर व्यक्तीची क्रेडिट हिस्ट्री चांगली आहे असा अर्थ लावला जातो.CIBIL Score For Home Loan

गृहकर्ज मिळविण्यसाठी सिबिल स्कोअर किती असावा?

गृहकर्ज मिळविण्यासाठी वक्तीचा सिबिल स्कोअर चांगला असणे आवश्यक असते. म्हणजेच हा स्कोअर किमान 750 ते 900 च्या दरम्याने असेल तर कोणतीही बँक किंवा खाजगी वित्तिय संस्था तुम्हाला लगेचच गृहकर्ज देऊ शकते. परंतु हा स्कोअर 700 पेक्षा कमी असेल तर मात्र तुम्हाला गृहकर्ज मिळवताना अनेक अडचणी येऊ शकतात. म्हणून आम्ही असा सल्ला देऊ की, तुम्हाला गरज असेल तेव्हाच वस्तू खरेदी करा कारण एखादी वस्तू इएमआय वर खरेदी केली आणि त्याचे EMI भरले नाहीत तर मात्र तुमच्या सिबिल स्कोअरवर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो आणि जेव्हा तुम्हाला खरच कर्जाची गरज असेल जसे की गृहकर्ज तेव्हा तुम्हाला कोणत्याही बँकेकडून कर्ज मिळवताना अडचण येऊ शकते. CIBIL Score For Home Loan

असा चेक करा सिबिल स्कोअर

तुम्हाला तुमचा CIBIL Score तपासायचा असल्यास तुम्ही या लिंकवर क्लिक करुन  https://www.cibil.com/cibilrank CIBIL Score तपासू शकता. हा CIBIL Score ची अधिकृत वेबसाईट असून तुम्हाला तुमच्या बँक खात्याचा क्रमांक येथे भरावा लागेल बँकेचे इतर डिटेल्स इथे द्यावे लागतील मग तुमचा सिबिल स्कोअर तुमच्या समोर येईल. हल्ली सिबिल स्कोअर तपासायच्या अनेक पद्धती उपलब्ध आहेत.सर्वात सोपी पद्धत म्हणजे तुम्ही तुमच्या google pay ऍपच्या माध्यमातून देखील तुमच्या सिबिल स्कोअर तपासू शकता (आपला गुगल पे वरुन सिबिल स्कोअर कसा तपासायचा या लेखाची लिंक इथे द्या)