Loco pilot megaBharti 2024: भारतीय रेल्वेत ‘लोको पायलट’ पदाच्या 5696 जागा, 10 वी पास उमेदवारांसाठी सुवर्ण संधी

Loco pilot megaBharti 2024

Loco pilot megaBharti 2024 भारतीय रेल्वे विभागाने लोको पायलट या पदासाठी मेगाभरती जाहीर केली आहे. लोको पायलट हे भारतीय रेल्वेमधील वरिष्ठ स्तरावरील पद आहे. लोको पायलट ट्रेन चालवण्याचं आणि ट्रेनच्या हालचाल दरम्यान तिची योग्य देखभाल करण्याचे काम करतात. ट्रेनमध्ये बसलेल्या लोकांच्या सुरक्षेची जबाबदारीही लोको पायलटचीच असते. त्यामुळे हा अत्यंत प्रतिष्ठेचा जॉब आहे. Loco pilot megaBharti 2024

जर तुम्हालाही लोको पायलट व्हायचं असेल तर ही बातमी फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला रेल्वेत लोको पायलट कसं व्हायचं आणि त्यासाठी परीक्षा देताना पात्रता आणि वयोमर्यादा काय असावी या सर्व बाबींसंदर्भात माहिती देणार आहोत. हा लेख संपूर्ण वाचा आणि आजच लोको पायलट या पदासाठी ऑनलाईन अर्ज दाखल करा.  

Loco pilot megaBharti 2024 लोको पायलट बनण्यासाठी आवश्यक शिक्षण

भारतीय रेल्वे विभागात लोको पायलट होण्यासाठी उमेदवार 10 वी आणि 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक किंवा ऑटोमोबाईल यापैकी कोणत्याही ट्रेडमध्ये 2 वर्षांचा I.T.I. अभ्यासक्रम केलेला असणे आवश्यक आहे. तसेच अनुभव प्रमाणपत्र असल्यास उमेदवार निवडीमध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे.

पदाचे नाव – असिस्टंट लोको पायलट

असिस्टंट लोको पायलट पदभरती किती पदांसाठी करण्यात येत आहे?

 लोको पायलट या पदासाठी भारतीय रेल्वे विभागात तब्बल 5696 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आला आहे. आणि आजपर्यंतची सर्वात मोठी भरती असून जास्तीत जास्त तरुणांनी या संधीचा लाभ घ्यावा,

अर्जदाराची वयोमर्यादा काय आहे?

लोको पायलट या पदासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदार महिला पुरुष यांची वयोमर्यादा कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 30 इतकी आहे. आरक्षीत जाती जमातींसाठी वयोमर्यादेची अट शिथिल करण्यात येते. Loco pilot megaBharti 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती?

भारतीय रेल्वे विभागात लोको पायलट या पदासाठी भरती दिनांक  20 जानेवारी 2024 रोजी जाहिर करण्यात आली आणि अर्जदारांनी अर्ज करण्याची अंतीम तारीख ही दिनांक 19 फेब्रुवारी 2024 ही असणार आहे.

अर्ज कसा व कुठे करावा?

भारतीय रेल्वे विभागामार्फत लोको पायलट या पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. त्यासाठी इच्छूक उमेदवारांनी Https://Indianrailways.Gov.In/ या लिंकवर क्लिक करुन तुमचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल करायचा आहे. Loco pilot megaBharti 2024

अर्ज करताना किती शुल्क भरावे लागेल?

सामान्य किंवा ओपन गटातील अर्जदारांसाठी 500 रु परीक्षा फी असून SC/ST गटातील किंवा माजी सैनिक किंवा त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींसाठी 250 रु. परीक्षा फी ठेवण्यात आली आहे.

लोको पायलट परीक्षेनंतर उमेदवारांना तीन विविध पातळ्यांमधून जावे लागते

  1. लेखी परीक्षा

भारतीय रेल्वे लोको पायलट या पदासाठीची घेण्यात येणारी परीक्षा 120 गुणांची असते. ते सोडवण्यासाठी उमेदवारांना 90 मिनिटे इतका वेळ देण्यात येतो. त्या परीक्षेत यशस्वी झाल्यानंतर पुढच्या पातळीसाठी उमेदवाराला बोलावण्यात येते.

  • मुलाखत

लेखी परीक्षेत चांगले गुण मिळाल्यास उमेदवाराला मुलाखतीसाठी बोलावण्यात येते.  मुलाखतीमध्ये उमेदवाराचे तांत्रिक ज्ञान, सामान्य ज्ञान आणि संकटकालीन विचार करण्याची पद्धत पडताळली जाते.. मुलाखतीत जे उमेदवार यशस्वी होतात, त्यांची आरोग्य चाचणी केली जाते.

  •  आरोग्य चाचणी

मुलाखतीमध्ये उत्तम गुण मिळवलेल्या उमेदवाराला आरोग्य चाचणीसाठी पाठविण्यात येते. आरोग्य तपासणी या पातळीवर नेत्र तपासणी अनिवार्यपणे आहे.  या चाचणीमध्ये उमेदवार दूरच्या किंवा जवळच्या गोष्टी स्पष्टपणे पाहू शकतो की नाही हे पाहिले जाते. लोको पायलट पदासाठी तीनही परीक्षांमध्ये यशस्वी झालेल्या उमेदवारांची नियुक्ती केली जाते. Loco pilot megaBharti 2024

लोको पायलटच्या पदावर नियुक्त केलेल्या उमेदवाराला कधीही थेट लोको पायलट पद दिले जात नाही. आधी निवड झालेल्या उमेदवारांना किमान 2 वर्षांचा ट्रेनिंग पिरियड पूर्ण करावा लागतो. म्हणजे असिस्टंट लोको पायलटचे काम करावे लागते आणि  यानंतर लोको पायलट पदासाठी उमेदवारांना बढती दिली जाते.