Cow Milk Subsidy: महाराष्ट्र राज्यात अनेक शेतकरी किंवा ग्रामिण नागरिक दुग्ध व्यवसाय करतात. दुग्ध व्यवसाय करताना देखील अनेकदा या व्यवसायिकांना तोटा होत असतो. अशावेळी या राज्यातील विविध जिल्ह्यांमधील दुध उत्पादकांनी एकत्र येऊन महाराष्ट्र शासनाकडे अनुदानाची मागणी केली आहे. या मागणीचे पुढे काय झाले ते आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
दुध उत्पादकांच्या मागणीनुसार गाईच्या दुधाला अनुदान देण्याची मागणी
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस कधी जास्त पडतो तर कधी कमी. त्यामुळे शेतीचे नुकसान होते, अशावेळी अनेक शेतकरी शेतीला जोडव्यवसाय म्हणून दुध व्यवसाय करतात. परंतु गाईंना वैरण नाही तर दुध कसं मिळणार, किंवा जनावरांना होणारे आजार यांमुळे दुध उत्पादकांना नुकसान होताना दिसत होते, अशावेळी राज्यातील दुध उत्पदकांनी एकत्र येऊन महाराष्ट्र शासनाकडे दुध उत्पादकांना अनुदान देण्याची मागणी केली आहे. या मागणीला शासनाने देखील सकारात्मक प्रतिसाद देत मागणी मंजूर केली आहे, मग या शासकीय योजनेनुसाक किती शेतकऱ्यांना अनुदान मंजूर करण्यात आले ते आपण पुढे पाहू. Cow Milk Subsidy
शासनाने केले 165 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर
दुध उत्पादकांना नुकसान होऊ नये यासाठी मदत म्हणून शासनाने अनुदान योजना जाहीर केले आहे. त्यानुसार राज्यातील विविध जिल्ह्यांमधील दुध उत्पादकांना 165 कोटी रुपयांचे अनुदान महाराष्ट्र शासनाने मंजूर केले आहे. हे 165 कोटी रुपये जिल्ह्यातील दुध उत्पादकांच्या खात्यांमध्ये ट्रान्स्फर केले जाणार आहेत. Cow Milk Subsidy
दुध उत्पादन अनुदानासंबंधी शासन निर्णय
महाराष्ट्र राज्यातील दुध उत्पदकांच्या मागणीनुसार शासनाने त्यांना गाईच्या दुधावर अनुदान जाहीर केले आहे. त्यासाठी शासन निर्णय दि 26 फेब्रुवारी 2024 रोजी काढण्यात आला. त्या शासन निर्णयाची प्रत तुम्ही खालील लिंकवर क्लिक करुन मिळवू शकता. Cow Milk Subsidy
https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202402261047028001.pdf
निर्णय कधी घेण्यात आला?
महाराष्ट्र राज्य सरकारने दि. 11 जानेवारी ते 10 मार्च या कालावधीत गाईचे दूध विक्री केलेल्या शेतकऱ्यांना दूध अनुदान देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या शासन निर्णयानुसार दोन महिन्यात राज्यातील 6 लाख 303 शेतकऱ्यांचे तब्बल 33 कोटी लिटर दूध अनुदानासाठी पात्र ठरलेले आहे. यानुसार या सदर शेतकऱ्यांना 165 कोटी रुपये अनुदान म्हणून दिले जाणार आहेत. आतापर्यंत संपूर्ण महाराष्ट्र राज्यात 90 कोटी 90 लाख 85 हजार रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा देखील झाले आहेत. यानुसार राज्यातील सहा लाख 303 शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ मिळालेला आहे. Cow Milk Subsidy
कोणत्या जिल्ह्यासाठी किती अनुदान जाहीर?
दुध विक्रेत्यांना नुकसान होऊ नये यासाठी शासनाने दुध उत्पादकांसाठी अनुदान जाहीर केले आहे त्यानुसार कोणत्या जिल्ह्यातील दुध उत्पादकांनी किती अनुदान मिळाले ते आपण पुढे पाहू. Cow Milk Subsidy
- पुणे विभागातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना 95 कोटी रुपये जाहीर करण्यात आले आहेत.
- अमरावती विभागातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना 1 लाख 30 हजार रुपये जाहीर करण्यात आले आहेत.
- नाशिक विभागातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना 62 कोटी रुपये जाहीर करण्यात आले आहेत .
- कोकण विभागातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना 7 हजार रुपये जाहीर करण्यात आले आहेत.
- औरंगाबाद विभागातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना 8 कोटी रुपये जाहीर करण्यात आले आहेत.
- नागपूर विभागातील शेतकऱ्यांना 47 लाख रुपये अनुदान जाहार करण्यात आले आहे.
दुध व्यवसाय हा महाराष्ट्रात महत्त्वाचा व्यवसाय आहे. या व्यवसायावर इतरही अनेक व्यवसाय अवलंबून असता. दुधापासून दही, ताक, पनीर आणि इतरही पदार्थ बनतात. जेव्हा दुधाची आवक कमी होते तेव्हा नक्कीच दही आणि पनीर सारख्या हॉटेल इंडस्ट्रीमध्ये मोठी मागणी असलेल्या पदार्थांची किंमत वाढते. अनेक ठिकाणी रासायनीक किंवा भेसळयुक्त पनीर देखील तयार केले जाते परंतू ते मानवी जीवनासाठी अत्यंत हानिकारक असते.