Credit Card Tips: क्रेडिट कार्ड वापरताय? मग या चुका कधीच करु नका!

Credit Card Tips

Credit Card Tips: आर्थिक अडचणीत पैशांची गरज भागावी म्हणून जुन्या काळात कर्ज घेतले जाई. हे छोट्या मोठ्या गरजांसाठीचे कर्ज घेताना देखील अनेक अडचणींचा सामना करावा लागत असते.  परंतु आता  आगाऊ खर्च करुन नंतर त्याचे पैसे भरणे हे इतके कठीण राहीलेले नाही. त्यासाठी एक संकल्पना आहे ती म्हणजे क्रेडिट कार्ड.

हल्ली सगळ्याच बँका क्रेडिट कार्ड देतात आपल्यापैकी अनेकजण क्रेडिट कार्ड वापरण्यास प्राधान्य देखील देतात. कारण या क्रेडिट कार्डच्या वापराने तुमच्याकडे पैसे नसले तरी तुम्ही आगाऊ खरेदी करु शकता आणि महिन्याच्या शेवटी तुम्हाला एक बील भरावे लागले. परंतु तेच क्रेडिट कार्ड बेजबाबदारपणे वापरल्यास तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकते.

म्हणूनच आम्ही या लेखाच्या माध्यमातून क्रेडिट कार्ड धारकांनी कोणकोणत्या चूका करु नयेत ते सांगणार आहोत, तर लेख शेवटपर्यंत वाचा आणि तुमच्या  आर्थिक अडचणी वाढणार नाहीत याची काळजी घ्या!

तुमच्या क्रेडिट कार्डचे पेमेंट करण्याची तारीख लक्षात ठेवा – Credit card payment

क्रेडिट कार्डचे पेमेंट करण्यासाठी तुम्ही auto cut payment  पर्याय सुरु ठेवाल असेल आणि तुम्हाला पैसे कट होण्याची तारीख माहीत नसेल तर ही सवय तुम्हाला महागात पडू शकते.

बिल झाल्यानंतर पेमेंट तपासा – Check your credit payment

तुमच्या खरेदीचे बिल तयार झाल्यानंतर, स्टेटमेंट नक्की तपासा. जर  जास्तीची रक्कम बीलात जोडली गेली असेल, तर बँकेच्या कस्टमर केअरसोबत संवाद साधा. बिलात जोडले गेलेले अतिरिक्त शुल्क कमी झाल्यानंतरच पेमेंट करा, कारण क्रेडिट कार्ड धारकाने एकदा पैसे भरले की पैसे मिळण्याची शाश्वती नसते.

मनी व्ह्यू देत आहे 20 लाख रुपयांपर्यंत झटपट कर्ज, तेही सिबिल स्कोअर शिवाय

Credit Card Tips क्रेडिट कार्डचे केलेले पेमेंट बँकेच्या सर्व्हरवर दिसत नसेल तर दोनदा पेमेंट करु नका

बरेचदा क्रेडिट कार्ड वापरताना असे होते की, बँकेच्या सर्व्हरवर पेमेंट अपडेट होत नाही. तेव्हा तुम्हाला असे वाटू शकते की, तुमच्याकडून कदाचित पेमेंट केले गेले नाही, त्यामुळे तुम्ही एक ऐवजी दोनदा पेमेंट करता.  जर तुम्ही  बँकेला असे पेमेंट केले असेल आणि तरीही त्याचे अपडेट सर्व्हरवर दाखवले जात नसतील तर परत परत पेमेंट करु नका. अशावेळी क्रेडिट कार्ड देणाऱ्या बँकेच्या कस्टमर केअर विभागाशी संपर्क साधा.

तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला ठेवा – good credit score

तुमच्या क्रेडिट कार्डचा स्कोअर चांगला रहावा यासाठी तुम्ही क्रेडिट कार्डचा वापर जबाबदारीने केला पाहिजे. क्रेडिट कार्डच्या बिलाचे पेमेंट वेळेवर करणे, दिलेल्या लिमिटपर्यंकत शॉपींग करणे या गोष्टी पाळल्या गेल्या पाहिजेच. म्हणजे क्रेडिट स्कोअर चांगला राहतो आणि भविष्यात तुम्हाला कोणतेही मोठे लोन घ्यायचे असल्यास तुमच्या banking history म्हणजेच सिबिल स्कोअर मध्ये ते दिसते, तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला सेल तर तुम्हाला लोन मिळते आणि क्रेडिट स्कोर चांगला नसेल तर बँका तुमच्या कर्जाचा अर्ज रद्द करू शकतात.

क्रेडिट कार्डच्या विविध शुल्कांबद्दल आधिच जाणून घ्या

ज्या बँकेच्या माध्यमातून तुम्हाला क्रेडिट कार्ड दिले जाते ती बँक क्रेडिट कार्डची सेवा देण्याबद्दल विविध शुल्क आकारत असते. यामध्ये वार्षिक शुल्क, कार्ड जारी करण्याचे शुल्क, कार्ड बदलण्याची फी, स्टेटमेंट फी इत्यादींचा समावेश आहे. तुम्ही पहिल्यांदाच क्रेडिट कार्ड वापरणार असाल तर बँकेकडून या शुल्कांबद्दल माहिती घ्या. नाहीतर क्रेडिट कार्डचे बिल आल्यानंतर त्यात हे सर्व शुल्क अतर्भुत असतात तेव्हा तुमच्यावर त्याचा भार येऊ शकतो.

क्रेडिट कार्डचा व्याज दर जास्त असतो, तो भरावा लागू नये याची काळजी घ्या

सर्वच बँकेचे क्रेडिट कार्ड अल्प-मुदतीचे कर्ज देतात. म्हणजेच क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर भरले तर कार्ड धारकाला यावर कोणतेही व्याज द्यावे लागत नाही. पण हा व्याजमुक्त कालावधी ५० दिवसांपर्यंतचाच असतो. तुम्‍ही तुमच्या क्रेडिट कार्डचे बिल भरण्याची अंतिम मुदत चुकविल्‍यास तुमच्‍याकडून थकीत बिल रकमेवर लेटफी किंवा जास्तीचे व्‍याज आकारले जाऊ शकते. इतर बँका थकीत रकमेवर मासिक ३ ते ४ टक्के दराने व्याज आकारतात. पण क्रेडिट कार्डसाठी व्याज खूपच जास्त असते, हे व्याज वार्षिक ३६ टक्के ते ४८ टक्के या दराने आकारले जाते.