Crop Damage महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावासाने नोव्हेंबर महिन्यातच हजेरी लावली आणि त्यामुळे हातातोंडाशी आलेले पीक पावसात वाहून गेले. अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. म्हणूनच या शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीचा वाढीव मोबदला देण्यासाठी आता महाराष्ट्र सरकार पुढे सरसावले आहे. या लेखाच्या माध्यमातून पाहू की कोणाकोणत्या जिल्ह्यांना ही आवकाळी पावसामुळे झालेली नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली आहे. Crop Damage
किती शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे?
महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून नोव्हेंबर 2023 मध्ये पडलेल्या अवकाळी पावसामुळे किती शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे? हे पाहण्यासाठी क सर्वे करण्यात आला होता त्यामध्ये तब्बल 3758 शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असल्याचे लक्षात आले. आणि या शेतकऱ्यांच्या कापूस, तूर, ज्वारी, हरभरा आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असल्याचे निदर्शनास आले. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामुळे झालेल्या या नुकसानीमध्ये नायगाव, भोकर व अर्धापूरमध्ये सर्वात जास्त शेतकऱ्यांचे नुकसान झाले असल्याने प्रशासनाने नुकसान भरपाईसाठी 5 कोटी 51 लाख रुपयाची मागणी केली आहे. Nuksan Bharpai
अवकाळी पावसामुळे कोणकोणत्या पिकांचे नुकसान झाले?
महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात सप्टेंबर, नोव्हेंबर, डिसेंबर या दरम्याने खरिब पीक घेतले जाते. अनेक शेतकऱ्यांच्या या खरीप पिकाचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे दिसून आले आहे. तसेच शेतकऱ्यांच्या केळी, पपईच्या बागा उध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. हेच काय कापसाचे देखील खूप मोठे नुकसान झाले आहे. कारण या दरम्याने कापुस वेचणीला आलेला होता. नांदेड जिल्ह्यातील 33 टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकाऱी यांच्याकडून पंचनामे करण्यात आलेले आहेत. अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे जिरायती, बागायत व फळपिकाचे मोठे नुकसान झाले आहे. Crop Damage
Crop Damage शेतकऱ्यांना मिळणार तीन हेक्टर पर्यंत मिळणार वाढीव मदत
नांदेड जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यात झालेल्या नुकसानीनंतर शासनाने शेतकऱ्यांना वाढीव मदतनीधीसह तीन हेक्टरपर्यंत मदत देण्याचे जाहीर केले आहे. यामुळे जिरायती पिकांसाठी हेक्टरी 13 हजार 600 बागायती पिकासाठी 27 हजार तर फळपिकासाठी 36 हजार रुपये मिळणार आहेत. जमीन खरडणे, खचने, दरड कोसळणे, यासाठी 47 हजार रुपये प्रति हेक्टर या दराने अनुदान देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना देण्यात येणारी रक्कम 5 हजारापेक्षा कमी असू नये असेही शासन निर्णयता नमूद करण्यात आले आहे. तसेच दोन हेक्टर पेक्षा जास्त शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा दोन हेक्टर पर्यंतच्या मर्यादेमध्ये अनुदान देण्यात येणार आहे.
राज्यातील शेतकऱ्यांना केंद्र शासनांतर्गत 75 टक्के व राज्य शासनांतर्गत 25 टक्के अशा प्रकारची नुकसान भरपाई देण्यात येते परंतु, 1 नोव्हेंबर 2023 पासून राज्य शासनाचे सुधारित धोरण लागू करण्यात आले आहे आणि त्यानुसार शेतकऱ्यांना देण्यात येणारी नुकसान भरपाई जाहिर करण्यात आली आहे. Crop Damage
नुकसान भरपाईअंतर्गत कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे?
राज्य शासनांतर्गत देण्यात येणाऱ्या अवकाळी पावसाच्या नुकसान भरपाईसाठी महाराष्ट्र राज्यातील 11 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे त्यामध्ये अमरावती विभागातील अमरावती जिल्ह्याचा समावेश असून, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, अकोला अशा अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर अशा सहा जिल्ह्याचा समावेश आहे एकूणच 11 जिल्हे नुकसान भरपाई मध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे.
नुकसान भरपाई कोणाला मिळणार आहे?
अतिवृष्टी नुकसान भरपाई कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार अशा प्रकारचा प्रश्न शेतकऱ्यांना पडतो, त्यानुसार पुढील ठरतील, अतिवृष्टी अनुजनाच्या निकषानुसार पूर्वीच्या मंडळामध्ये आहेत त्या मंडळामध्ये 24 तासांमध्ये 64 मिलीमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद झालेली असणे गरजेचे आहे. तसेच त्या मंडळामधील गावांमध्ये 33 टक्के पेक्षा जास्त शेती पिकाचे नुकसान झालेले असेल तर अतिवृष्टी अनुदान शासनाने शेतकऱ्यांना देणे गरजेचे आहे. . Shetkari Nuksan Bharpai Sathi Patr
नुकसान भरपाई केव्हा मिळणार आहे?
शासन अंतर्गत अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना अनुदानाचे वाटप करण्यात यावे याकरिता 71 कोटी पेक्षा जास्त निधीची मंजुरी देण्यात आलेली आहे व शेतकऱ्यांच्या खात्यावर निधीचे वितरण करण्यात यावे असे सांगण्यात आलेली असून या शेतकऱ्यांच्या खात्यावरून निधीचे वितरण करण्यात आलेले आहे असे शेतकऱ्यांच्या याद्या सुद्धा लावण्यात याव्या अशा प्रकारचे आवाहन संबंधित शासन निर्णयानुसार सांगण्यात आलेले आहे. शासनांतर्गत शेतकऱ्यांना नीधीचे वितरण करण्यात यावे अशा प्रकारचा निर्णय देण्यात आलेला आहे त्यामुळे नुकसान भरपाई 2023 टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या खात्यावर निधीचे वितरण करण्यात येईल.