Dairy Farm Subsidy डेअरी उद्योगासाठी सरकारकडून ९०% अनुदान- तरुणांना मोठी संधी

Dairy Farm Subsidy

Dairy Farm Subsidy शेती व्यवसायासोबतच ग्रामिण भागात जोडधंडा निर्माण व्हावा म्हणून शासननातर्फे डेअरी उद्योजक विकास योजना सुरु करण्यात आली. तसेच शहरी भागात डेअरी व्यवसायातून तरुणांना रोजगार निर्माण करून देता येईल या उद्देशाने शासनाने डेअरी उद्योजक विकास योजना 2023 सुर केली आहे. शेतकऱ्यांना पूरक व्यवसायांद्वारे सतत उत्पन्न मिळविण्यात मदत करण्यासाठी सरकारने विविध योजना याआधीही सुरू केल्या आहेत. तसेच दुग्ध व्यवसाय, जो खेड्यांपासून शहरांपर्यंत मोठ्या प्रमाणावर चालतो. या व्यवसायाला पाठिंबा देण्यासाठी, सरकार इच्छुक व्यक्तींना कर्ज देते आहे.

पशुसंवर्धनातून दुग्ध व्यवसाय सुरू करण्यासाठी अगदी सुरुवातीला मोजक्याच भांडवलाची आवश्यकता असते, ज्यामुळे सामान्य नागरिकांपासून ते श्रीमंत व्यक्तींपर्यंत सर्व स्तरातील लोकांसाठी ते सुलभ होते. हा व्यवसाय ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागांमध्ये नफा मिळवून देऊ शकतो. त्यामुळे सरकारकडूनही या व्यवसायासाठी प्रोत्साहन दिले जाते. त्याचाच एक भाग म्हणजे डेअरी उद्योजक विकास योजना 2023 Dairy Farm Subsidy 2023  या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 90 टक्के अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे.

Nabard Dairy Loan Subsidy डेअरी व्यवसायासाठी नाबार्ड कर्ज योजना –

नॅशनल बँक फॉर एग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट NABARD (नाबार्ड) ही एक विशेष बँक आहे जी शेतकरी आणि ग्रामीण व्यवसायिकांना आर्थिक सहाय्य प्रदान करते. नाबार्ड ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागात लहान डेअरी युनिट्सच्या स्थापनेला प्रोत्साहन देण्यासाठी डेअरी उद्योजकता विकास योजनेमार्फत(DEDS)  शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करुन देते. ही योजना शेतकरी आणि उद्योजकांना दुग्धजन्य जनावरे खरेदी करण्यासाठी, शेड बांधण्यासाठी आणि दुग्ध व्यवसायाशी संबंधित इतर पायाभूत सुविधांसाठी आर्थिक सहाय्य प्रदान करते.

नाबार्ड डेअरी कर्जासाठी अर्ज भरताना आवश्यक कागदपत्रे

 • आधार कार्ड किंवा इतर फोटो ओळखपत्र
 • पत्त्याचा पुरावा
 • उत्पन्न प्रमाणपत्र
 • आयकर रिटर्न
 • जनावरांच्या चाऱ्यासाठी ग्राउंड पेपर
 • जात प्रमाणपत्र
 • प्रकल्प अहवाल (कृती आराखडा)
 • तारण पुरावा
 • मोबाईल, ईमेल इ.

डेअरी उद्योजक विकास योजना 2023 अंतर्गत मिळणाऱ्या अनुदानाचे प्रकार Dairy Farm Subsidy

 • लहान दुग्धव्यवसाय विकासासाठी कर्ज
 • या गटात किमान 2 आणि कमाल 10 जनावरे असणे आवश्यक आहे.
 • 5 लाखांपर्यंत अनुदान दिले जाते.
 • सामान्य नागरिकांसाठी 25% अनुदान आणि  SC/ST साठी 33% अनुदान दिले जाते.
 • लहान पशुधन खरेदीसाठी
 • या गटात किमान 5 आणि जास्तीत जास्त 20 जनावरे असणे आवश्यक आहे.
 • 4 लाख 80 हजार पर्यंत कर्ज दिले जाते.
 • सामान्य नागरिकांसाठी – 25% अनुदान आणि  SC/STसाठी  – 33% अनुदान दिले जाते.
 • मिल्किंग मशीन खरेदीसाठी
 • योजनेच्या या भागात 18 लाखांपर्यंत कर्ज मिळते
 • अनुदान सर्वसाधारण व्यक्तींना 25%, आणि  SC/ST  साठी  33% अनुदान मिळते.
 • डेअरी प्रोसेसिंग युनिट जनरल खरेदी
  • यासाठी 12 लाख कर्ज दिले जाते.
  • तसेच सामान्यांसाठी 25% आणि  SC/ST साठी 33% अनुदान दिले जाते.

नाबार्ड डेअरी कर्जाचे व्यवसायिकांना होणारे फायदे Dairy Farm Subsidy

 डेअरी विकास योजनेअंतर्गत दुध उत्पादकांना खूप फायदे होतात. ते आपण पुढे जाणून घेऊ.

 • आर्थिक सहाय्य आणि सबसिडी मिळते
 •  सरकारचे उद्दिष्ट दुग्ध व्यवसायाच्या वाढीस चालना देणे हे आहे.
 •  शेतकरी आणि उद्योजकांसाठी शाश्वत उत्पन्नाच्या संधी निर्माण होते.
 • जनावरांच्या खरेदी पासून ते डेअरी प्रकल्प सुरु करण्यापर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेसाठी विविध टप्प्यांवर कर्ज दिले जाते.
 • अनेक तरुणानी या संधीचा लाभ घेत स्वतःचा दुग्ध व्यवसाय वाढवला आहे.
 • शेतीसोबत एक जोडधंदा शेतकऱ्यांना यातून निर्माण करता येतो.

दुधाचा व्यवसाय हा अगदी वर्षांचे १२ ही महिने चालणारा व्यवसाय आहे. तसेच दुधापासून बनत असलेले विविध पदार्थ जे दुप्पट तिप्पट भावाने विकले जातात. त्यामुळे दुधाला मोठी मागणी आहे. शासनाने सुरु केलेल्या या डेअरी उद्योजक विकास योजना 2023, या योजनेचा तुम्ही फायदा घ्या आणि तुमचा व्यवसाय सुरु करा. हा व्यवसाय कधीच तोट्यात जात नाही. केवळ नफाच या व्यवसायातून मिळत असतो.