तुम्ही तुमच्या मुलांचे Blue Aadhaar card काढले का? नसेल तर आजच काढा, पुढील प्रोसेस फॉलो करा!

Blue Aadhaar card

Blue Aadhaar card: आधार कार्ड हे भारत सरकारद्वारे भारतातील नागरिकांना जारी केलेले ओळखपत्र आहे. भारतात राष्ट्रीय स्तरावर व्यक्तीची ओळख म्हणून ज्या ओळखपत्राला महत्त्व दिले जाते ते आधार कार्ड म्हणून ओळखले जाते.  त्यावर १२ अंकी क्रमांक छापलेला आहे जो प्रत्येक नागरिकाची विशिष्ट ओळख सिद्ध करतो.  हे आधार कार्ड युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया प्राधिकरणाने (UIDAI) जारी केला आहे. हे आधार कार्ड म्हणजे भारतात कुठेही व्यक्तीची ओळख आणि पत्त्याचा पुरावा सिद्ध करण्याचा दाखला समजला जातो.

याआधी केवळ ५ वर्षावरील मुलांचे आधार कार्ड बनवले जात असेत परंतु आता १ ते ५ वर्षे वयोगटाच्या मुलांचे देखील आधारकार्ड बनवले जाणार आहे. जे कार्ड त्या मुलांचे ओळखपत्र म्हणून वापरात आणता येईल.  युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया  Unique Identification Authority of India (UIDAI) नुसार, १ वर्षापेक्षा जास्त वयाची मुले आधार कार्डसाठी अर्ज करू शकतात. या आधारकार्डचा रंग निळा असल्याने त्याला Blue Aadhaar card असे म्हटले जाते. तसेच १ ते ५ वयोगटातील मुलांसाठी खास सुरु करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत बनविण्यात येणाऱ्या कार्डला बाल आधार कार्ड असे  देखील म्हटले जाते. पण हे बाल आधारकार्ड लहान मुलांसाठी का महत्वाचं आहे? याचा नेमका फायदा काय होईल किंवा लहान मुलांच्या पालकांनी ते कसे आणि कुठून बनवून घ्यावे याबाबत सविस्तर माहिती आज आपण या लेखाच्या माध्यमातून मांडणार आहोत. त्यामुळे संपूर्ण लेख वाचा आणि तुम्ही तुमच्या घरातील लहान मुलांचे Blue Aadhaar card लवकरच बनवून घ्या.

काय आहे ब्लू आधार कार्ड? What is Blue Aadhaar card

२०१८ मध्ये युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियानं (UIDAI) लहान मुलांसाठी आधार कार्डाची सुविधा सुरू केली होती. याला बाल आधार कार्ड किंवा ब्लू आधार असेही म्हटले जाते.  या आधार कार्डला ब्लू आधार कार्ड असे म्हटले जाते कारण त्याचा रंग निळा असतो. ब्लू आधार कार्ड ५ वर्ष किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांचं तयार केलं जातं.

Blue Aadhaar card बनविण्यासाठी बायोमॅट्रिकची गरज नाही

बाल आधार कार्ड म्हणजेच Blue Aadhaar card  बनवण्यासाठी ५ वर्षांखालील मुलांचे बायोमेट्रिक्स घेतले जात नाही. त्यांच्या UID वर त्यांच्या आईवडिलांच्या युआयडीशी निगडीत डेमोग्राफिक माहिती आणि चेहऱ्याच्या आधारावर मुलांचं आधार प्रोसेस केले जाते. ही मुले ५ आणि १५ वर्षांची झाल्यावर त्यांचे बायोमेट्रिक्स पालाकांनी आधार सेंटरवर जाऊन अपडेट करुन घ्यायचे असतात. परंतु तोपर्यंत म्हणजे वय वर्षे १ ते ५ मध्ये मुलांचे Blue Aadhaar card मुलाची ओळख म्हणून वापरता येते. ५ वर्षानंतर पालकांनी आपल्या मुलांचे हे आधारकार्ड अपडेट करायचे म्हणजे मुलांचा डोळ्यांचे स्कॅनिंग, हाताच्या बोटांच्या ठश्यांचे स्कॅनिंग करुन आधार कार्ड अपडेशनची प्रोसेस पूर्ण करायची असते.  

असे बनवा तुमच्या मुलाचे Blue Aadhaar card.

  • सर्वप्रथम UIDAI ची वेबसाईट uidai.gov.in वर जा.
  • आधार कार्ड रजिस्ट्रेशनचा पर्याय निवडा.
  • मुलाचे नाव, पालक/गार्डियन यांचा फोन नंबर आणि आवश्यक माहिती भरा.
  • आता आधारच्या appointment पर्यायवर क्लिक करा.
  • जवळचं एनरॉलमेंट सेंटर निवडून appointment घ्या.
  • तुमचं आधार कार्ड, मुलांचं बर्थ सर्टिफिकेट, रेफरन्स नंबर घेऊन आधार सेंटरवर जा.
  • आधार कार्ड सेंटरवर सर्व प्रोसीजर पूर्ण केल्यानंतर तुम्हाला आधार बनवून मिळेल.

Blue Aadhaar card चे फायदे?

  • मुले सध्या तीन वर्षांची असतानाच नर्सरीमध्ये जाऊ लागतात. त्यांना शाळेत आधार कार्ड आवश्यक असते.
  • शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी या बाल आधारकार्ड म्हणजेच Blue Aadhaar card चा फायदा मुलांना होतो.
  • बाहेर गावी प्रवास करताना लहान मुलांचा पासपोर्ट बनवताना या बाल आधार कार्डचा उपयोग होऊ शकतो.

मुलांचे बँक अकाऊंट सुरु करायचे असल्यास या Blue Aadhaar cardचा उपयोग होतो.