Digital Crop Survey App : आता ई पीक पाहणी ॲप मधून नाहीतर या ॲप मध्ये करता येणार पिकांची नोंद..

Digital Crop Survey App

Digital Crop Survey App : आता शेती संबंधित असलेली बरीच कामे ऑनलाइन पद्धतीने केली जात आहे. यामध्ये पिकांची नोंद देखील ऑनलाइन केली जात आहे. शेतकरी मागील वर्षापासून पिकांची नोंद ‘ई पीक पाहणी’ ॲपद्वारे करत आहे. आता पिकांची नोंद करण्यासाठी नवीन ॲप आलं आहे, ज्याद्वारे तुम्ही पिकांची नोंद करू शकता. ई पीक पाहणी ॲप पेक्षा या ॲप मध्ये डेव्हलपमेंट करण्यात आलेली आहे.

शेतकरी बांधव मोबाईलच्या साहाय्याने आता शेताच्या बांधावर जाऊन स्वतः पिकांची नोंद करत आहे. पिकांची नोंद केल्यानंतर, सातबारा उताऱ्यावर त्या पिकांची नोंद होत असते. ही पीक पाहणी शेतकऱ्यांना करणं आवश्यक आहे. तसेच पीक पाहणी यशस्वीपणे झाली की नाही हे देखील तपासणं गरजेचं आहे. कारण आता शासनाकडून मिळणारे अनुदान असो किंवा नुकसान भरपाई इत्यादी बाबीं करिता पीक पाहणी आवश्यक आहे. यामुळे तुम्ही कोणत्या योजनेपासून वंचित राहणार नाही.

महाराष्ट्र राज्याचे भूमी अभिलेख विभागांतर्गत शेतकऱ्यांना लागवड केलेल्या पिकांची नोंद करण्यासाठी शासनाने ई पीक पाहणी ॲप सारखेच एक नवीन ॲप लाँच केले आहे. ज्या ॲपचे नावं डिजिटल क्रॉप सर्व्हे (Digital Crop Survey) असं आहे. या ॲपद्वारे तुम्हाला तुमच्या पिकांची नोंद करता येणार आहे. digital crop survey app download

डिजिटल क्रॉप सर्व्हे हा ॲप ई पीक पाहणी ॲप सारखाच आहे. या ॲपद्वारे शेतकरी शेताच्या बांधावर जाऊन पिकांची नोंद सातबारा उताऱ्यावर करू शकणार आहेत. या उपक्रमाद्वारे महाराष्ट्र राज्यातील उन्हाळी हंगामाच्या 34 तालुक्यांमधील साडे तीन हजाराहून अधिक गावातील शेतकऱ्यांच्या पिकांची नोंदणी करून GIS नकाशे शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

डिजिटल क्रॉप सर्व्हे ॲप कशासाठी ? Digital Crop Survey App
डिजिटल क्रॉप सर्व्हे ॲप द्वारे शेतकऱ्यांनी ज्या पिकांची लागवड केलेली आहे, त्या पिकांच्या क्षेत्रांची नोंद करता येणार आहे. यामुळे महाराष्ट्र शासनाला कळेल की, कोणत्या पिकांची किती लागवड झाली आहे. यामुळे उत्पादनाचा देखील अंदाज शासन लावत असते. त्यानुसार महाराष्ट्र राज्याचे भूमी अभिलेख विभागांतर्गत योजना आणल्या जातात. डिजिटल क्रॉप सर्व्हे हे ॲप शेतकऱ्यांना सहज वापरता येईल. 

या ॲपमुळे तुम्हाला पिकांची नोंद करण्यासाठी तुम्हाला तलाठी कार्यालयात जायचे काम राहिले नाही. तुम्ही आता स्वतः मोबाईल द्वारे आपल्या पिकांची नोंद करू शकता. या ॲप द्वारे पिकांची डायरेक्ट माहिती शासनाला पोहोचवू शकता. (E Pik Pahani) यामुळे तुमचा वेळ आणि पैसा दोन्हीही वाचणार आहे. तुम्ही नोंद करत असल्यामुळे पिकांची अचूक नोंद होईल.

डिजिटल क्रॉप सर्व्हे ॲपचा वापर कसा करायचा ?
1) डिजिटल क्रॉप सर्व्हे हे ॲप ई पीक पाहणी ॲप सारखेच आहे. हे ॲप वापरणं देखील तितकंच सोपं आहे.
2) हे ॲप तुम्हाला गुगल प्ले स्टोअर वरून डाउनलोड करायचे आहे. यासाठी तुम्हाला Digital Crop Survey असं सर्च करून ॲप डाऊनलोड करायचे आहे.
3) ॲप ओपन करून तुम्हाला तुमची नोंदणी करावी लागेल, तिथे तुम्हाला तुमचं गावं सिलेक्ट करायचं आहे, मग तुम्हाला तुमच्या गटाचा नंबर टाकून पुढे तुमच्या पिकाची नोंदणी करण्याकरिता ऑप्शन येईल.
4) पिकांची विचारलेली माहिती भरून आणि फोटो अपलोड करा.
5) ही सर्व माहिती व्यवस्थित भरल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा. ही माहिती डायरेक्ट राज्य शासनाकडे पोहचवून जाईल.
6) अशाप्रकारे तुम्ही डिजिटल क्रॉप सर्व्हे ॲपचा वापर करून पिकांची नोंद करू शकता.

हे ॲप शेतकरी सहज वापरू शकतात. या ॲपद्वारे शेतकऱ्यांना खरीप व रब्बी दोन्हीही हंगामातील पिकांची नोंद करता येणार आहे. आमच्या आर्टिकल मध्ये डिजिटल क्रॉप सर्व्हे ॲप बद्दल संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. ही माहिती शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आहे. त्यामुळे ही माहिती शेतकऱ्यांना माहीत असणं आवश्यक आहे. तर ही माहिती शेतकऱ्यांना माहीत व्हावी यासाठी ही माहिती पुढे नक्की पाठवा.