Panjabrao Dakh : मान्सून 2024 बाबत पंजाबराव डख यांनी वर्तविला अंदाज, वाचा सविस्तर

Panjabrao Dakh Monsoon 2024 : महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील शेतकऱ्यांना मान्सूनची वाट पाहत आहे. मान्सूनच आगमन केव्हा आणि यंदा मान्सून कसा असणार आहे, हाच सवाल प्रत्येकांच्या मनात उपस्थित होत आहे. शेतकरी या मान्सूनच्या प्रतिक्षेत जास्त असतो. कारण शेती ही संपूर्णपणे मान्सूनवर आधारित आहे. मान्सून काळात चांगला पाऊस झाला की, खरीप सोबत रब्बी मध्ये देखील शेतीमधून भरघोस उत्पादन मिळवता येते.

राज्यात 15 मे पर्यंत मान्सून पूर्व पाऊस पडणार असल्याचे अंदाज पंजाब डख यांनी वर्तविला आहे. महाराष्ट्र राज्यात रोज भाग बदलत बदलत 15 मे पर्यंत वेगवेगळ्या भागात वादळी वाऱ्यासह पाऊस बरसणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची व जनावरांची काळजी घ्यावी, असा महत्वाचा सल्ला पंजाब डख यांनी दिला आहे. (panjabrao dakh live)

गेल्या वर्षी महाराष्ट्रासह इतर राज्यात पाऊस कमी झाल्यामुळे, दुष्काळ सदृश्य परिस्थिती पाहायला मिळाली. आता 2024 मध्ये मान्सून कसा राहणार, मान्सूनचे आगमन केव्हा होणार असा सवाल शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित होत आहे. याबाबत प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी एक 2024 मान्सून monsoon बाबत मोठी माहिती दिली आहे. panjabrao dakh havaman andaj

panjab dakh havaman andaj पंजाबराव डख यांनी राज्यात मान्सूला कधी सुरुवात होणार, मान्सून कसा असणार, पेरणीला कधी सुरुवात होईल व शेतकऱ्यांच्या पेरण्या कधी पर्यंत पूर्ण होईल याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. या माहितीमुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. mansoon 2024 चला तर मग पंजाबरावांनी सांगितलेला मान्सून 2024 चा अंदाज जाणून घेऊ या. ‘panjabrao dakh weather today live’

Panjabrao Dakh मान्सून 2024 अंदाज
पंजाबराव डख यांनी त्यांच्या चॅनलवर एक व्हिडिओ अपलोड केला आहे. त्या व्हिडिओमध्ये पंजाबराव डख यांनी सांगितल्याप्रमाणे, यंदा 22 मे ला अंदमानात मान्सूनचे आगमन होणार आहे. तसेच डख यांनी सांगितले की, ज्या वर्षी उन्हाळ्यात जास्त पाऊस त्या वर्षी पावसाळ्यात कमी पाऊस पडतो. (Monsoon 2024 Maharashtra)

गेल्या वर्षी महाराष्ट्रासह अनेक राज्यात पाऊस कमी झाला. कारण उन्हाळ्यात जास्त प्रमाणात पाऊस पडला होता. परंतु ,यंदा मात्र तशी परिस्थिती राहणार नाही. कारण यंदा उन्हाळ्यात मागील वर्षी सारखा जास्त पाऊस झाला नाही. मागील वर्षी उन्हाळा हा जास्त तापला नाही. तसेच त्यांनी हे देखील सांगितले की, ज्या वर्षी जास्त उन्हाळा तापतो त्या वर्षी चांगला पाऊस पडतो. (panjabrao dakh live)

तर मान्सून 2024 मध्ये चांगला पाऊस होणार असल्याचे पंजाब डख म्हटले आहे. डख यांनी सांगितल्याप्रमाणे यंदा आपल्या महाराष्ट्रात 12 ते 13 जूनच्या दरम्यान पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. म्हणजेच 12-13 जूनला मान्सूनच पाऊस बरसणार आहे. तसेच महाराष्ट्रात पेरणी योग्य  पावसाला सुरुवात 22 जून नंतरच होणार असल्याचे सांगितले. weather update

पंजाबराव डख मान्सून 2024 अंदाज
22 जून नंतर राज्यात पेरणी योग्य पाऊस पडेल आणि जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या पेरण्या पूर्ण होतील, असा अंदाज पंजाब डख यांनी वर्तविला. यावर्षी जुलै मध्ये जास्त पाऊस पडेल अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर ऑगस्ट महिन्यात कमी पाऊस असेल हे देखील पंजाबरावांनी सांगितले. सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात मोठ्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. Mansoon 2024 news

सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात असा पाऊस पडेल की, राज्यातील जवळपास सर्वच धरणे फुल भरतील असं भाकीत देखील पंजाबराव डख यांनी केलं आहे. दरम्यान 2024 मध्ये मान्सूनची परिस्थिती चांगला असणार असल्याचे, पंजाबराव डख यांच्या अंदाजातून दिसून आले. हा अंदाज कितपत खरा ठरतो हे पाहणं उत्सुकतेचे ठरणार आहे. अशाप्रकारे 2024 मान्सून बाबत पंजाबराव डख यांनी अतिशय महत्त्वाची माहिती दिली आहे. मान्सून 2024 चा अंदाज पुढे शेतकऱ्यांना नक्की पाठवा.