How to download Instagram photo and video in mobile: इन्स्टाग्रामवरील व्हिडिओ व फोटो मोबाईलवर कसे डाऊनलोड करायचे?

download Instagram photo and video सध्याच्या सोशल मिडियाच्या वेगाने बदणाऱ्या क्षेत्रासोबत रोजचा आपला संबंध येत असतो. या सोशल मिडियाचा आपल्या दैनंदिन जीवनावर चांगला वाईट परीणाम होत असतोच. हल्लीची पिढी या क्षेत्राकडे करीयर म्हणून देखील पाहू लागली आहे. तसेच अनेकजण या इन्स्टा, फेसबूक, यूट्यूबच्या माध्यमातून व्हिडिओ तयार करुन उत्तम पैसे कामवत आहेत.

मग आपले करियर करीत असताना आपल्याला या सोशल मिडियासंबंधीत अनेक टेक्निकल गोष्टी शिकाव्या लागतात. प्रवाहासोबत काम करण्यासाठी आपल्याला विविध कौशल्ये आत्मसात करावी लागतात. त्यातीलच एक स्किल म्हणजे व्हिडिओ तयार करणे. मग हे व्हिडिओ तयार करण्यासाठी मग ते रिल्स साठी असो किंवा यूट्यूबसाठी असो तुम्हाला इतर व्हिडिओ किंवा फोटोजचा संग्रह करावा लागते. हे व्हिडिओ तुम्हाला इन्स्टाग्रामवरुन डाऊनलोड करायचे असतील तर मग ते कसे कारायचे हे अत्यंत महत्त्वाचे कौशल्य आम्ही या लेखाच्या माध्यमातून तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. इन्स्टाग्रामवरील व्हिडिओ आणि फोटो डाऊनलोड करण्यासाठी कोणते ऍप वापरायचे  आणि ते कसे वापरायचे हे या लेखाच्या माध्यमातून सविस्तररित्या आम्ही सांगणार आहोत. How to download Instagram photo and video in mobile

इन्स्टाग्रामवरील व्हिडिओ इतरवेळी डाऊनलोड का होत नाही?

कॉपीराईट च्या नियमांमुळे सोशलमिडियावरील बरेच मटेरियल संरक्षित असते. एव्हाना त्याला तशी सेटींग केलेली असते. ती इतरांनी अपलोड केलेले मटेरियल दुसऱ्या व्यक्तीने वापरू नये. कधी कधी व्हिडिओ किंवा फोटो अपलोड करणारी व्यक्ती इन्स्टाग्रामवर ही सेटिंग बदलत नाही, त्यामुळे इतरांना ते व्हिडिओ डाऊनलोड करता येतात. बरेचदा इतरांचे ओरिजनल फोटो किंवा व्हिडिओ वापरले जाऊ नये हे माहित असूनही काही जण ते डाऊनलोड करुन वापरतात. परंतु त्या डाऊनलोड केलेल्या व्हिडिओ किंवा फोटोमध्ये तुम्ही स्वतः काही बदल करुन ते सोशल मिडियावर अपलोड करणार असाल तर मात्र ते कॉपीराईटमध्ये पकडले जात नाही. download Instagram photo and video in mobile

इन्स्टा प्रो ऍप वापरून इंन्स्टाग्रामवरील व्हिडिओ आणि फोटो कसे डाऊनलोड करायचे

       आता आपण पाहूया की, इन्स्टाग्रामवरील व्हिडिओ आणि फोटो insta pro app च्या मदतीने कसे डाऊनलोड करायचे.

 • सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमधील Play store  हे ऍप ओपन करा. त्यामध्ये insta pro app असे टाईप करा.
 • हे ऍप तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा.
 • आता तुम्हाला इन्स्टाग्रमवरुन जी रिल डाऊनलोड करायची आहे ती रिल ओपन करा.
 • रिल ओपन केल्यानंतर तेथे shareपर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.  
 • Share ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला video download हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
 • हा व्हिडिओ तुमच्या मोबाईलच्या डाऊनलोड फोल्डरमध्ये सेव होईल.

insta pro app च्या मदतीने व्हिडिओ डाऊनलोड करण्याचे फायदे

 • insta pro app हे एक आधुनिक तंत्रज्ञानयुक्त ऍप आहे. याच्या मदतीने इन्टाग्रामवरील व्हिडिओ अगदी सहजपणे डाऊनलोड करता येतात. 
 • काही महत्त्वाचे व्हिडियो संग्रही ठेवण्यासाठी डाऊनलोड करता येतात.
 • यूट्यूब चॅनलला आपला व्हिडिओ बनवताना इतर व्हिडिओमधील छोटे भाग घेण्यासाठी इन्स्टावरचे व्हिडिओ अत्यंत मदतगार ठरतात हे व्हिडिओ डाऊनलोड करता येतात.
 • इन्स्टाग्रामवर स्वतःचे रिल्स बनवताना काही अधिक चांगले व्हिजुअल्स हवे असतील तर आपल्याला चांगले व्हिडिओ डाऊनलोड करुन ते एडीट करुन घ्यावे लागतात त्यासाठी insta pro app अत्यंत महत्त्वाचे ठरते.
 • वेळ वाचतो, आणि कमी वेळाच आपला व्हिडिओ तयार होऊ शकतो.
 • अभ्यासपूर्ण व्हिडिओ बनवताना दुसऱ्या माहितीचा दाखला देण्यासाठी  व्हिडिओ डाऊनलोड करावा लागतो त्यासाठी insta pro app हे ऍप महत्त्वाचे ठरते.

जगभरात 2.4 बिलियन पेक्षाही जास्त लोक Instagram वापरतात. त्यामुळे हे ऍप लोकप्राय ऍप मध्ये गणले जाते. तसेच या ऍपवरुन तुम्ही पैसे देखील कमाऊ शकता. तुमचे फॉलोअर्स किती आहे यावरुन तुमची लोकप्रियता ठरते. आणि त्याप्रमाणे तुम्हाला पैसे आणि मानधन देखील मिळते. download Instagram photo and video in mobile