Maharashtra Assembly Interim Budget Session 2024: महाराष्ट्राचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी सादर केला राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प!

Maharashtra Assembly Interim Budget Session 2024

Maharashtra Assembly Interim Budget Session 2024: अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प (Maharashtra Assembly Interim Budget Session 2024) सादर केला आहे. या दरम्यान अजित पवार यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. शेतकरी, मजूर, महिला, आदिवासी, अल्पसंख्याक, विद्यार्थी, तरुण, मागासवर्गीय,  उद्योजक, व्यापारी अशा सर्व घटकांना या अर्थसंकल्पातून न्याय आणि विकासाची संधी या अर्थसंकल्पातून मिळणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. जुन्नर या ठिकाणी शिवसंग्रहालय उभारणार असल्याची घोषणा देखील अजित पवार यांनी केली. 11 किल्ले जागतिक करण्यासाठी युनेस्कोकडे प्रस्ताव पाठवला असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले. शिवाय अयोध्येमधील रामजन्मभूमीवर महाराष्ट्र सदन बांधण्यात येणार असल्याची घोषणा सुद्धा यावेळी अजित पवार यांनी केली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवन बांधण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याचे त्यांनी पुढे सांगितलं आहे. Maharashtra Assembly Interim Budget Session 2024

सरकारचे टॉप 10 निर्णय
अर्थसंकल्पीय अधिवेशनात मोठ्या घोषणा

1. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी भूसंपादन पूर्ण
भारतातील पहिल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी भूसंपादनाचे काम पूर्ण झाले आहे. सोलापूर, तुळजापूर, धाराशिव या रेल्वे मार्गासाठी भूसंपादनाचे काम सुरू आहे. जालना यवतमाळ पुणे लोणावळा इत्यादी रेल्वे मार्गासाठी ५० टक्के रक्कम ही सरकार द्वारे देण्यात येणार आहे. हा चौथा मार्ग असेल. जालना-यवतमाळ-पुणे-लोणावळा या चौथ्या मार्गासाठी सुद्धा 50 टक्के रक्कम ही सरकारकडून दिली जाणार आहे. एकूण सहा वंदे भारत एक्सप्रेस या सुरू करण्यात आल्या आहेत.

2.
पालघरपर्यंत वर्सोवा-वांद्रे सागरी सेतू,
7500 किमी रस्त्याची कामं
7 हजार 500 किलोमीटर रस्त्याचे काम होणार आहे. सार्वजनिक बांधकाम कामांसाठी 19 हजार कोटी रुपये दिले जात आहेत. पालघरपर्यंत वर्सोवा वांद्रे हा सागरी सेतू बांधण्यात येणार असून 300 कोटी रुपये रत्नागिरीतील भागवत या बंदरासाठी, तर बंदर मिरकरवाडाचे नूतनीकरण करण्यात येत आहे. सात हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची कामे सुरू होणार आहेत. Maharashtra Assembly Interim Budget Session 2024

3. पेन्शनधारकांना दिलासा
संजय गांधी निराधार योजनेंतर्गत 1000 ऐवजी 1500 रुपये पेन्शन देण्यात येणार आहे. प्रत्येक तालुक्यात एक शव वाहन व्हॅन दिली जाईल. संत गाडगेबाबा महामंडळ स्थापन करण्यात येणार आहे.

4. रेडिओ क्लब JT साठी 227 कोटी
रेडिओ क्लब जेट्टीसाठी 227 कोटी रुपयांचे काम सुरू करण्यात येणार आहे. 100 कोटींची तरतूद मिहान प्रकल्पासाठी करण्यात आली आहे. एक हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव सामान्य प्रशनास विभागासाठी आहे. वस्त्रोद्योग धोरणांतर्गत रेशन वाटप करताना एका महिलेला एक साडी देण्याचे काम सुरू आहे.

5. दवोसमधील 19 कंपन्यांशी करार
19 कंपन्यांसोबत जानेवारी 2024 मध्ये, दवोसमध्ये  करार करण्यात आल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले.

6. ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत पाच औद्योगिक उद्यानांसाठी 196 कोटी रुपयांच्या निविदा
निर्यात वाढवण्यासाठी 5 औद्योगिक पार्क उभारले जात आहेत. ‘मेक इन इंडिया’ धोरणांतर्गत 196 कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. या ठिकाणी मॉल बांधण्यात येणार आहे. अर्थसंकल्पाच्या माध्यमातून राज्याची अर्थव्यवस्था ट्रिलियन डॉलरची करण्यासाठी आवश्यक धोरणे राबविण्यात येणार आहेत.

7. 8 लाख 50 हजार नवीन कृषी पंप बसवण्यात येणार आहेत
सौर व कृषी पंप योजना शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणार असून, 8 लाख 50 हजार नवे कृषी पंप बसवण्यात येणार आहेत. शेळी मेंढी वराह योजनेअंतर्गत 129 प्रकल्प सरकारला प्रस्तावित करण्यात आले आहेत. पुढील 3 वर्षांत 155 प्रकल्पांच्या दुरुस्तीसाठी 15 हजार कोटी रुपयांची गरज असणार आहे.

8. 5000 गुलाबी रिक्षासोबतच एक लाख महिलांना रोजगार
40 टक्के अपारंपरिक ऊर्जा लागू केली जाईल. 37 हजार अंगणवाड्यांना सौरऊर्जा देण्यात येणार आहे. तब्बल एक लाख महिलांना रोजगार देण्यात येणार आहे. 14 लाख पदांसाठी अंगणवाडी सेविकांची भरती केली. नुकसान झालेल्या 44 लाख शेतकऱ्यांना 3000 कोटी रुपये देण्यात आले आहेत. महिलांसाठी पाच हजार गुलाबी रिक्षा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

9. लेक लाडकी योजना मुलींच्या सक्षमीकरणासाठी
3107 कोटी रुपयांची तरतूद महिला व बालकल्याण विभागासाठी करण्यात आली आहे. 18 वर्षांपर्यंत मुलींना वेगवेगळ्या टप्प्यांत 1 लाख एक हजार रुपये दिले जातील.


10. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी पुरेशा तरतुदी
‘मिशन लक्ष्यवेध’ योजनेंतर्गत खेळाडूंसाठी राज्य स्तरावरील उच्च कामगिरी केंद्र, विभागीय स्तरावर सेंटर ऑफ स्पोर्ट्स एक्सलन्स आणि क्रीडा प्रतिभा विकास केंद्र जिल्हा स्तरावर अशी त्रिस्तरीय प्रशिक्षण प्रणाली स्थापन करण्यात येणार आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक जिंकणाऱ्या राज्यातील खेळाडूंच्या बक्षीस रकमेत 10 पटीने वाढ करण्यात आली आहे. गोल्ड मेडल साठी 1 कोटी रुपये, 75 लाख रुपये रौप्यपदकासाठी आणि कांस्यपदकासाठी 50 लाख रुपयांचे बक्षीस दिले जात आहे. Maharashtra Assembly Interim Budget Session 2024