Download Land map on Mobile App: वाकड्या तिकड्या जमिनीची मोजणी  करणे झाले सोपे  

Download Land map on Mobile App

Download Land map on Mobile App भारत हा कृषीप्रधान देश आहे. येथे शेतीसाठीची जमीन कधी सर्वदूर सरळ असते तर कधी वाकडी तिकडी, वर खाली, ओबड धोबड. त्यामुळे जमीन मोजणी करताना शेतकऱ्यांना  अनेक  अडचणींचा सामना करावा लागतो.  कधी कधी तर त्यामुळे जमिनीचा वाद देखील उद्भवतो. अशा परिस्थितीत  कायदेशीररित्या जमीन मोजणी करावयाची असल्यास शेतकऱ्यांना महसूल विभागाकडे मोजणी अर्ज करावा लागतो. परंतु त्यासाठी शेतकऱ्यांना शासनाकडून ठरविण्यात आलेल्या दरानुसार एकरी रक्कम भरावी लागते. आर्थिक अडचणींमुळे काहीवेळा शेतकरी माघार घेतात. आणि त्यांच्या जमीनीची मोजणी राहून जाते. पण मग शेतकऱ्यांना गाव पातळीवर फक्त आपली जमीन किती आहे? याबाबत तपासणी करावयाची असल्यास आम्ही या लेखाच्या माध्यमातून अत्यंत सोपी पद्धत घेऊन आलो आहोत. Download Land map on Mobile App

जमिनीची मोजणे झाले सोपे

याआधी शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमिनीच्या बांधाची लांबी व रुंदीसह नकाशा पाहावयाचा असेल तर तलाठी कार्यालयात किंवा भूमापन अधिकाऱ्यांना भेटावे लागत असे, कागदी अर्ज करुन त्यानंतरच जमिनीचे नकाशे किंवा जमिनी मापन करुन मिळत असे. या पद्धतीत खूप वेळही जात असे आणि पैसे देखील खर्च होत असत. परंतु आता आपल्या हातातील मोबाईलवरती जमिनीची मोजणी करणे शक्य आहे. आजचे शेतकरी अगदी घरबसल्या  मोबाईलवरील Gps Area Calculator या  ॲपच्या माध्यमातून शेतजमिनीचा अक्षांश व रेखांश लक्ष्यात घेऊन तुमच्या जमिनीची मोजणी करू शकतात. शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी आहे. कारण सर्वात महत्वाचे म्हणजे यामध्ये शेतकऱ्यांचा वेळ वाचतो आणि दुसरे म्हणजे पैसे देखील वाचतात.  Gps Area Calculator हे ऍप प्ले स्टोअरवर अगदी मोफत असून अगदी साधारण शेतकरी किंवा कोणीही हे ऍप अगदी सहजरित्या वापर करु शकत आहे. Download Land map on Mobile App

तुमच्या जमीन मोजणी कशी करावी ?

जमीन मोजणी करण्यासाठी Land Map Gps Area Calculator ॲपची आपल्याला मदत घ्यावी लागणार आहे. हे ऍप डाऊनलोड करण्यापासून ते पुढील सर्व माहिती आपण देत आहोत .ही माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या जमिनीची मोजणी करा.  

  • सर्वात आधी तुम्ही  तुमच्या मोबाईलमधील play store ओपन करा.
  • त्यानंतर त्या ठिकाणी  Google map calculator असे सर्च करा.
  • आता तुमच्यासमोर बऱ्याच एप्लीकेशन दाखवल्या जातील. त्यामध्ये Gps Area Calculator कॅल्क्युलेटर हे ॲप तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा.
  • त्यानंतर तुमच्या मोबाईलचा GPS सुरु करा.
  • GPS सुरु  केल्यानंतर इन्स्टॉल करण्यात Gps Area Calculator हे ऍप  उघडा.
  • तुमच्यासमोर संपूर्ण नकाशा दाखवला जाईल, त्या ठिकाणी तुमचे राज्य, जिल्हा व तालुका टाकून सर्च करा.
  • तुमच्या जवळील नकाशा आल्यानंतर आता तुमच्या जमिनीच्या चारी बाजू कोपऱ्यांनी सिलेक्ट करा.
  • आता तुम्ही जमीन मोजणीसाठीचे परिमाण निवडून अगदी तंतोतंत जमिनीची मोजणी करू शकता.
  • सर्वात महत्त्वाचे म्हणजे जमिनी मोजताना Square Feet किंवा Square Meter या परिणामाणाची निवड करा.
  • या अशा पद्धतीने तुम्ही तुमची जमीन हेक्टरमध्ये सुद्धा मोजू शकता.

जमिनीच्या मापनावरुन होणारे वाद टळले

बरेचदा शेतकऱ्यांमध्ये जमिनीच्या बांधावरून होणारे वाद पहायला मिळतात. आता  या डिजिटलायझेशन मुळे हे वाद कमी होण्यास मदत होईल असे वाटते. तसेच Gps Area Calculator या ऍपटा  अजून एक महत्त्वाचा  उपयोग म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या  जमिनीची हद्द किंवा सीमा माहिती असणे अत्यंत महत्त्वाचे असे. याआधी आपल्या शेताची हद्द माहिती करुन घेण्यासाठी शासकीय कार्यालयांतील अधिकाऱ्यांची मदत घ्यावी लागत असे. किंवा जमिनीचा नकाशा मिळवून त्यानुसार हद्द तपासावी लागत असे. परंतु आता तसे नाही Gps Area Calculator या ऍपच्या मदतीने शेतकरी त्यांच्या शेतजमिनीचे किंवा मालकीच्या इतर जमिनीचे अचूकरीत्या मापन करु शकत आहेत. या नव तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतकऱ्यांचा त्रास खुपच कमी झाल्याचे दिसून येत आहे. Download Land map on Mobile App