driving licence rules 2024: आता ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी RTO कार्यालयात जाण्याची गरज नाही, खासगी संस्था देणार ड्रायव्हिंग लायसन्स

driving licence rules 2024

driving licence rules 2024 आपल्याला ड्रायव्हिंग लायसन्स मिळवायचे असल्यास त्याची एक खूपच क्लिष्ट आणि कंटाळवाणी प्रक्रिया आहे. ती म्हणजे आधी एखाद्या ड्रायव्हिंग स्कूलमध्ये प्रवेश मिळवा तेथे महिनाभर ड्रायव्हिंग शिका आणि त्यानंतर RTO मध्ये जाऊन परिक्षा द्या. इतकेच नाही तर त्यासोबत नागरिकांना ड्रायव्हिंग लायसन्स मिळविण्यासाठी अनेक फॉर्म्स भरावे लागतात. अशा गुंतागुंतीच्या आणि वेळखाऊ प्रक्रियेमुळे अनेकदा गैरव्यवहार होण्याची देखील शक्यता असते. ज्याचा दुष्परिणाम हा भारतातील वाहतूक आणि नागरिकांची सुरक्षितता यांच्यावर होऊ शकतो.  म्हणूनच शासनाने वाहतूक नियमांमध्ये आणि ड्रायव्हिंग लायसन्स वितरण पद्धतीमध्ये बदल केले आहेत हे बदल आज आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.

नवीन ड्रायव्हिंग लायसन्स मिळविण्याबाबत नियम

ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी अनेक प्रक्रिया आहेत. यामध्ये ज्या व्यक्तीला वाहन चालकाचा परवाना मिळवायचा आहे, तर ड्रायव्हिंग टेस्टपासून ते लेखी परीक्षा उत्तीर्ण  व्हावे लागले. ड्रायव्हिंग लायसन्स मिळविण्याच्या या प्रक्रियेला   काही आठवडे लागतात. आता काही दिवसांपूर्विच रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ड्रायव्हिंग लायसन्सबाबत नियमांमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत.  नागरिकांना आता आरटीओ कार्यालयात जाऊन ड्रायव्हिंग टेस्ट देण्याची गरज नाही तर शासनाने ठरवून दिलेल्या प्रशिक्षण केंद्रे म्हणजेच ड्रायव्हिंग स्कूल्समध्येच नागरिकांना ड्रायव्हिंग लायसन्स मिळविता येणार आहे.  driving licence rules 2024

कधीपासून हा नवीन नियम लागू झाला आहे?

वाहतुक विभागामार्फत नवीन नियम जाहीर करण्यात आले आहेत. दिनांक 1 जून 2024  वाहतुकीचे हे नवीन नियम लागू होणार आहेत. या नियमांनुसार वाहतुकीचे नियम तोडल्यास दंडाची रक्कम देखील वाढविण्यात आली आहे. तसेच ड्रायव्हिंग लायसन्स बाबत देखील शासनाने नवीन नियम केले आहेत. driving licence rules 2024

आता RTOपरिक्षेची सक्ती नाही

वाहतुक विभागाने केलेल्या नवीन वाहतुक नियमावली प्रमाणे वाहन चालक परवाना मिळविण्यासाठी पुर्वीसारखे RTO परिक्षेची सक्ती केली जाणार नाही. तसेच  खाजगी मोटार ट्रेनिंग संस्थांना चाचण्या घेण्याची आणि प्रमाणपत्रे देण्याची जबाबदारी देण्यात येणार आहे. तसेच प्रशिक्षणार्थींना ड्रायव्हिंग लायसन्स देण्याचे अधिकार सुद्धा या मार्फत देण्यात आले आहेत. driving licence rules 2024

खासगी संस्थांकडून मिळणार ड्रायव्हिंग लायसन्स

आपल्याला जेव्हा ड्रायव्हिंग लायसन्स हवे असते किंवा ड्रायव्हिंग शिकायची असते तेव्हा आपण आपल्या परिसरातील ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूलमध्ये ऍडमिशन घेतो. तेथे आपल्याला ड्रायव्हिंग शिकवली जाते आणि वाहतुकीचे नियमांसंबंधिक परिक्षा देण्यासाठी तयार केले जाते. नंतर आपण RTO अंतर्गत परिक्षा देतो आणि आपल्याला ड्रायव्हिंग लायसन्स मिळते. परंतु शासनाने आता हा नियम बदलून ड्रायव्हिंग लायसन्स देण्याबद्दल खाजगी संस्थांना परवाने दिले आहेत. driving licence rules 2024

वेगाने गाडी चालवल्यास किती दंड आहे

या नवीन नियमानुसार प्रत्येक ठिकाणच्या ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त वेगाने गाडी चालवल्यास वाहन चालकाला 1000 ते 2000 रुपयांचा दंड भरावा लागू शकतो. तसेच एखाद्या व्यक्तीस लायसन्सशिवाय गाडी चालवताना पकडले गेल्यास 10000 रुपयांचा दंड लागू शकतो. इतकेच नाही तर अल्पवयीन मुलास वाहन चालवताना पकडल्यास 25 हजार रुपयांचा दंड भरावा लागू शकतो. driving licence rules 2024

ड्रायव्हिंग लायसन्स मिळविण्याचे योग्य वय.

वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक व्यक्ती ड्रायव्हिंग लायसन्स मिळवू शकतात. याचा अर्थ अल्पवयीन मुलांना  कोणत्याही प्रकारे ड्रायव्हिंग लायसन्स दिले जाणार नाही. अल्पवयीन मुलाने गाडी चालविल्यास त्याला 25000 हजाराचा दंड होतो आणि त्या मुलाकडून अपघात झाल्यास त्याच्या आई – वडिलांना 2 वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो.

कोणत्या ड्रायव्हिंग प्रशिक्षण केंद्रांना परवाना मिळणार आहे?

यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स मिळविण्यासाठी RTO मध्ये जाण्याची गरज नसली आणि शासनाच्या नवीन नियमावलीप्रमाणे ज्या ड्रायव्हिंग प्रशिक्षण संस्थांना परवाने दिले जाणार आहेत त्यांना पुढील पात्रता सिद्ध करणे अनिवार्य आहे. driving licence rules 2024

  • दुचाकी प्रशिक्षण केंद्रासाठी किमान एक एकर जागा आणि मोटार चालक प्रशिक्षण केंद्रासाठी दोन एकर जागा असावी असणे अनिवार्य आहे.
  • तसेच ट्रेनिंग सेंटरमध्ये ड्रायव्हिंग टेस्टसाठी आवश्यक सुविधाही असणे अनुवार्य आहे.
  • प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षकांना हायस्कूल डिप्लोमा असणे आवश्यक आहे.
  • प्रशिक्षकांना वाहन चालविण्याचा किमान पाच वर्षांचा अनुभव असावा.  
  • प्रशिक्षकांना बायोमेट्रिक्स आणि संगणकाविषयीचे संपुर्ण  ज्ञान असणे आवश्यक आहे.
  • प्रशिक्षकाची निवड करताना वरील सर्व गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी

https://transport.maharashtra.gov.in/Site/Upload/Pdf/RTO%20Office%20Add%20Tele%20e%20mail%20list%20marathi%20DTD%2023-04-24.pdf वाहतुक नियमांबाबत अधिक माहिती मिळवायची असल्यास तुम्ही वरील लिंकलवर क्लिक करुन परिवहन विभागाच्या प्रादेशिक कार्यालयांचे पत्ते आणि दुरध्वनी क्रमांक मिळवू शकता. आणि अधिक माहिती घेऊ शकता.