शेतकऱ्यांना शेतीची मोजणी करण्याची वेळोवेळी गरज भासते. अनेकदा शेतजमीनीचा विषय कोर्टात असतो, भावाभावांमध्ये जमिनीचे वाद सुरु असतात. अशावेळी जमिनीच्या हिस्सेदारांकडून किंवा जमिनीच्या मालकांकडून भूमीअभिलेख कार्यालयात भूमापनासाठी अर्ज केला जातो. अशावेळी शासकीय अधिकारी येऊन भूमापन करतील यासाठी शेतकऱ्यांना दीर्घकाळ वाट पहावी लागते. तसेच केलेली जमीन मोजणीत अनेक त्रुटी देखील दिसून येतात यावर उपाय म्हणून महाराष्ट्र भूमी अभिलेख विभागाकडून ई मोजणी 2.0 या नव्या प्रणालीची निर्मिती करण्यात आली आहे. चला तर मग या लेखाच्या माध्यमातून या नव्या प्रणालीची माहिती मिळवूया. E mojani 2.0
शेतकऱ्यांना जमिनीच्या मोजणीची वेळोवेळी गरज असते
शेतकऱ्यांना वेळोवेळी त्यांच्या शेत जमिनीची किंवा बिगर शेत जमिनीच्या मोजणीची गरज असते. ही मोजणी बरेचदा वेळेत होणे देखील गरजेचे असते. परंतु शासकीय कार्यालयांची कामे आणि कागदपत्र व्यवहार यामध्ये खूप वेळ जाते आणि जमीन मोजणीसाठी दीर्घकाळ शेतकऱ्यांना वाट पहावी लागते. E mojani 2.0
शासकीय अधिकाऱ्यांच्या पारंपरिक जमीन मोजणीत त्रुटी
जमीन मोजणीसाठी भूमी अभिलेख कार्यालयात अर्ज दाखल केल्यानंतर तेथील अधिकारी येऊन अर्जदारांची जमीन मोजणी करुन देतात. अशावेळी अधिकाऱ्यांकडून जमीन मोजताना अनेक त्रुटी राहिल्याचे निदर्शनास आहे आहे. एखाद्या जमीनीच्या ऑनलाईन नकाशात वेगळीच सिमा दिसत असताना सत्य परिस्थितीत वेगळीच हद्द असल्याचे दिसून आहे. E mojani 2.0
ई मोजणी 2.0 ची निर्मिती
भूमी अभिलेख विभागामार्फत ई मोजणी 2.0 या प्रणालीची निर्मिती करण्यात आली आहे. सॅटलाईटद्वारे रोव्हर व लॅपटॉपच्या माध्यमातून ही मोजणी केली जाते. ही एक डिजीटल अद्ययावर कार्य प्रणाली आहे. यासाठी सॅटलाईट रोव्हरचा समावेश होत आहे. या प्रणालीच्या मदतीने आता राज्यातील विविध तालुके आणि जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या जमीनींचे मोजमाप करणे शक्य होणार आहे. शासकीय मोजणी करताना त्याला काही नियम असतात या सर्व नियमांचे पालन करीत या प्रणालीच्या मदतीने जमीन मोजणी केली जाणार आहे. यामध्ये शासकीय अधिकाऱ्यांचा आणि शेतकऱ्यांचा देखील वेळ वाचणार आहे हे मात्र नक्की. E mojani 2.0
आतापर्यंत राज्यातील सहा तालुक्यांमध्ये या प्रणालीची अंमलबजावणी
महाराष्ट्र भूमी अभिलेख विभागामार्फत भूमोजणीचे काम केले जाते, त्यासाठी विभागामार्फत एका अद्यावरत प्रणालीचा शोध लावण्यात आला आहे. राज्यातील करवीर, शिरोळ, हातकणंगले, भुदरगड, राधानगरी, गगनबावडा या सहा तालुक्यांमध्ये सध्या ई मोजणी 2.0 प्रणालीच्या माध्यमातून जमीन मोजणीचे काम सुरु आहे. E mojani 2.0
1 तासात होते जमिनीची मोजणी
ई मोजणी 2.0 च्या मदतीने जमीन मोजणीत कोणत्याही त्रुटी आढळत नाहीत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही मोजणी अवघ्या 1 तासात पूर्ण होते. आधीच्या पारंपरिक मोजणीमध्ये शासकीय अधिकाऱ्यांना जमीन मोजणी करताना खूप वेळ लागत असे. परंतु आता शेतकऱ्यांना तसेच जमीन मालकांना जमिनीची मोजणी करण्यासाठी कोणत्याही प्रकारे दीर्घकालावधीसाठी वाट पहावी लागत नाही. अधिकारी येऊन 1 तासात शेतजमिनीची मोजणी करुन जातात. ही प्रणाली डिजिटल आणि अद्यावत असल्याने ते ई नाकाशामध्ये देखील त्याचे रुपांतर होऊन झटपट मिळते. E mojani 2.0
ऊस पिकाची मोजणी करणे शक्य
या आधी शासकीय अधिकाऱ्यांना ऊस पीकाची मोजणी पीक काढल्याशिवाय शक्य नसे. कारण त्याशिवाय जमिनीच्या हद्दी दिसत नसत. परंतु आता तसे नाही, शासकीय विमा योजनेसाठी असो किंवा कोणत्याही इतर कारणासाठी असो इ मोजणी 2.0 या नव्या प्रणालीच्या मदतीने ऊस पिकाची मोजणी करणे आता शक्य झाले आहे. E mojani 2.0
महाराष्ट्रातील विविध विभागांमध्ये डिजिटल कार्यप्रणालीचा वापर केला जातो. तसेच नागरिकांना वेळेत सुविधा मिळाव्यात यासाठी कार्यप्रणाली अद्ययावर देखील केली जाते. भूमी अभिलेख विभागामार्फत जमीन मोजणीसाठी तयार करण्यात आलेल्या ई मोजणी 2.0 ही प्रणाली देखील शेतकऱ्यांना अत्यंत उपयोगी येणार आहे.