E peek Pahani अवकाळी पाऊस, पावसाळ्यातील खंड आणि दुष्काळ यासगळ्याच नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकऱ्याला शेतातील पिक नुकसानीला सामोरे जावे लागते. म्हणून यावर शासनाने डिजिटल क्रांतीला धरुन एक ॲप तयार केले आहे. ज्याच्या मदतीने शेतकऱ्यांच्या पिक नुकसानीची पाहणी त्वरीत होते आणि त्यांना पीक विमा देखील वेळेत देता येतो.
महाराष्ट्र राज्य महसूल विभागाने E peek Pahani mobile app ची निर्मिती केली आहे. राज्यांतर्गत ई-पीक पाहणी प्रकल्पाची सुरुवात 15 ऑगस्टपासून करण्यात आली. नामांकीत टाटा समुहाच्या मदतीने हे शासकीय सुविधा ॲप तयार करण्यात आले आहे. पीकपेरणी अहवालाची पारदर्शक माहिती एकत्रित करताना पीकविमा व पीकपाहणी दावे निकालात काढण्यासाठी या ॲपचा अतीशय उपयोग होत आहे. Rabbi hangam pik pahani
केवळ या तारखेपर्यंत करता येणार आहे रब्बी हंगामातील ई पीक पाहणी
रब्बी हंगाम ई पीक पाहणी e peek pahani सुविधा शासनाने मोबाइल अॅप्लिकेशनच्या माध्यमांतून उपलब्ध करून दिली आहे. तसेच रब्बी हंगामातील तुमच्या पीकाचे नुकसान झाले असल्यास तुमच्या पिकासंबंधी माहिती देण्याची अंतीम तारीख ही 31 जानेवारी पर्यंत आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अजूनही त्यांच्या रब्बी हंगामातील पिकांची ई पाहणी केलेली नाही, त्यांनी लवकरात लवकरत मोबाईल ॲपच्या मदतीने ती करुन घ्यावी. कारण त्यानुसारत शेतकऱ्यांना त्यांचा पीक विमा किंवा नुकसान भरपाई मिळणारी आहे.
अशी करा रब्बी हंगामातील ई पीक पाहणी
- तुमच्या मोबाईलमधील play store मधून E peek Pahani mobile app डाऊनलोड करा.
- महसूल विभाग पर्याया निवडा
- त्यानंतर तुम्हाला new registration पर्यायावर क्लिक करुन तुमची नोंदणी करुन घ्यावी लागले.
- विभाग, जिल्हा, तालुका, गाव पर्याय निवडा त्यानंतर तुमचे पहिलं नाव, मधले नाव आणि आडनाव भरा.
- गट क्रमांक या पर्यायावर क्लिक करून तुमचा गट क्रमांक भरा. त्यानंतर खातेदाराचं नाव आणि खाते क्रमांक तपासा.
- तुमचा मोबाईल नंबर भरा आणि जेणेकरून सर्व माहिती तुम्हाला मोबाईल नंबर व मिळू शकेल
- आता पीक पाहणीच्या अॅपवर तुम्ही तुमच्या पिकांची नोंद करा. इथे पीक माहिती नोंदवा या पर्यायावर क्लिक करा. मग खाते क्रमांक, गट क्रमांक निवडला की लागवडीखालील जमिनीच्या एकूण क्षेत्रबाबात सर्व माहिती दिसेल.
- पुढे रब्बी हंगाम निवडून, पिकाचा वर्ग, प्रकार, पीकाचे नाव ही सगळी माहिती भरायची आहे.
- त्यानंतर जल सिंचनाचे साधन निवडा. विहीर, तलाव, तळे यापैकी तुम्ही तुमच्या वापरातील साधन निवडू शकता.
- त्यानंतर पीक लागवडीची तारीख निवडा.
- पीकाचा फोटो अपलोड करा. महत्त्वाची सूचना म्हणजे पीकाचा फोटो हा तुम्हाला तुमच्या शेतातून अपलोड करायचा आहे.
- त्यानंतर तुम्ही भरलेली संपूर्ण माहिती समोर दिसेल.
- तुम्ही नोंदणी केलेल्या पीकाची माहिती बरोबर आहे की नाही ते तपासा.
- शेवटी सबमीट बटणावर क्लिक करा.
‘ई-पीक पाहणी’अॅपचे फायदे समजून घेऊ
शासनातर्फे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तयार करण्यात आलेले E peek Pahani mobile app हे अत्यंत उपयोगी ऍप असून. शेतकऱ्यांना त्याचा खूप फायदा होणार आहे. य़ा ऍपचे फायदे आपण जाणून घेऊया. Rabbi hangam pik pahani
- ‘ई-पीक पाहणी’ अॅपच्या मदतीने शेतकऱ्यांच्या पीक पेरणीची अचूक नोंद करता येणार आहे.
- या अॅपमुळे शेतकऱ्याचे नुकसान टाळता येईल आणि दलालांमार्फत होणारी सरकारची फसवणूकही थांबेल.
- या अॅपरील नोंदीमुळे प्रत्येक हंगामातील राज्यात, देशात पिकाचा पेरा किती झाला याची परिपूर्ण माहिती आकडेवारीसह एका क्लिकर उपलब्ध होणार आहे.
- पिकाच्या अचूक आकडेवारीमुळे उत्पादनाबद्दल अंदाज बांधता येणार आहे.
- यावरुन भविष्यात बी-बियाणे लागणारे खत याबाबत देखील योग्य अंदाज बांधता येतील.
- पिकाच्या छायाचित्रामुळे किती अक्षांश: आणि किती रेखाअंशावर कोणत्या पिकाचा पेरा झाला आहे हे समजण्यास सोपे होणार आहे.
- एका मोबाईलमधून तब्बल 20 शेतकऱ्यांच्या नोंदी करता येणार आहेत.
प्रत्येक शेतकऱ्याकडे मोबाईल असतोच असे नाही, आणि ज्याच्याकडे मोबाईल नाही त्याची अडचण होऊ नये म्हणून शासनाने अशा प्रकारची सोय करुन दिली आहे. Rabbi hangam pik pahani