Update ration card online तुमच्या रेशन कार्डमध्ये दुरुस्ती करा अगदी घरबसल्या

Update ration card online

Update ration card online आधार  कार्डा आणि मतदार कार्डप्रमाणेच रेशन कार्ड देखील सरकारी योजनांसाठी किंवा रहिवासाचा पुरावा म्हणून  आवश्यक कागदपत्र मानले जाते. आपल्या भारत देशात कमी किमतीच्या धान्य विक्रेत्यांमध्ये पिवळ्या-केशरी पुस्तक शैलीतील पारंपारिक शिधापत्रिका वापरली जातात. या अतीमहत्त्वाच्या कागदपत्रात काही बदल करायचे असतील तर याआधी आपल्याला तहसिल कार्यालयात किंवा रेशन ऑफिसमध्ये फेऱ्या माराव्या लागत असत. परंतु आता तसे नाही. आपल्याला घरबसल्या आपल्या रेशन कार्डमध्ये दुरुस्त्या करता येणार आहेत. त्या बद्दल आपण या लेखाच्या माध्यमातून माहिती मिळवणार आहोत.

तुम्हाला तुमच्या रेशनकार्डवर काही बदल करायचे असतील  तर शासनाने आता ही सेवा ऑनलाईन केली आहे. म्हणजे घरचा पत्ता, शहर, गाव बदलल्यानतंर रेशनकार्ड धारकांची पंचायत होते. अशावेळी नव्या पत्त्यावर रेशन मिळण्यासाठी तहसील कार्यालयातील पुवठा विभागात नागरिकांना हेलपाटे मारावे लागतात. म्हणूनच सरकारने आता ‘मेरा रेशन’ हे नवीन ऍप सुरु केले आहे. या ऍपच्या माध्यमातून अर्ज केल्यानंतर कार्डधारकाला त्याच्या रेशन कार्डमध्ये काही दुरुस्ती करायची असले तर करता येणार आहे.

तुम्हाला कागदी रेशनकार्ड हटवायचे आहे का?

ज्या नागरिकांना कागदी रेशनकार्ड हटवायचे आहे त्यांना यापुढे इलेक्ट्रॉनिक रेशन कार्ड दिले जाईल असे शासनाने सांगितले आहे. “Online Ration Card Maharashtra”. आता यापुढे पारंपरिक वापरातल्या केशरी आणि पिवळ्या रंगाच्या शिधापत्रिका नाहीशा होणार आहेत.

Update ration card online घरबसल्या मोबाइलवरुन करता येणार बदल.

महाराष्ट्र शासनाने सर्व नागरिकांसाठी रेशन कार्ड हे महत्वाचे कागदपत्र आहे, शासकायी कामांसाठी या कागदपत्राचा अत्यंत महत्त्वाचा उपयोग होतो. म्हणून शासनाने नागरिकांना त्यांच्या त्यांच्या  रेशनकार्ड मध्ये ऑनलाईन बदल करु शकतील अशी डिजिटल सुविधा केली आहे.

https://rcms.mahafood.gov.in/PublicLogin/frmPublicLogin.aspx

  • या लिंकवर क्लिक करुन तुम्ही तुमच्या रेशनकार्ड संदर्भातील बदल ऑनलाईन पद्धतीने करु शकता.
  • या वेबसाईटवर तुम्ही सर्वप्रथम रजीस्ट्रेशन करणे आवश्यक आहे.
  • तुमचा ईमेल आयडी आणि फोन नंबरच्या मदतीने तुम्ही वेबसाईटवर तुमचे रजीस्ट्रेशन करु शकता.
  • पुढे तुम्हाला तीन पर्याय दिसतील
  • Sign In with Aadhaar OTP
  • Sign In with Username
  • Sign In with Ration Card No
  • वरीलपैकी तुम्हाला सोयीचा असलेला पर्याय तुम्ही निवडू शकता.
  • त्यानंतर पुढे तुम्हाला विचारली माहिती भरत तुम्ही तुमच्या रेशन कार्डमध्ये बदल करु शकता.
  • तुमच्या नावामध्ये चूक असल्यास बदल करु शकता, तुमचा पत्ता बदलायचा असल्यास तो बदलू शकता. तसेच नवीन रेशन कार्डसाठी अर्ज देखील करु शकता. अशा विविध सोयी सुविधा ऑनलाईन पद्धतीने शासनाने उपलब्ध करु दिल्या आहेत.

रेशन कार्डवरील SRC नंबर महत्त्वाचा

प्रत्येक रेशन कार्डवर एक 12 अंकी नंबर असतो, तो नंबर म्हणजे त्या रेशन कार्डचा युनिक नंबर असतो. शासनाच्या Maha Food Government  या वेबसाईटवर  रेशनकार्ड वरील हा 12 अंकी नंबर सर्च केल्या  तुमच्या संपुर्ण कुटुंब सदस्यांची नावे त्यात पाहता येतात. तुम्हाला तुमच्या रेशनकार्डमध्ये बदल करायचे असतील तरी देखील हा SRC नंबर अत्यंत महत्त्वाचा असतो. या नंबरच्या मदतीने देखील तुम्ही तुमच्या रेशनकार्डवरील नावात बदल, पत्त्यातील बदल किंवा एखादी चुक दुरुस्त करु शकता. म्हणजेच तुमचे रेशनकार्ड तुम्ही अपडेट करु शकता.

भारत बनला डिजिटल क्रांतीचा एक महत्वाचा

आपला देश आता डिजिटल क्रांतीचा एक महत्वाचा भाग बनलेला आहे. आता सगळ्याच शासकीय सुविधा, सेवा ऑनलाईन करण्यात आलेल्या आहेत. कोणतीही शासकीय योजना असेल तर त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी देखील आपल्याला ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करावे लागतात. भारताच्या राज्या राज्यात आणि राज्यांमधील जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये आता डिजिटलायझेशन रुजले आहे. इंटरनेटच्या माध्यमातून ही क्रांती घडून आल्याचे दिसते. तसेच भारत हा असा देश आहे ज्याने या डिजिटल क्रांतीचा वापर नागरिकांपर्यंत सुविधा पोहोचवण्यासाठी केला आहे. आणि भारातचे नागरिक देखील या नव्या बदलाला सकारात्मकतेने साथ देत आहेत आणि या बदलाचे भाग बनत आहेत.