E Peek Pahani App: शेतकऱ्यांना ई-पीक पाहणीच्या माध्यमातून होत आहे मोठी मदत! चक्क मोबाईलवरुन पिकाची पाहणी करणे शक्य

E Peek Pahani App भारत हा कृषीप्रधान देश आहे. येथे शेती उत्पादन मोठ्या प्रमाणात केले जाते. शेतीतील उत्पादन तपासताना, अनेकदा कर्जमाफी करताना शेतकऱ्यांच्या पीकाची मोजणी शासनाला करावी लागते. खूप मोठ्या अंतरावर पसरलेल्या पीकाची मोजणी करणे कठीण बाब आहे, त्यामुळेच तंत्रज्ञानाच्या मदतीने शासनाने ई-पीक मोजणी ऍपची निर्मिती केली आहे. या ऍपच्या मदतीने शेतकऱ्यांच्या पिकाची पाहणी करणे अत्यंत सोपे झाले आहे. चला तर मग या ऍपबद्दल अधिक माहिती मिळवूया.

ई-पीक पाहणीचा उद्देश

क्षेत्रीय स्तरावरुन पीक पेरणी अहवालाचा Real Time Crop Data संकलित होण्याच्या दृष्टीने तसेच, सदर Data संकलित करताना पारदर्शकता आणणे, पीक पेरणी अहवाल प्रक्रीयेत शेतकऱ्यांचा सहभाग वाढविणे, कृषी पतपुरवठा सुलभ करणे, पीक विमा आणि पीक पाहणी दावे निकाली काढण्याची प्रक्रिया सुलभ करणे, नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई आणि योग्य प्रकारे मदत करणे शक्य व्हावे तसेच शेतकऱ्यांच्या हितासाठी असलेल्या सरकारी योजनांच्या अंमलबजावणीसाठी सादर Data वापरणे या उद्देशाने ई पीक पाहणी कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

  1. शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई चे दावे लवकरात लवकर निकाली काढण्याच्या उद्देशाने ई पीक पाहणी कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
  2. शेती क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या उद्देशाने ई पीक पाहणी अँप (online pik pahani) सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला.

ई-पीक पाहणी मोबाईल अँपच्या मदतीने पीक नोंदणी करण्याची प्रक्रिया (E-Pik Pahani Registration)

  • सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो आपल्या मोबाईल मधील Play Store App यामध्ये जाऊन ई पीक पाहणी E Peek Pahani ऍप सर्च करा आणि डाउनलोड करा.
  • ऍप ओपन करा आणि ऍपमधील राज्याच्या महसूल विभागाचा पर्याय निवडा.
  • त्यानंतर आलेल्या रकान्यात मोबाईल नंबर टाकायचा आहे.
  • पुढे तुमचा विभाग, ताकुलाक,  जिल्हा, गाव या पर्यायांची निवड करायची आहे.
  • तुमचे संपुर्ण नाव, खाते क्रमांक, गट क्रमांक यांपैकी सर्व माहिती भरून सर्च बटनावर क्लिक करा.  त्यानंतर खातेदाराची निवड करा.
  • तुमच्या शेतीतील पीक पेरणीची माहिती भरा.
  • तुमच्या शेतात घेतलेल्या पिकांची निवड करा.
  • तुमच्या शेतात पिकांसाठी वापरलेल्या सिंचन प्रकाराची निवडायचा करा.
  • तुमच्या शेतातील पिकाचा फोटो ऍपवर अपलोड करा.
  • त्यानंतर तुम्हाला तुमच्या पिकांचे अक्षांश रेखांश तसेच उभ्या पिकाचे छायाचित्र अपलोड करावे लागतील.
  • ही संपूर्ण प्रक्रिया केल्यानंतर तुमच्या पिकाची ई पीक नोंदणी पूर्ण होईल.

पिकांच्या या अवस्थांमध्ये ई-पीक पाहणी केली जाते. E Peek Pahani App

  • पीक पेरणी नंतर 2 आठवड्यामध्ये वाढलेले पीक
  • पिकाची पूर्ण वाढलेली अवस्था
  • कापणी (हंगाम) पूर्वीची अवस्था

ई पीक पाहणीचे फायदे जाणून घ्या!

  • ई-पीक पाहणी केल्याने शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील मालाला बाजारपेठेत असलेली मागणी, कर्जमाफी यासाठी योग्य तो मोबदला मिळवून घेता येत आहे.  E-Pik Pahani
  • बाजारात आपल्या पिकाला योग्य भाव मिळविण्यासाठी ई-पीक पाहणी ऍपची खूप मदत होत आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत विक्री करायची असल्यास त्यासाठीही लागणारी पिकाची माहिती शेतकऱ्याच्या संमतीनें या ऍपवरुन मिळवली जाते.
  • एखाद्या शेतकऱ्याने पिकावर कर्ज घेतल्यास त्याने  पिक लावलं का याबद्दल कर्ज देणारी बँक ई पीक मोजणी ऍपच्या मदतीने  डेटा पाहून पडताळणी करू शकते. कारण 100 पेक्षाही जास्त  बँका आजघडीला हा डेटा वापरत आहेत.
  • नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्यास शेतीचे फोटो काढून या ऍपवर अपलोड केल्यास शेतकऱ्यांना शासकीय नुकसान भरपाई देण्यात येते.
  • एखाद्या शेतकऱ्याने पीक विम्यासाठी अर्ज केल्यास अर्ज करताना त्याने नोंदवलेले पीक आणि ई पीक पहाणीत नोंदवलेले पीक यामध्ये साम्यता नसेल तर ई पीक मोजणी ऍपवर अपलोड केलेल्या माहितीच्या आधारे पीक विमा मंजरू केला जातो.