भारतातील विविध राज्यांमध्ये आजही अनेक विद्यार्थी असे आहेत ज्यांची आर्थिक परीस्थीती चांगली नसल्याने महाविद्यालयीन शिक्षण घेता येत नाही, तसेच परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेता येत नाही. त्यामुळे अनेक सामान्य कुटुंबातील मुले हे उच्च शिक्षणापासून वंचित राहतात.
महाराष्ट्र राज्यात खूप मोठ्या प्रमाणावर शेतकरी वर्ग राहतो. आजही पारंपरिक पद्धतीने येथे शेती केली जाते. त्यामुळे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेली शेती कधी चांगले पीक देते तर कधी पीकच मिळत नाही. त्यामुळे येथील शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची असते. त्यात त्यांच्या मुलांना उच्च शिक्षण घ्यायचे असल्यास दूर तालुक्याच्या ठिकाणी किंवा शहरांमध्ये जावे लागते. अशा गरीब शेतकरी, कामगार यांच्या मुलांना उच्च शिक्षण घेता यावे यासाठी शासनाने शैक्षणिक कर्ज योजना सुरु केली आहे. Education Loan Scheme 2024-25
राज्यातील गरीब विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्ज योजना
राज्यामध्ये मजूर वर्गांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावरती आहे. अनेक मजूर दोन वेळचे जेवण त्यांच्या कुटुंबाला मिळावे यासाठी दिवसभर श्रम करतात. मग अशा कामकरी, मजुरांच्या मुलांना उच्च शिक्षण घ्यायचे असल्यास त्यांनी कुठून पैसै आणावे. म्हणूनच महाराष्ट्र शासनाने आपल्या राज्यातील गरीब विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्ज योजना सुरू करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. Education Loan Scheme 2024-25
महाराष्ट्र राज्यात शैक्षणिक कर्ज योजना सुरु करण्याचा उद्देश
- महाराष्ट्र राज्याती आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील मुलांना उच्च शिक्षण घेता यावे,
- पैशांअभावी ज्या विद्यार्थ्यांचे शिक्षण अर्धवट राहिले आहे त्यांना ते शिक्षण पूर्ण करता यावे.
- राज्यातील गरीब कुटुंबातील मुले उच्च शिक्षण घेऊन मोठ्या पदांवरती नोकरी करु शकतील.
- ज्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी परदेशात जायचे आहे परंतू त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही अशांना ही योजना अत्यंत लाभकारक ठरली आहे.
- महाराष्ट्रातील ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांना त्यांचे उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी या योजनेचा खूप फायदा झाला आहे. Education Loan Scheme 2024-25
शैक्षणिक कर्ज योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
● आधार कार्ड, पॅन कार्ड
● मतदार ओळखपत्र
● राष्ट्रीयकृत बँकेत खात्याचे तपशील
● पासपोर्ट साईज आकाराचे फोटो
● तहसीलदाराकडून मिळवलेला उत्पन्नाचा दाखला
● विद्यार्थ्यांच्या मागील शैक्षणिक वर्षाच्या गुणपत्रिका
● अभ्यासक्रमाचा कालावधी आणि संबंधीत पुरावा
● अर्जदार किंवा त्यांच्या पालकांनी इतर कोणत्याही बँकेकडून शैक्षणिक कर्ज न घेतल्याचे प्रतिज्ञापत्र Education Loan Scheme 2024-25
शैक्षणिक कर्ज योजने मधून किती कर्ज दिले जाते?
शैक्षणिक कर्ज या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी कर्ज दिले जाते, परंतु विद्यार्थ्याचे परतफेडची क्षमता इत्यादी बाबी लक्षात घेऊन बँकेतून शैक्षणित कर्ज दिले जाते. ज्या विद्यार्थ्यांना भारतातच राहून शिक्षण घ्यायचे आहे त्यांना 10 लाखापर्यंत शैक्षणिक कर्ज उपलब्ध करुन दिले जाते आणि ज्या विद्यार्थ्यांना बाहेरगावी जाऊन शिक्षण घ्यायचे आहे त्यांना 20 लाखापर्यंत शैक्षणिक कर्ज दिले जाते. Education Loan Scheme 2024-25
शैक्षणिक कर्ज योजनेसाठी लावला जाणारा व्याजदर
महाविद्यालयीन किंवा उच्च शिक्षणासाठी कर्ज घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जे कर्ज दिले जाते त्यावर 3% पर्यंत व्याजदर हा लावला जातो. विविध बँकांचा हा व्याजदर वेगळा असू शकतो परंतू शैक्षणिक कर्जावर सामान्यतः 3 ते 4 टक्के इतकाच व्याजदर लावला जातो. Education Loan Scheme 2024-25
शैक्षणिक कर्जासाठी कुठे अर्ज करावा?
तुम्ही महाविद्यालयीन विद्यार्थी असाल किंवा तुम्हाला उच्च शिक्षणासाठी परदेशात जायचे असल्यास तुम्ही तुमच्या जवळील बँकेत जाऊन शैक्षणिक कर्जासाठी अर्ज करु शकता. विद्यार्थ्याच्या पालकांचा उत्पन्नाचा दाखला आणि विद्यार्थ्याचे मागील वर्षाचे गुणपत्रक सादर करणे अनिवार्य असते. तसेज वरती सांगीतल्याप्रमाणे सर्व कागदपत्रे तयार करुन बँकेत शैक्षणिक कर्जासाठी अर्ज करावा. कर्ज परत करण्याचा कालावधी निवडावा. त्यानुसारच विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज दिले जाते. Education Loan Scheme 2024-25