Electric Scooter Subsidy 2023  इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्यासाठी सरकारकडून मिळतंय 80 टक्के अनुदान

Electric Scooter Subsidy 2023

Electric Scooter Subsidy 2023:  वाढते प्रदुषण आणि पेट्रोलचा तुटवडा यामुळे भारतीय वाहनांच्या बाजारात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढत आहे. विविध कंपन्यांकडून नवीन इलेक्ट्रिक वाहने लॉन्च केली जात आहेत. सध्यस्थिती पाहता पेट्रोल डिझेलच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. इंधनाच्या दरवाढीमुळे नागरिक त्रस्त आहेत. यामुळे नागरिक इलेक्ट्रिक वाहनांकडे आकर्षित झालेले आहेत.

सध्या भारतीय वाहन बाजारात दुचाकी, चारचाकी तसेच तीन चाकी इलेक्ट्रिक वाहने लॉन्च  केली जात आहेत. ही इलेक्ट्रिक वाहने खरेदी करून तुम्ही इंधनाचा खर्च वाचवू शकता. electric scooter subsidy in maharashtra 2023 अनेकजण आर्थिक अडचींमुळे इलेक्ट्रिक वाहने खरेदी करु शकत नाहीत. मात्र, इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी सरकारकडून सबसिडी दिली जाणार आहे. Electric Vehicle Subsidy 2023

इलेक्ट्रिक वाहनांबाबत भारत सरकारची भूमिका

नॅशनल इलेक्ट्रिक मोबिलीटी प्लॅन (NEMMP) अतर्गत भारत सरकाने सन 2024 पर्यंत 80 लाख इलेक्ट्रिक व हायब्रीड वाहने रस्त्यावर उतरविण्याचा मानस ठेवला आहे. यासाठी Faster Adoption & Manufacturing of (Hybrid) & Electric Vehicles (FAME) ही योजना केंद्र शासनाने सुरु केली आहे. जेणकरुन 120 दशलक्ष बॅरल इंधन बचतीचे व 40 लाख टन कार्बन डाय ऑक्साईड उत्सर्जन कमी करण्याचे भारत सरकारचे उद्दिष्ट पूर्ण होऊ शकेल. (Electric Vehicle Subsidy Maharashtra)

इलेक्ट्रिक वाहन अनुदान योजना Electric Scooter Subsidy 2023

केंद्र सरकारकडून इलेक्ट्रिक वाहन अनुदान योजनेला 2022 मध्ये मंजुरी देण्यात आली आहे. देशातील वाढती प्रदूषण समस्या पाहून केंद्र सरकारने इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी नागरिकांना प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला. इलेक्ट्रिक वाहनांमुळे प्रदुषण कमी होते, पर्यायाने नागरिकांचे आरोग्य राखले जाईल. म्हणूनच सरकार इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी सबसिडी देणार आहे.

इलेक्ट्रिक वाहनांची किंमत जास्त असल्याने अनेकांना ते खरेदी करणं परवडत नाही. त्यामुळे लोकांनी इलेक्ट्रिक वाहनांकडे पाठ फिरवली आहे. यासाठी सरकारकडून सबसिडी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारतात तयार होणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांवरच सबसिडी दिली जाणार आहे. electric car subsidy in maharashtra 2023

राज्यांकडून इलेक्ट्रिक स्कूटरसाठी अनुदान

भारतातील विविध राज्यांमध्ये देखील तेथील सरकार इलेक्ट्रिक वाहनाच्या खरेदीवर अनुदान जाहीर करीत आहे.

महाराष्ट्रात इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीसाठी प्रति किलोवॅट रुपये 5000 सबसिडी उपलब्ध आहे. जर तुमची बोट पहिल्या 10 हजार ग्राहकांमध्ये असेल, तर अशा स्थितीत तुम्ही इलेक्ट्रिक कार खरेदी करता, अन्यथा कोणत्याही कारणाशिवाय राज्यातील दुचाकी इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीदारांना खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात अनुदान दिले जाते.

असे मिळवा अनुदान – Pm Scooty Yojana Apply 2023

जर तुम्ही भारतीय इलेक्ट्रिक वाहन खरेदी करत असाल तर तुम्हाला सबसिडी दिली जाईल. पण इलेक्ट्रिक वाहन खरेदी करत असताना डीलर्सला सर्व आवश्यक कागदपत्रे द्यावी लागतील. तुम्ही दिलेली सर्व कागदपत्रे सरकारकडे देण्यात येतील. सरकारच्या संबंधित योजनेतील अधिकाऱ्यांकडून तुम्ही दिलेली कागदपत्रे पडताळली जातील आणि सर्व प्रक्रिया पूर्ण होताच तुम्हाला काही दिवसांनी सबसिडी देखील दिली जाईल. ही सबसिडी तुम्ही नोंदणी केलेल्या बँक खात्यात जमा होईल.

अनुदानासाठी ऑनलाईन अर्ज करा

इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करताना तुम्ही स्कूटरच्या डिलरला सर्व कागदपत्रे देऊन स्वतःचे काम करवून घेऊ शकता किंवा खालील पद्धतीने ऑनलाईन अर्ज करुन देखील इलेक्ट्रिक स्कुटरवर अनुदान मिळवू शकता.

http://di.maharashtra.gov.in/vehicle/#/UserRegistration

  • या वेबसाईटवर जाऊन स्वतःचे रजीस्ट्रेशन करणे आवश्यक आहे.
  • विचारण्याच आलेली माहिती आणि योग्य कागदपत्रे अपलोड करुन तुम्ही इलेक्ट्रिक स्कूटर अनुदानासाठी अर्ज करु शकता.

इलेक्ट्रिक स्कूटर वापरण्याचे फायदे

  • इलेक्ट्रिक स्कूटरमुळे प्रदूषण होत नाही. पर्यावरण राखण्याच्या कामात आपला हातभार या निमित्ताने लावता येतो.
  • पेट्रोलचे वाढते दर यामुळे खिश्याला कात्री लागते. अशावेळी पेट्रोलचा वापर श्यून्यावर आणता येतो.

सरकार इलेक्ट्रिक वाहन चार्जिंगच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी प्रोत्साहन देते आहे.