PAN Card online Download केवळ ५ मिनिटात पॅन कार्ड मोबाईलवरून डाऊनलोड करा

PAN Card online Download

PAN Card online Download आर्थिक व्यवहारांमध्ये अत्यंत महत्त्वाचे असलेले PAN कार्ड हे एक अनिवार्य कागदपत्र आहे. आधारकार्ड हा जसा एक युनिक नंबर आहे आणि ती प्रत्येकाची वैयक्तिक ओळख समजली जाते. तसेच आर्थिक व्यवहार करण्यासाठी पॅन कार्ड देखील अत्यंत मह्त्वाच समजले जाते. आणि आता तर भरत सरकारने असे जाहीर केले आहे की, पॅन कार्ड आणि आधारकार्ड लिंक असणे अनिवार्य आहे. त्यासाठी आपण पॅनकार्ड विषयी ही महत्त्वाची माहिती घेत आहोत. ते म्हणजे पॅनकार्ड आपण डिजिटल स्वरुपात आपल्या मोबाईलवरून देखील जाऊनलोड करु शकतो. अगदी काही सेकंदातच. पॅनकार्ड विषयी अधिक सविस्तर माहिती पुढील प्रमाणे.

ई – पॅन कार्ड e-pan card  म्हणजे काय?

       PAN म्हणजेच Parment Account Number. खरंतर पॅन कार्ड हा 10 अल्फान्यूमेरिक नंबर (Alphanumeric Number) आहे. पॅन कार्ड आयकर विभागाकडून देण्यात येते.

पॅन कार्ड नंबरचा अर्थ

पॅन कार्डमध्ये अल्फान्यूमेरिक 10 अंक आहेत. यूटीआय (UTI) किंवा एनएसडीएलच्या (NSDL) माध्यमातून आयटी विभागाकडून हे पॅनकार्ड दिले जाते. पॅनकार्ड मधील प्रत्येक वर्णमाला किंवा संख्ये मागे एक माहिती दडलेली असते. पॅन कार्डच्या 10 अंकातील पहिले 5 अंक हे वर्णमाला आहेत. त्यांच्या मागे 4 अंक गणिक असतात आणि शेवटी पुन्हा एक वर्णमाला असते. अशी पॅनकार्डची व्यक्तीच्या ओळखीसोबत कोडींग केलेली असते.

पॅन कार्ड मोबाईलमध्ये डाऊनलोड कसे करायचे? How to download lost pan card in mobile

 पॅन कार्डच्या मागच्या बाजूला पत्ता असतो त्यामध्ये NSDL किंवा UTITSL या दोन्हींपैकी एका ऑफिसता पत्ता दिसेल.

 • https://www.onlineservices.nsdl.com/paam/requestAndDownloadEPAN.html ही लिंक तुमच्या मोबाईलमध्ये ओपन करा.
 • त्यामध्ये तुमचा पॅन कार्ड नंबर भरा
 • खालील जन्मतारीख महिना व वर्ष टाका
 • Captcha कोड टाका.
 • SUBMIT वर क्लिक करा
 • पॅन कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरी एक OTP जाईल तो वेरिफाय करा.
 • ८ रु. २६ पैसे पेमेंट करा, पेमेंट झाल्यानंतर तुमचे पॅन कार्ड डाऊनलोड करण्याचा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.

ई – पॅन कार्ड सोबत ठेवण्याचे फायदे. PAN Card online Download

 • ई-PAN कार्ड हरवण्याची भीती नसते

अनेकदा प्रवासात किंवा काही वेगळ्या कारणांनी मूळ पॅन कार्ड हरवले जाण्याची भीती असते. त्यामुळे आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अनेकजण पर्समध्ये पॅनकार्डही ठेवतात, त्यामुळे पर्स चोरीला गेल्यास पॅनकार्डही चोरले जाते. त्यामुळे, ई-पॅन कार्ड वापरणे नेहमीच सोईचे असते. मोबाईलवरुन हे पॅनकार्ड डाऊनलोड करुन आपण ईमेलवर सेव करुन ठेवू शकतो.  जे आपण आपल्या गरजेनुसार कुठेही वापरु शकता.

 • ई- पॅनकार्ड सांभाळणे सोपे जाते

पॅन कार्डची हार्डकॉपी बॅग, पर्स किंवा इतर कोणत्याही सुरक्षित ठिकाणी ठेवणे तुम्हाला खूप अवघड जाते. यात आपला वेळ वाया जातो. परंतु ई-पॅन कार्ड वापरून, तुमची या सर्व समस्यांपासून सुटका होते, कारण तुम्हाला ते तुमच्या बॅगेत किंवा पर्समध्ये ठेवावे लागत नाही.

 • कुठूनही डाउनलोड करू शकता

तुम्ही तुमचे मूळ पॅन कार्ड हार्ड कॉपीमध्ये आणायला विसरलात, तर अजीबातच घाबरून जाण्याची गरज नाही. तुम्ही तुमचे ई पॅन कार्ड तुमच्या फोन किंवा लॅपटॉपमधून कोठूनही नेट वापरून सहजपणे डाउनलोड करू शकता.

PAN कार्डची आवशक्यता का आहे?

PAN असल्याने बऱ्याच आवश्यक प्रक्रिया सोप्या आणि जलद झाल्या आहेत. त्याप्रमाणे, PAN कार्डचा उपयोग समजू घेऊ. 

 • पत्त्याचा पुरावा
 • ओळखीचा पुरावा
 • व्यवसाय नोंदणी
 • कर भरणे
 • फोन कनेक्शन मिळवणे
 • गॅस कनेक्शनसाठी अर्ज करणे
 • डिमॅट खाते उघडणे
 • म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करणे
 • बँक खाते उघडण्यास आणि चालवण्यास पात्र होणे
 • आर्थिक व्यवहार करणे
 • कर परताव्याचा दावा करणे

पॅन कार्डचे फायदे : Benefits of Pan Card

 • सर्वात महत्त्वाचे म्हणजे बँकेतील आर्थिक व्यवहारांसाठी पॅनकार्ड गरजेचे आहे.
 • कोणत्याही प्रकारचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्हाला पॅनकार्ड आवश्यक आहे.
 • आयकर रिटर्न भरताना पॅनकार्डच्या हा अनिवार्य कागदपत्र आहे, त्याशिवाय आयकर रिटर्न भरला जाऊ शकत नाही.