Colour Voter ID Download: फक्त 2 मिनिटांत तुमच्या मोबाइलवरुन कलरफुल मतदान कार्ड डाउनलोड करा

Colour Voter ID Download भारत हा लोकशाही प्रधान देश आहे. येथे लोकांसाठी लोकच राज्य चालवतात त्यालाच लोकशाही असे म्हटले जाते. आणि या लोकशाही पद्धतीत सर्वात महत्त्वाचे असते ते म्हणजे दर 5 वर्षांनी येणार मतदान. मतदान हा प्रत्येक भारतीयाचा हक्क आहे. आणि तो हक्क बजावण्याचा अधिका न्यायालयाने भारतीयाला दिलेला आहे. हा हक्क बजावण्यासाठी मात्र 18 वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक नागरिकाकडे मतदार कार्ड असणे आवश्यक आहे. हे कार्ड नसेल तर तुम्ही भारतीय नागरिक असूनही तुम्हाला मतदान करता येणार नाही. त्यामुळे मतदार कार्ड हे प्रत्येक मतदात्याचे ओळखपत्र आहे. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी कलरफुल मतदार कार्ड डाऊनलोड करण्याची सविस्तर माहिती घेऊन आलो आहोत. त्यासाठी तुम्ही मतदार रजीस्ट्रेशन केलेले असणे आवश्यक आहे.

भारत निर्वाचन आयोगाकडून मिळते मतदार कार्ड

भारताच्या प्रत्येक नागरिकाला भारत निर्वाचन आयोगाकडून मतदार कार्ड दिले जाते. हे मतदार कार्ड  ओळखपत्र म्हणून देखील  नागरिकांना वापरता येते. Colour Voter ID Download

मतदार कार्डमध्ये कोणकोणती माहिती असते

 प्रत्येक नागरिकाच्या मतदार कार्डमध्ये त्या नागरिकाचे नाव, वय, संपुर्ण पत्ता आणि संपर्क क्रमांत देखील असतो. निवडणूक आयोगाकडून सुरू करण्यात आलेल्या या नवीन सुविधेमुळे आता मतदारांना कलरफुल मतदान कार्ड डाउनलोड करण्यासाठी कोणत्याही कार्यालयात जाण्याची गरज नाही.  शासनाच्या ऑनलाईन सुविधेमुळे नागरिकांना त्यांचे मतदान कार्ड घरबसल्या  अगदी निःशुल्क  आणि तोही एका क्लिकवर डाउनलोड करता येणार आहे. Colour Voter ID Download

असे डाऊनलोड करा तुमचे कलरफुल मतदार कार्ड

  • शासनाच्या नव्या सुविधेप्रमाणे कलर व्होटर आयडी म्हणजेच रंगीत मतदार कार्ड ऑनलाईन पद्धतीने डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला भारतीय निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
  • https://voters.eci.gov.in/ या लिंकवर क्लिक करुन देखील तुम्ही मतदारांच्या सुविधेसाठी तयार केलेल्या वेबसाईटवर जाऊ शकता.
  • या वेबसाईटवर गेल्यानंतर सर्वात आधी तुम्हाला Sign Up या पर्यायावर क्लिक करून स्वतःची नोंदणी करावी लागेल.
  • नोंदणी करत असताना तुमचं नाव, मतदान ओळखपत्र क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि पासवर्ड टाकावा लागेल.
  •  या वेबसाईटसाठीची नोंदणी पूर्ण झाल्यानंतर पोर्टलवर देण्यात आलेल्या लॉगिन बटनावर क्लिक नोंदणी करताना वापरलेला आयडी पासवर्ड टाकून लॉगिन करा.
  • लॉगिन केल्यानंतर तुम्हाला e-EPIC Download या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • आता e-EPIC क्रमांक किंवा फॉर्म संदर्भ क्रमांक या दोन क्रमांकांपैकी कोणत्याही एका पर्यायावर टिक करा. तुमच्याकडे असलेल्यापैकी कोणताही एक क्रमांक टाकून राज्य निवडा आणि SEARCH बटणावर क्लिक करा.
  • अगदी काही सेकंदांमध्येत मतदार ओळखपत्रात लिंक केलेल्या मोबाईलवर किंवा ई-मेल आयडीवर ओटीपी पाठवण्यात येईल, त्या ओटीपीची पडताळणी करा आणि समोरील करान्यात भरा.
  • आता तुमच्यासमोर ही वोटर कार्ड दिसेल, डाउनलोड बटणावर क्लिक करून कलर वोटर कार्ड डाउनलोड करून घ्या. डाउनलोड केलेला e-EPIC मतदान कार्ड तुम्ही कुठेही वापरू शकता Colour Voter ID Download

रंगीत मतदान कार्डचे सोबत असण्याचे अनेक फायदे

  • ऑनलाईन पद्धतीने डाऊनलोड केलेले म्हणजे डिजिटल कलरफुल मतदार कार्ड तुमच्याकडे असेल तर तुम्ही मतदान करु शकता.  निवडणूक प्रक्रियेत मतदान करण्याचा अधिकार बजाऊ शकता.
  •  कलरफुल मतदार कार्डचा वापर नागरिक आपली ओळख पटवण्यासाठी म्हणून देखील करु शकतात. या कार्डवर नागरिकांचा पत्ता व फोटो देखील असते.
  •  एखाद्या केंद्रीय आणि राज्य स्तरावरील शासकीय योजनेचा फायदा घेण्यासाठी देखील आपण या डिजिटल मतदार कार्डचा वापर करु शकतो.  मतदान कार्ड सोबत असल्यास सरकारी योजनांसाठी नागरिकांना जलद सुविधा उपलब्ध होतात. गृहनिर्माण योजना, आर्थिक सहाय्य योजना, विमा योजना इत्यादीमध्ये मतदान कार्डचा उपयोग केला जातो.
  •  बँकेत खाते काढताना मतदार कार्ड अनिवार्य असते. कारण त्यामुळे नागरिकाची ओळख सिद्ध होत असते. त्यामुळे बँकेतील व्यवहारात मतदार कार्ड अत्यंत महत्त्वाचे समजले जाते. Colour Voter ID Download